Agriculture Tools : महिलांचे श्रम कमी करणारी अवजारे

शेती काम करणाऱ्या महिलांना गुडघे दुखी, पाठीच्या मणक्याचे आजार तसेच हातांना जखमा होणे असे त्रास उद्भवतात. हे लक्षात घेऊन शेतीकामांसाठी कमी खर्चात उपलब्ध होणारी विविध सुधारित अवजारे विकसित करण्यात आली आहेत.
Agriculture MEchanization
Agriculture MEchanizationAgrowon
Published on
Updated on

डॉ. दादासाहेब खोगरे

भारत हा कृषिप्रधान (Indian Agriculture) देश असून यामागे महिलांचा (Women Contribution In Agriculture) मोठा वाटा आहे. मशागतीपासून ते पीक उत्पादन (Crop Production) निघेपर्यंतच्या कामांत महिलांचा सहभाग असतो. शेती काम करणाऱ्या महिलांना गुडघे दुखी, पाठीच्या मणक्याचे आजार तसेच हातांना जखमा होणे असे त्रास उद्भवतात. हे लक्षात घेऊन शेतीकामांसाठी कमी खर्चात उपलब्ध होणारी विविध सुधारित अवजारे विकसित (Agriculture Tools) करण्यात आली आहेत. या अवजारांच्या वापर केल्याने महिलांचा शारीरिक ताण कमी होऊन कमी वेळात अधिक काम करणे शक्य होते.

१) हात कोळपे ः

- तणनियंत्रणासाठी महिला खुरप्याचा वापर करतात. बराच वेळ अवघडलेल्या स्थितीत बसून खुरपणी केल्यामुळे गुडघे, कमरेचा, मानेचा आणि पाठीचा त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी हात कोळपे विकसित करण्यात आले आहे. तणनियंत्रणासाठी हात कोळप्याचा वापर प्रभावी ठरतो.

- या कोळप्याद्वारे कोळपणी, निंदणी, खुरपणी ही कामे एकाच वेळी करणे शक्य होते. तसेच श्रम आणि वेळेची बचत होते.

- कोळपे वापरण्यास अत्यंत सोपे व वजनाने हलके असल्याने वाहतुकीस सुलभ आहे.

Agriculture MEchanization
Agriculture Machinery Care: कृषी अवजारांची निगा अन् देखभाल कशी राखाल

२) सरी-वरंबा पाडण्याचे यंत्र ः

- पारंपारिक पद्धतीने फावड्याने माती ओढून सरी व वरंबे काढले जातात. त्यामुळे जास्त वेळ लागतो. तसेच कंबर, पाठ आणि मानेचा त्रास होतो.

- वेगवेगळ्या रुंदीच्या सरी व वरंबे पाडण्यासाठी उपयुक्त आहे.

- या अवजाराच्या वापरासाठी फक्त दोन महिलांची आवश्यकता असते. एका महिलेने समोर ओढले व दुसऱ्या महिलेने अवजारावर हात ठेवून भार दिल्यास चांगल्या पद्धतीने सरी पडतात.

- मिरची, आले, पालक, मेथी इत्यादी पालेभाज्यांच्या लागवडीसाठी हे अवजार उपयुक्त ठरते.

Agriculture MEchanization
Mechanization : कृषी यांत्रिकीकरणासाठी किती अनुदान मिळतं ?

३) कडबा कुट्टी यंत्र ः

- या यंत्राच्या साह्याने कडबा, वैरण किंवा हत्ती गवताचे बारीक तुकडे करता येतात.

- हे यंत्र चालवण्यासाठी दोन महिलांची आवश्यकता असते. एक महिला चाकामध्ये चारा घालण्यासाठी आणि दुसरी महिला चाक फिरविण्यासाठी.

- या यंत्राला एक मोठे चाक असून त्यावर चारा कापण्यासाठी मोठ्या सुऱ्या लावलेल्या असतात. या चाकामध्ये चारा घातल्यानंतर तो आपोआप पुढे ढकलला जातो. चाक गोल फिरविल्यानंतर तो आपोआप कापला जातो.

- यंत्राच्या साह्याने प्रतितास २ क्विंटल कडब्याचे १ ते २ सेंमी लांबीचे तुकडे करता येतात.

४) ऊस पाचट गोळा करण्याचे यंत्र ः

- ऊसतोडणी केल्यानंतर पाचट गोळा करण्यासाठी मजुरांची आवश्यकता असते. एका हेक्टरमध्ये पाचट गोळा करण्यासाठी साधारण १० ते १२ मजूर लागतात. अशावेळी पाचट गोळा करण्यासाठी यंत्राचा वापर केल्यास कमी वेळेत जास्त क्षेत्रावरील पाचट गोळा करणे शक्य आहे.

- दीड ते सव्वा दोन फुटाच्या लोखंडी अँगलला प्रत्येक अर्धा इंच अंतरावर ३ इंच असलेली लोखंडी सळी लावलेली असते. या सळईचे जमिनीतले टोक अणकुचीदार असते. याला ५ फूट लांबीचे बांबू किंवा हलक्या पाइपचे हँडल बसविलेले असते. त्यामुळे न वाकता काम सोपे करता येते.

- दोन मजूर महिला एका दिवसात एक हेक्टरवरील पाचट गोळा करू शकतात.

५) पोते भरण्याची चौकट ः

- एका साध्या लोखंडी अँगलपासून ही चौकट बनवलेली असते. चौकटीस एक हूक असून या हुकामुळे पोते भरताना होणारा त्रास कमी होतो. पारंपारिक पद्धतीने पोते भरण्यासाठी एका माणसाने पोते धरून उभे राहावे लागते. तसेच पोते व्यवस्थितपणे भरले जात नाही.

- चौकटीची उंची आवश्यकतेनुसार कमी-जास्त करता येते. तसेच संपूर्ण पोते एकसमान भरले जाते.

६) भुईमूग फोडणी यंत्र ः

- पारंपारिक पद्धतीने भुईमूग शेंगा हाताने किंवा दगडाने फोडल्या जातात. त्या हाताला इजा होण्याची शक्यता असते.

- या शेंगा फोडणी यंत्रामध्ये एक फ्रेम असून त्यात तळाशी एक जाळी दिलेली आहे. या यंत्रामध्ये शेंगा टाकल्यानंतर दांडीच्या साह्याने आतील दातेरी कास्टिंग हलवली जाते. कास्टिंग व जाळी यामध्ये शेंगा येऊन त्या फुटल्या जातात.

----------------

- डॉ. दादासाहेब खोगरे, ९६८९६२४९२७/९३७०००६५९८

(विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, तडसर, ता.कडेगाव, जि. सांगली)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com