Agriculture Technology : शेतीमाल मूल्यसाखळीला नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाची जोड

E-Market Platform : घाऊक व्यापारी, प्रक्रियादार, निर्यातदार यांना कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवहारातून गोदाम आधारित व्यवसाय ते व्यवसाय मूल्य साखळीमध्ये प्रवेश करण्यासाठी ई- मार्केट प्लॅटफॉर्मचा उपयोग होणार आहे.
Godown
GodownAgrowon

Agriculture Technology Updates : गोदामविषयक मूल्यसाखळी निर्मिती शेतकऱ्यांना फायद्याची ठरणार आहे. परिस्थिती यापुढील काळात निर्माण होण्यासाठी तसेच त्यायोगे मध्यस्थांची साखळी कमी करून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळवून देण्याच्या अनुषंगाने शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याकरिता गोदाम मूल्यसाखळीचे डिजिटायझेशन होणे अत्यंत आवश्यक आहे.

खासगी तसेच शासकीय यंत्रणेमार्फत त्यादृष्टीने प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. डिजिटायझेशनमुळे शेतीमाल मूल्यसाखळ्यांना नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाची जोड दिली जात असल्याने यापुढे शेतकऱ्यांमध्ये व्यापारीवृत्ती वाढीस लागणार आहे.

घाऊक व्यापारी, प्रक्रियादार, निर्यातदार यांना कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवहारातून गोदाम आधारित व्यवसाय ते व्यवसाय मूल्य साखळीमध्ये प्रवेश करण्यासाठी वाणिज्य आधारित ई- मार्केट प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार आहे. या प्रकारच्या गोदाम आधारित मूल्य साखळ्यांमध्ये शेतमालाची मानकांनुसार गुणवत्ता सांभाळणे, वाहतूक, शेतीमाल हाताळणी आणि आर्थिक साह्य हे अत्यंत निर्णायक घटक ठरणार आहेत.

निगोशिएबल वखार पावतीचा फायदा

गोदामविषयक (विकास व नियमन) कायदा २००७ मधील तरतुदींची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने केंद्रशासनाने सप्टेंबर २०१० मध्ये वखार विकास व नियामक प्राधिकरणाची (WDRA) निर्मिती केली. देशामध्ये निगोशिएबल वखार पावतीची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांचा शेतीमाल शेतीपासून जवळ अथवा नजीकच्या गावात तांत्रिक पद्धतीने बांधलेल्या गोदामात शास्त्रीय पद्धतीने साठवणूक होणार आहे.

त्यावर निगोशिएबल वखार पावतीच्या माध्यमातून आवश्यकता असल्यास गोदाम पावतीवर बँकेतून शेतीमाल तारण कर्ज घेणे हा प्राधिकरण निर्मितीमागे महत्त्वाचा उद्देश आहे. ही प्रक्रिया हाताळण्यास योग्य, पारदर्शक व व्यवस्थापन करण्यास अत्यंत सोपी

होण्याच्या अनुषंगाने वखार विकास व नियामक प्राधिकरणाने १ ऑगस्ट २०१९ च्या परिपत्रकाच्या आधारे, १ ऑगस्ट २०१९ पासून वखार विकास व नियामक प्राधिकरणांतर्गत नोंदणीकृत गोदामाचा गोदामचालक भौतिक स्वरूपात गोदाम पावती देऊ शकणार नाही. निगोशिएबल वखार पावती ही फक्त इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रीपोजेटरी व्यवस्थेमार्फत अदा करण्यात येईल असे बंधनकारक करण्यात आले. हा बदल अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण वखार पावती अथवा गोदाम पावती

शेतकऱ्याने भौतिक स्वरूपात घेतल्यास बऱ्याच वेळा हरवते. पुढे शेतीमाल सोडवून घेताना किंवा विक्री करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात निगोशिएबल वखार पावती असल्यास पावती हरविण्याचा संबंध येत नाही. व्यवहार पारदर्शक होऊ शकतो.

Godown
Agriculture Technology : तरुणाने तयार केली शेतकऱ्यांसाठी वेबसाईट; शेतमालाचे भाव एका क्लिकवर उपलब्ध

सद्यःस्थितीत शेतकऱ्याला गोदाम पावती व्यवस्थेत येण्यास प्रवृत्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रचार व प्रसिद्धीची आवश्यकता असून यामध्ये फक्त महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांनी गोदाम मूल्य साखळीत येऊन योग्य बाजारभाव घेण्यासाठी केंद्र व राज्य शासन त्याचप्रमाणे जागतिक बँक खूप प्रयत्न करीत आहेत.

