Bio Decomposer : पीक अवशेष विघटनासाठी बायो डीकंपोजर

Crop Residue Decomposition : भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाने काढणीनंतर उरलेल्या पीक अवशेषांचे विघटन करण्यासाठी बायो डीकंपोजरची निर्मिती करण्यात आली.
Bio Decomposer
Bio DecomposerAgrowon

डॉ. एम. एस. पोवार,एन. एस. परीट

Agriculture Technology : भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाने काढणीनंतर उरलेल्या पीक अवशेषांचे विघटन करण्यासाठी बायो डीकंपोजरची निर्मिती करण्यात आली. बायो डीकंपोजरच्या वापरामुळे तीन ते चार आठवड्यांत पीक अवशेषांचे विघटन होऊन चांगले कंपोस्ट खत तयार होते.

हरितगृह वायू उत्सर्जन, जलप्रदूषण आणि जमिनीचा ऱ्हास थांबविण्यासाठी पीक अवशेष, पेंढा आणि सेंद्रिय घटकांचे प्रभावीपणे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. मजुरांची उपलब्धता नसल्यामुळे आणि पुढील पिकाच्या पेरणीसाठी कमी वेळ उपलब्ध असल्यामुळे पिकांचे अवशेष शेतामध्येच जाळले जातात. त्यामुळे सेंद्रिय घटकांची कमतरता तयार झाली आहे.

कारणे

पीक कापणी आणि पुढील पीक पेरणीदरम्यान उपलब्ध वेळ खूपच कमी असतो.

पिकांच्या अवशेषांची वाहतूक करणे कष्टदायक आणि खर्चिक आहे.

कार्बन नत्राचे मोठे गुणोत्तर असल्यामुळे पिकांच्या अवशेषांचे नैसर्गिक विघटन होण्यास बराच वेळ लागतो.

मातीत प्रभावी विघटन करणाऱ्या सूक्ष्मजीवांची अपुरी किंवा अनुपलब्धता.

पिकांचे एक टन अवशेष जाळल्याने ६० किलो कर्ब, १,४६० किलो कार्बन डायऑक्साइड, ३ किलो पावडर, १९९ किलो राख आणि २ किलो सल्फर डायऑक्साइड बाहेर पडतात. यामुळे पर्यावरणावर परिणाम होतो. नायट्रस आणि सल्फर ऑक्साइड यांसारख्या हानिकारक वायूंच्या संपर्कात आल्याने लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो.

त्वचा, डोळे आणि श्‍वसन कार्य, अगदी कर्करोग आणि फुफ्फुसाचे आजार होतात. मातीची गुणवत्ता आणि उपयुक्त सूक्ष्मजीवांवर परिणाम होतो. मातीचे तापमान, सामू, आर्द्रता, उपलब्ध नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशिअम मातीतील सेंद्रिय पदार्थ, एन्झाइम्स आणि फायदेशीर सूक्ष्मजीव यांसारख्या मातीच्या गुणधर्मांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. सूक्ष्मजीवांची संख्या कमी झाल्यामुळे माती कडक होते, धूप होते. जमिनीची सुपीकता व उत्पादकता कमी होते. हे लक्षात घेऊन शेतामध्येच पिकांच्या अवशेषांचे कंपोस्टिंग करणे हा चांगला पर्याय आहे.

Bio Decomposer
Organic Farming : शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा वापर करावा

बायो डीकंपोजरचे कार्य

भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाने काढणीनंतर उरलेल्या पीक अवशेषांचे विघटन करण्यासाठी बायो डीकंपोजरची निर्मिती करण्यात आली. यामध्ये सेल्युलोज, लिग्निन आणि कायटिन या सारख्या विविध घटकांचे विघटन करणाऱ्या सात सूक्ष्मजीव- बुरशीचा समूह आहे. बायो डीकंपोजरच्या वापरामुळे तीन ते चार आठवड्यात पीक अवशेषांचे विघटन होऊन चांगले कंपोस्ट खत तयार होते.

बायोडीकंपोजरमधील सूक्ष्मजीव, बुरशीचे कार्य

अस्पर्जलस अवमोरी - क्रूड प्रथिने

अस्पर्जलस काल्यवट्स - वनस्पती पेशी भिंती

ट्रायकोडर्मा हर्झॅनियम - सेंद्रिय सामग्री

एस्परगिलस नायगर - लिग्निन आणि कार्बोहायड्रेट

ट्रायकोडर्मा एस्पेरिलिम - सामान्य कचरा कुजणे

पेनिसिलियम ऑक्सॅलिकम - सेल्युलोज

चेटोमियम ग्लोबोसम - कायटिन

Bio Decomposer
Agriculture Technology : आंतरमशागतीची आधुनिक अवजारे

प्रथम ७५० ग्रॅम गूळ एक लिटर पाण्यामध्ये मिसळून उकळावा. हे द्रावण उकळून थंड झाल्यानंतर पाण्यावरील तरंगणारे घटक काढावेत. त्यानंतर हे द्रावण २५ लिटर साध्या पाण्यात मिसळावे.

२५ लिटर द्रावण खोल चौकोनी ट्रे किंवा सपाट टबमध्ये ओतावे. या द्रावणात २५० ग्रॅम बेसन पीठ चांगल्या प्रकारे मिसळावे.

यानंतर तयार द्रावणामध्ये ५० ग्रॅम बायोडीकंपोजर मिसळावे.

मिश्रण पातळ कापडाने झाकून उबदार ठिकाणी ठेवावे, अधूनमधून ढवळत राहावे.

दोन दिवसांत या द्रावणावर उपयुक्त बुरशीची वाढ सुरू होईल. वेगवेगळ्या रंगांचा थर द्रावणावर दिसतो. साधारणपणे या बुरशीला सात दिवस वाढू द्यावे.

आठव्या दिवशी हे द्रावण फवारणीसाठी वापरावे. एक एकर क्षेत्रावर पाचट किंवा वनस्पती अवशेष पसरल्यानंतर १२५ लिटर पाण्यात २५ लिटर बायो डीकंपोजरचे द्रावण मिसळून शेतावर समान फवारणी करावी.

शेणखत, कंपोस्ट खत चांगल्या पद्धतीने तयार करण्यासाठी २५ लिटर बायोडीकंपोजरचे द्रावण १२५ लिटर पाण्यामध्ये मिसळावे. हे द्रावण एक ते दीड टन पालापाचोळा किंवा शेणखतामध्ये चांगल्या प्रकारे मिसळावे. हे बायोडीकंपोजर सर्व प्रकारच्या पिकांच्या अवशेषांचे विघटन करण्यासाठी वापरावे. ३ ते ४ आठवड्यांच्या कालावधीत पिकांच्या अवशेषांचे कंपोस्टमध्ये रूपांतर होते.

डॉ. एम. एस. पोवार, ७०२८०१४५४६, (वरिष्ठ विपणन व्यवस्थापक, इफ्को, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com