

पुणे - तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या मनातील केंद्र सरकारवरचा (Central Government) राग अद्याप कायम असून त्याचे पडसाद केंद्र सरकारसोबतच्या आढावा बैठकीत उमटले आहेत. तेलंगणाच्या नागरी व अन्नपुरवठा आणि पर्यावरण मंत्र्यांनी केंद्रीय ग्राहक कल्याण,अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांच्यासोबतच्या बैठकीपासून दूर राहणे पसंत केले असल्याचे समोर आले आहे. पर्यावरण विभागाचा अतिरिक्त पदभार असलेल्या केंद्रीय अश्विनी कुमार चौबे यांना आढावा बैठकीत केवळ राज्याच्या पर्यावरण, अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांवरच समाधान मानावे लागले. त्यामुळे संतापलेल्या चौबे यांनी, अशा आढावा बैठकीस (Centre's Review meeting) उपस्थित राहणे ही संबंधित मंत्र्यांची जबाबदारी होती, राजशिष्टाचाराचा भाग होता, असे सांगत नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - जागतिक शाश्वत विकास परिषदेचे उद्घाटन केंद्र सरकार आणि तेलंगणा सरकारमध्ये सध्या तांदळाच्या हमीभावाने (Rice MSP) खरेदीवरून संघर्ष सुरु आहे. केंद्र सरकारने फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (FCI) माध्यमातून तेलंगणातील तांदळाची हमीभावाने खरेदी थांबवली आहे. त्यामुळे तेलंगणा आणि केंद्र सरकारमधील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अद्यापही सुरु आहेत. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तेलंगणा सरकारने मोदी सरकारसोबत अंतर राखून वागण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा - तांदूळ बाजारात यंदा थायलंडशी स्पर्धा
तांदळाच्या हमीभावाने (MSP) खरेदीच्या मुद्यावरून झालेल्या शाब्दिक चकमकीमुळेच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधानांच्या राज्य दौऱ्यावेळी हजर राहणे टाळले होते. आता केंद्रीय ग्राहक कल्याण,अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांच्यासोबतही तोच कित्ता गिरवण्यात आला आहे. के. चंद्रशेखर राव यांच्या भूमिकेचे अनुकरण करत तेलंगणातील अन्न व नागरी पुरवठा आणि पर्यावरण मंत्र्यांनी अश्विनी कुमार चौबे यांच्यासोबतच्या आढावा बैठकीस हजर राहणे टाळले असल्याची चर्चा आहे.
व्हिडीओ पाहा - तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि त्याचे मंत्रिमंडळातील सदस्य हेतुपूर्वक राजशिष्टाचाराचे पालन करत नसल्याचा आरोपही चौबे यांनी केला आहे. ५ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी एका समारंभासाठी तेलंगणात गेले होते, मात्र त्यावेळीही चंद्रशेखर राव यांनी राजशिष्टाचाराचे पालन केले नसल्याची खंत चौबे यांनी व्यक्त केली आहे. २०२३ पासून देशभरात फोर्टिफाईड तांदळाचा (Fortified Rice)पुरवठा पोषक घटकांनी युक्त खाद्यान्न देण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी येत्या २०२३ पासून देशभरातील स्वस्त धान्य दुकांनातून फोर्टिफाईड तांदूळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सध्या बऱ्याच ठिकाणी एकात्मिक बाल विकास सेवा आणि माध्यान्ह भोजन योजनेत फोर्टिफाईड तांदूळ दिला जातो. २०२३ पासून देशातल्या सर्व स्वस्त धान्य दुकानांत फोर्टिफाईड तांदूळ उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. केवळ रेशन दुकानांतच नव्हे तर खुल्या बाजारातही सर्वांना फोर्टिफाईड तांदूळ उपलब्ध व्हायला हवा,यासाठीही सरकारकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचे चौबे म्हणाले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.