परंतु याकरिता शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने प्रयत्न करून गोदाम मूल्यसाखळीमध्ये प्रवेश करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण यापुढील काळात गोदाम हे मार्केट किंवा बाजारपेठ म्हणून अस्तित्वात येऊन कृषी उत्पन्न बाजारसमितीला पर्याय उभा राहणार आहे. शेतकऱ्यांना त्याचा शेतीमाल विक्री करण्यासाठी पर्यायी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.

शेतीमालाला योग्य बाजारभाव उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने गोदाम मूल्य साखळी ही एक हक्काची यंत्रणा शेतकऱ्याच्या हातात येणार आहे. राज्यात सुमारे १.५ कोटी शेतकरी असून त्यापैकी फक्त १५,००० च्या आसपास शेतकऱ्यांनी त्यांचा शेतीमाल गोदामात ठेवला आहे. सुमारे ५,००० शेतकऱ्यांनी त्यावर शेतीमाल तारण कर्ज घेतलेले आहे. हे प्रमाण अत्यंत कमी असून, त्यावर खूप मोठ्या प्रमाणावर कामकाज होण्याची आवश्यकता आहे.

ई-निगोशिएबल वखार पावती ही जरी वखार विकास व नियामक प्राधिकरणाच्या व्यवस्थेमध्ये सुरक्षित असली, तरी बँक आणि शेतकऱ्यांना त्याची माहिती होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी गोदाम आधारित मूल्य साखळीत प्रवेश करावा याकरिता शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत

कृषी पणन व्यवस्थेचे भविष्य, डिजिटायजेशन व पारदर्शकता यावर अवलंबून असणार असल्याने कृषी व्यापार व शेतकरी यांच्या भवितव्याच्या दृष्टीने ई-नाम ही संकल्पना व्यापारात पुढील स्तरावर नेण्यासाठी ई-एनडब्ल्यूआर (ई- निगोशिएबल वखार पावती) ई-नाम प्लॅटफॉर्म सोबत तारीख ३ एप्रिल २०२० पासून जोडण्यात आले.

शेतकरी- बाजार आणि शेतकरी खरेदीदार जोडणी (शेतकरी, प्रक्रियादार, निर्यातदार, व व्यापारी) यांच्यातील व्यापारात सुलभता व कार्यक्षमता सुधारण्यासाठी डिजिटायजेशनचे फायदे, वेअरहाउस आधारित विक्री आणि ई-एनडब्ल्यूआरचा (ई- निगोशिएबल वखार पावती) ई-नाम प्लॅटफॉर्मद्वारे व्यापार आणि असेच विविध नोंदणीकृत/ परवाना प्राप्त ई-ट्रेडिंग प्लॅटफॉर्म, हे कृषी विपणनातील महत्त्वाचे पाऊल आहे.

गोदामविषयक मूल्यसाखळी निर्मिती शेतकऱ्यांना फायद्याची ठरणार आहे. परिस्थिती यापुढील काळात निर्माण होण्यासाठी तसेच त्यायोगे मध्यस्थांची साखळी कमी करून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळवून देण्याच्या अनुषंगाने शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याकरिता गोदाम मूल्यसाखळीचे डिजिटायझेशन होणे अत्यंत आवश्यक आहे.

खासगी तसेच शासकीय यंत्रणेमार्फत त्यादृष्टीने प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. डिजिटायझेशनमुळे शेतीमाल मूल्यसाखळ्यांना नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाची जोड दिली जात असल्याने यापुढे शेतकऱ्यांमध्ये व्यापारीवृत्ती वाढीस लागणार आहे.

घाऊक व्यापारी, प्रक्रियादार, निर्यातदार यांना कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवहारातून गोदाम आधारित व्यवसाय ते व्यवसाय मूल्य साखळीमध्ये प्रवेश करण्यासाठी वाणिज्य आधारित ई- मार्केट प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार आहे. या प्रकारच्या गोदाम आधारित मूल्य साखळ्यांमध्ये शेतमालाची मानकांनुसार गुणवत्ता सांभाळणे, वाहतूक, शेतीमाल हाताळणी आणि आर्थिक साह्य हे अत्यंत निर्णायक घटक ठरणार आहेत.

निगोशिएबल वखार पावतीचा फायदा

गोदामविषयक (विकास व नियमन) कायदा २००७ मधील तरतुदींची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने केंद्रशासनाने सप्टेंबर २०१० मध्ये वखार विकास व नियामक प्राधिकरणाची (WDRA) निर्मिती केली. देशामध्ये निगोशिएबल वखार पावतीची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांचा शेतीमाल शेतीपासून जवळ अथवा नजीकच्या गावात तांत्रिक पद्धतीने बांधलेल्या गोदामात शास्त्रीय पद्धतीने साठवणूक होणार आहे.

