Weather Update : किमान तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता

Cold Weather News : उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या अभावामुळे राज्यात थंडी कमी झाली आहे. आज (ता. ४) राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहणार आहे.
Weather Update
Weather Update Agrowon
Published on
Updated on

Pune News : उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या अभावामुळे राज्यात थंडी कमी झाली आहे. आज (ता. ४) राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहणार आहे. बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा १४ ते २२ अंशांदरम्यान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. निफाड आणि धुळे येथे पारा १० अंशांच्या खाली आहे.

उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी-अधिक होत आहे. शनिवारी (ता. ३) हरियानातील कर्नाल यथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, सिक्कीम, पश्चिम बंगालमध्ये किमान तापमान ६ ते १० अंशांदरम्यान आहे. हिमाचल प्रदेश, उत्तरखंड येथे हिमवृष्टी होण्याची तर उत्तर आणि ईशान्य भारतात दाट धुके पडण्याची शक्यता आहे.

Weather Update
Weather Update : राज्यात थंडी कमी होण्याची शक्यता

शनिवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे २९.२ (१३.४), धुळे ३०.० (९.९), जळगाव ३१.४ (१३.४), कोल्हापूर ३०.६ (१७.१), महाबळेश्वर २५.२ (१३.९), मालेगाव २९.८ (१४.६), नाशिक २९.० (१३.०), निफाड २९.५ (९.७), सांगली ३१.९ (१६.१), सातारा ३०.२ (१४.२), सोलापूर ३४.९(१८.०), सांताक्रूझ ३१.६ (१९.४), डहाणू ३०.० (१९.०), रत्नागिरी ३०.७ (१८.७),

Weather Update
Kolhapur Weather Update : कोल्हापूरचा पारा घसरला, आणखी किती दिवस राहणार थंडी

छत्रपती संभाजीनगर ३०.० (१५.५), नांदेड - (१७.४), परभणी ३१.३ (१५.३), अकोला ३२.८ (१५.३), अमरावती ३१.६ (१७.०), बुलडाणा २८.७ (१५.४), ब्रह्मपुरी ३१.४ (१६.२), चंद्रपूर ३०.२ (१६.४), गडचिरोली २७.२ (१५.०), गोंदिया २९.४ (१३.८), नागपूर ३०.४(१४.४), वर्धा ३०.९(१५.९), वाशीम ३१.८ (१४.६), यवतमाळ ३२.५ (१६.२).

राज्यात किमान तापमान १० ते २० अंशांदरम्यान

राज्याच्या तापमानात वाढ झाल्याने गारठा कमी झाला असला तरी उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी थंडी कायम आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ९.७ अंश, तर धुळे येथील कृषी महाविद्यालयात ९.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा १० ते २० अंशांच्या दरम्यान आहे. आज (ता. ३) किमान तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.

१० अंशांपेक्षा कमी किमान तापमानाची ठिकाणे :

निफाड ९.७, धुळे ९.९.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com