Agricultural Drone: कृषी क्षेत्रामध्ये ड्रोनचा वापर

शेती अधिक शाश्‍वत, किफायतशीर, काटेकोर व बदलत्या हवामानाशी नक्कीच अनुकूल करता येईल. या लेखामध्ये ड्रोनच्या वापराविषयी माहिती घेऊ.
Drone uses in agriculture
Drone uses in agricultureAgrowon
Published on
Updated on

Drone uses in agriculture: औद्योगिक क्षेत्रापाठोपाठ एकेक टप्पा पार पाडत कृषी क्षेत्रही (Agricultural) चालत आहे. सध्या डिजिटल तंत्रज्ञान ४ या टप्प्यावर असल्याचे मानले जाते.

त्याद्वारे शेती (Farming)अधिक शाश्‍वत, किफायतशीर, काटेकोर व बदलत्या हवामानाशी (Change Weather) नक्कीच अनुकूल करता येईल. या लेखामध्ये ड्रोनच्या (Agricultural drones)वापराविषयी माहिती घेऊ.

कृषी क्षेत्रामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा पुढील क्षेत्रामध्ये प्रामुख्याने केला जाऊ लागला आहे.

१) मानवविरहित हवेतून उडणारे स्वयंचलित वाहन म्हणजेच ड्रोन (Drone).

२) जमिनीवरून चालणारे मानवरहित स्वयंचलित वाहन, म्हणजेच यंत्रमानव (Robot).

३) संवेदके (Sensors)

४) निर्णय समर्थन प्रणाली (DSS).

५) इंटरनेट ऑफ थिंग्ज. (IoT).

६) सुदूर संवेदन (Remote Sensing).

७) भौगोलिक माहितीशास्त्र (GIS/GPS).

८) कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग (AI/ML).

ड्रोन म्हणजे काय?

ड्रोन हे हवेतून उडणारे मानव विरहित (Unmanned Aerial Vehicle - UAV) स्वयंचलित वाहन आहे. ज्या प्रमाणे जमिनीवरून वाहकाद्वारे चालविल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर या वाहनाला विविध अवजारे व उपकरणे जोडून शेतीतील अनेक कामे करतो.

त्याच प्रमाणे ड्रोन हे हवेतून उडणारे मानव विरहित वाहन आहे. ड्रोन व त्यावरील उपकरणाला एकतर जमिनीवरून रिमोट कन्ट्रोलच्या साह्याने नियंत्रित केले जाते.

किंवा ड्रोनला एका विशिष्ट संगणकीय प्रणालीद्वारे वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्याची सोय केलेली असते. त्यामुळे स्वायत्तपणे (Autonomous) शेतीमधील विविध क्रिया केल्या जाऊ शकतात.

Drone uses in agriculture
Drone Technology: ड्रोन पाहण्यासाठी शेतकरी उत्सुक

सात आठ वर्षांपूर्वीपर्यंत अत्यंत छोटे ड्रोनवरील कॅमेराच्या साह्याने वेगवेगळ्या समारंभाचे चित्रीकरण केले जाई. त्या वेळी जनसामान्यांमध्ये ड्रोनबद्दल एक कुतूहल होते.

मात्र आता ही बाब सामान्य होत गेली आहे. शेतीमध्ये छोटे ते मध्यम प्रकारच्या ड्रोनचा वापर फवारणीसाठी केला जातो, तेव्हा शेतकऱ्यांमध्ये नेमका कसा वापर करायचा आणि त्यांच्या क्षमतेविषयी उत्सुकता व कुतूहल असते.

सध्या काही अडचणी जाणवत असल्या तरी लवकरच ड्रोनद्वारे पिकांवरील फवारणी ही एक सामान्य क्रिया होईल, यात शंका नाही.

ड्रोनचे विविध प्रकार- ड्रोनचे त्याच्या हवेत उडण्याच्या तत्त्वानुसार साधारणतः चार प्रकार पडतात.

१. फिक्स्ड विंग ड्रोन (Fixed Wing Drone)

२. एक रोटर ड्रोन (Single Rotor Drone)

३. अनेक रोटर ड्रोन (Multi Rotor Drone)

४. फिक्स्ड विंग- रोटर हायब्रीड ड्रोन ( Fixed Wing-Rotor Hybrid VTOL)

१) फिक्स्ड विंग ड्रोन (Fixed wing drone)

या ड्रोन्समध्ये विमानासारखे पाते असून, विमानासारखेच हवेत उडतात. या ड्रोनला हवेत उड्डाण घेण्यासाठी आणि पुन्हा हवेतून जमिनीवर उतरण्यासाठी धावपट्टीसारख्या जागेची आवश्यकता असते.

मर्यादा ः

१) आहे त्या जागेवरून सरळ किंवा खाली येता जाता येत नाही.

२) ते हवेत एका जागी स्थिर राहू शकत नाही किंवा हवेत घिरट्या घालू शकत नाही. त्यामुळे शेतीउपयोगी कार्यासाठी अशा ड्रोन वापरण्यावर मर्यादा आहेत.

३) ते महागही आहेत.

४) त्यांना उडविण्यासाठी अधिक कौशल्याची आवश्यकता आहे.

फायदे ः

१) हे ड्रोन्स जास्त उंचीवर व अधिक वजन घेऊन उडू शकतात.

२) हवेत साधारणतः दोन, तीन तास उडू शकत असल्यामुळे जास्त अंतरावर प्रवास करणे, जास्त क्षेत्रावर कामे करणे शक्य होते.