त्यावर निगोशिएबल वखार पावतीच्या माध्यमातून आवश्यकता असल्यास गोदाम पावतीवर बँकेतून शेतीमाल तारण कर्ज घेणे हा प्राधिकरण निर्मितीमागे महत्त्वाचा उद्देश आहे. ही प्रक्रिया हाताळण्यास योग्य, पारदर्शक व व्यवस्थापन करण्यास अत्यंत सोपी

Godown
Agriculture Technology : शाश्‍वत शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व

होण्याच्या अनुषंगाने वखार विकास व नियामक प्राधिकरणाने १ ऑगस्ट २०१९ च्या परिपत्रकाच्या आधारे, १ ऑगस्ट २०१९ पासून वखार विकास व नियामक प्राधिकरणांतर्गत नोंदणीकृत गोदामाचा गोदामचालक भौतिक स्वरूपात गोदाम पावती देऊ शकणार नाही. निगोशिएबल वखार पावती ही फक्त इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रीपोजेटरी व्यवस्थेमार्फत अदा करण्यात येईल असे बंधनकारक करण्यात आले. हा बदल अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण वखार पावती अथवा गोदाम पावती

शेतकऱ्याने भौतिक स्वरूपात घेतल्यास बऱ्याच वेळा हरवते. पुढे शेतीमाल सोडवून घेताना किंवा विक्री करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात निगोशिएबल वखार पावती असल्यास पावती हरविण्याचा संबंध येत नाही. व्यवहार पारदर्शक होऊ शकतो.

सद्यःस्थितीत शेतकऱ्याला गोदाम पावती व्यवस्थेत येण्यास प्रवृत्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रचार व प्रसिद्धीची आवश्यकता असून यामध्ये फक्त महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांनी गोदाम मूल्य साखळीत येऊन योग्य बाजारभाव घेण्यासाठी केंद्र व राज्य शासन त्याचप्रमाणे जागतिक बँक खूप प्रयत्न करीत आहेत.

परंतु याकरिता शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने प्रयत्न करून गोदाम मूल्यसाखळीमध्ये प्रवेश करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण यापुढील काळात गोदाम हे मार्केट किंवा बाजारपेठ म्हणून अस्तित्वात येऊन कृषी उत्पन्न बाजारसमितीला पर्याय उभा राहणार आहे. शेतकऱ्यांना त्याचा शेतीमाल विक्री करण्यासाठी पर्यायी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.

शेतीमालाला योग्य बाजारभाव उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने गोदाम मूल्य साखळी ही एक हक्काची यंत्रणा शेतकऱ्याच्या हातात येणार आहे. राज्यात सुमारे १.५ कोटी शेतकरी असून त्यापैकी फक्त १५,००० च्या आसपास शेतकऱ्यांनी त्यांचा शेतीमाल गोदामात ठेवला आहे. सुमारे ५,००० शेतकऱ्यांनी त्यावर शेतीमाल तारण कर्ज घेतलेले आहे. हे प्रमाण अत्यंत कमी असून, त्यावर खूप मोठ्या प्रमाणावर कामकाज होण्याची आवश्यकता आहे.

ई-निगोशिएबल वखार पावती ही जरी वखार विकास व नियामक प्राधिकरणाच्या व्यवस्थेमध्ये सुरक्षित असली, तरी बँक आणि शेतकऱ्यांना त्याची माहिती होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी गोदाम आधारित मूल्य साखळीत प्रवेश करावा याकरिता शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत.

कृषी पणन व्यवस्थेचे भविष्य, डिजिटायजेशन व पारदर्शकता यावर अवलंबून असणार असल्याने कृषी व्यापार व शेतकरी यांच्या भवितव्याच्या दृष्टीने ई-नाम ही संकल्पना व्यापारात पुढील स्तरावर नेण्यासाठी ई-एनडब्ल्यूआर (ई- निगोशिएबल वखार पावती) ई-नाम प्लॅटफॉर्म सोबत तारीख ३ एप्रिल २०२० पासून जोडण्यात आले.

शेतकरी- बाजार आणि शेतकरी खरेदीदार जोडणी (शेतकरी, प्रक्रियादार, निर्यातदार, व व्यापारी) यांच्यातील व्यापारात सुलभता व कार्यक्षमता सुधारण्यासाठी डिजिटायजेशनचे फायदे, वेअरहाउस आधारित विक्री आणि ई-एनडब्ल्यूआरचा (ई- निगोशिएबल वखार पावती) ई-नाम प्लॅटफॉर्मद्वारे व्यापार आणि असेच विविध नोंदणीकृत/ परवाना प्राप्त ई-ट्रेडिंग प्लॅटफॉर्म, हे कृषी विपणनातील महत्त्वाचे पाऊल आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com