३) या प्रकारचे ड्रोन्सचा वापर हवेतून जमिनीचे नकाशे काढणे (mapping), पीक सर्वेक्षण करणे (Surveying) किंवा पीकपाहणी करणे (Inspection) यासाठी प्रामुख्याने केला जातो.

२) एक रोटर ड्रोन (Single Rotor Drone)

हे ड्रोन आरेखन व रचनेनुसार हेलिकॉप्टरसारखेच असतात. त्यामध्ये एका रोटरसोबत मोठे फिरणारे पाते असते. तसेच दिशा नियंत्रित करण्यासाठी व स्थिरतेसाठी त्याच्या शेवटी किंवा शेपटीमध्ये एक रोटर असते.

यांना उडवणे किंवा जमिनीवर उतपण्यासाठी धावपट्टीची आवश्यकता नसते. आहे त्या जागेवरून वर, खाली येऊ शकतात. हवेत स्थिर राहू शकतात किंवा घिरट्या घालू शकतात.

मर्यादा ः

१) हे ड्रोन वापरायला क्लिष्ट व महाग आहेत.

२) त्याची सतत देखभाल करावी लागते.

३) यावर असणाऱ्या मोठ्या पात्यामुळे कमी उंचीवर वापरण्यात अडचणी येऊ शकतात. त्याच प्रमाणे वर उडविताना किंवा खाली येताना धोकादायक होऊ शकतात.

Drone uses in agriculture
Agriculture Drone: मारुत ड्रोनला कृषी ड्रोन म्हणून DGCA ची मंजुरी

फायदे ः

१) एक रोटर ड्रोन हे मल्टिरोटर ड्रोनपेक्षा कार्यक्षम, सशक्त व टिकाऊ असतात.

२) जास्त वजन घेऊन अधिक काळ हवेत उडणे किंवा हवेत एका जागी स्थिर ठेवून करण्याच्या कामामध्ये त्यांची उपयुक्तता अधिक आहे.

३) या ड्रोनचा उपयोग विशिष्ट प्रकारच्या वस्तू वाहतुकीसाठी किंवा जेव्हा अधिक वजनाच्या कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रण किंवा जमिनीचे नकाशे काढण्यासाठी होत.

जमिनीची किंवा पिकाची पाहणी करण्यासाठी (उदा. LiDOR) हे ड्रोन उपयोगी ठरतात.

३) अनेक रोटर ड्रोन (Multi Rotor Drone)

या ड्रोनमध्ये तीन किंवा त्यापेक्षा अधिक रोटर्स एका विशिष्ट प्रकारच्या पात्यासह असतात. त्यामुळे ड्रोनला एक प्रकारची उचल (लिफ्ट) मिळते. रोटर्स सोबत जोडलेल्या मोटर्समुळे रोटरचा वेग बदलला जातो.

त्यामधून निर्माण होणारा ‘थ्रस्ट’ हा ड्रोनच्या वजनापेक्षा जास्त, तेवढाच किंवा कमी राखता येतो. त्यानुसार ड्रोन वर उडू शकतो, खाली येऊ शकतो, स्थिर राहू शकतो, एकाच ठिकाणी घिरट्या घालू शकतो.

या प्रकारचे ड्रोन आहे त्या जागेवरून सरळ वर जाऊ शकतात किंवा खाली येऊ शकतात. म्हणजेच त्यांच्या उड्डाणासाठी फार कमी जागा पुरेशी असते.

मर्यादा ः

१) या ड्रोनला हवेत उडण्यासाठी जास्त ऊर्जेची आवश्यकता असते.

२) जास्त वेगाने उडू शकत नाही.

३) हवेत जास्त काळ राहू शकत नाही.

४) अन्य प्रकारच्या ड्रोनच्या तुलनेत कार्यक्षम नाहीत.

फायदे

१) थोडी कार्यक्षमता कमी असली तरी हवेत उडत असताना या ड्रोनचे नियंत्रण चांगल्या प्रकारे करता येते.

२) आपल्या गरजेप्रमाणे हवेत वर, खाली, मागे व पुढे उडवता येतात.

३) आवश्यकतेनुसार स्थिर किंवा घिरट्या घालत ठेवू शकतो.

४) छोट्या जागेतही वापरणे शक्य. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक असलेल्या भारतासारख्या देशात हे ड्रोन वापरायला उपयुक्त आहे.

५) विशेषतः छोट्या क्षेत्रावर फवारणी करणे, मॅपिंग म्हणजेच नकाशे काढणे, सर्वेक्षण व पाहणी अशा कामांसाठी मल्टी रोटर ड्रोनचा वापर अधिक प्रमाणात होऊ लागला आहे.

Drone uses in agriculture
Agricultural Drone : शेती फायदेशीर करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान

४. फिक्स्ड विंग-रोटर हायब्रीड ड्रोन (Fixed Wing-Rotor Hybrid VTOL)

या प्रकारच्या ड्रोनमध्ये फिक्स्ड विंग ड्रोन (Fixed Wing) व अनेक रोटर ड्रोन (Multi Rotor) या दोन्ही प्रकारच्या ड्रोनचे फायदे एकत्रित केले आहेत.

त्यामुळे हे ड्रोन हे जास्त वजन घेऊन हवेत जास्त काळ उडू शकतात. त्याच प्रमाणे आहे त्या जागेवरून हवेत वर उडणे व खाली येणे इ. प्रक्रिया करू शकतात.

मर्यादा ः

सध्या हे ड्रोन महाग आहेत. तसेच कार्यक्षमता वाढविण्याबाबत अधिक संशोधन सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com