Weeding Machine: आता सौर उर्जेवर चालणारा रोबो करणार फवारणी!

Robot In Farm : आर्टिफिशयल इंटेलिजन्सचा वापर शेतीत फायदेशीर ठरू लागला आहे. मूळ ब्राझीलमधील कंपनी असलेल्या सॉलिक्स स्प्रेअरनं सौर उर्जेवर चालणारा रोबो विकसित केला आहे. हा रोबो दिवसाला 50 एकर क्षेत्रावर फवारणी करतो.
Weeding Machine
Weeding MachineAgrowon
Published on
Updated on

तेलंगणा उपलब्ध करून देणार कृषी क्षेत्रातील डाटा  

तेलंगणा राज्यात देशातील पहिलं अॅग्रीकल्चर डाटा एक्स्चेंज आणि अॅग्रीकल्चर डाटा मॅनेजमेंट फ्रेमवर्क प्रोग्राम लॉच करणं राज्य ठरलं आहे. यातून शेती क्षेत्रात डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यात येणार आहे. त्यासाठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्सशी तेलंगणा सरकारनं सहकार्य घेतलं आहे. उद्योग क्षेत्राला कृषी क्षेत्रातील डेटाचा यातून दिला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी मदत होईल, असा दावा तेलंगणा राज्य सरकारकडून करण्यात आला आहे.

सह्याद्री करणार काजूवर प्रक्रिया

शेतमाल प्रक्रियेसाठी खाजगी क्षेत्रातून पुढाकार घेतला जात आहे. दिवसेंदिवस शेती क्षेत्रात खाजगी गुंतवणूक वाढ होत आहे. नाशिक येथील सह्याद्री फार्मस प्रोड्यूसर कंपनीनं काजूवर प्रक्रिया करणारं युनिट नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथे उभारलं आहे. या प्रकल्पातून दरदिवशी १०० टन काजूवर प्रक्रिया केली जाणार आहे. राज्यात प्रामुख्यानं कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात काजूचं पीक घेतलं जातं. परंतु काजू पिकावर प्रक्रिया करणारे उद्योग निर्माण झालेले नाहीत. त्यामुळे काजू उत्पादकांची अडचण होते.

Weeding Machine
International Dog Day 2023 : कुत्र्याबद्दलच्या या मजेशीर गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

प्रकाश सापळा भाजीपाला पिकांसाठी ठरतो फायद्याचा 

भाजीपाला पिकांमध्ये किडीचा प्रादुर्भाव सध्या वाढतो आहे. त्यामुळे भाजीपिकांचं नुकसान होत आहे. या किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करत आहेत, परंतु किटकनाशकांवरील वाढता खर्च शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या परवडत नाही. भाजीपाला किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रकाश सापळा उपयुक्त ठरतो आहे. बाजारात सध्या प्रकाश सापळे उपलब्ध झाले आहे. कीटक रात्रीच्या वेळी पिकांवर बसतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी या कीटकांना आकर्षित करण्याचं काम प्रकाश सापळा करतो. त्यासाठी खर्च कमी येत असल्याचं जाणकार सांगतात.

रोव्हरमुळं होणार जमिनीची मोजणी सोपी

जमिनीच्या मोजणीसाठी इटीएस पद्धत वापरली जाते. परंतु ही पद्धत वेळखाऊ आणि खर्चीक आहे. त्यात भूमीअभिलेख कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. त्यामुळे शेतकरी शेत जमिनीचं मोजमाप करण्यास टाळाटाळ करतात. परंतु आता मात्र रोव्हरच्या मदतीनं शेत जमीन मोजणी करता येणार आहे. नाशिक जिल्ह्यात या प्रयोगाला सुरुवात झाली आहे. यामध्ये उपग्रहाच्या मदतीनं ज्या ठिकाणची जमीन मोजायची आहे तिथला अक्षांश आणि रेखांश दाखवला जातो. या सिग्नलच्या मदतीनं ऑटोकॅडसारख्या सॉफ्टवेअरचा वापर करून जमिनीची मोजणी केली जाते.

रोबोचा वापर भारतीय शेतकऱ्यांना करता येईल का? भारतात हा रोबो उपलब्ध आहे का ?

आपल्या देशातील शेती तुकड्यात विखुरलेली आहे. त्यात मजूराची टंचाई आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना शेती मशागतीच्या कामांसाठी वेळेवर मजूर मिळत नाही. शेतकऱ्यांना शेती करताना काय अडचणी येतात, असं विचारलं तर मजूर मिळत नाही असं सांगतातच. तसच मिळालंच मजूर तर त्यासाठी अधिकचे पैसे द्यावे लागतात, अशी तक्रारही शेतकऱ्यांची असते. त्यामुळं अनेकदा वेळेवर मजूर मिळालं नाही तर पिकाला फटका बसतो.

आर्टिफिशयल इंटेलिजन्सचा वापर शेतीत फायदेशीर ठरू लागला आहे. मूळ ब्राझीलमधील कंपनी असलेल्या सॉलिक्स स्प्रेअर या कंपनीनं सौर उर्जेवर चालणारा रोबो विकसित केला आहे. हा रोबो दिवसाला ५० एकर क्षेत्रावरील तणावर फवारणी करतो.

सध्या वापरत असलेल्या ड्रोनपेक्षा कमी खर्चात फवारणी पूर्ण करण्याची क्षमता या रोबोची असल्याचा कंपनीचा दावा आहे. भारतातील शेतकऱ्यांना तणाची समस्या डोकेदुखी ठरत आहे, सॉलिक्स स्प्रेअरनं हेच हेरून येत्या वर्षात भारतातील बाजारपेठेत रोबो उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू केल्या आहेत. रोबोमध्ये आर्टिफिशयल इटेलिजन्सचा वापर करण्यात आला आहे. हा रोबो सेन्सरच्या मदतीनं फक्त पिकातील तणावर फवारणी करतो.

त्यामुळे कीटकनाशक वाया जात नाही. गेल्या हंगामात अमेरिकतील मका उत्पादक शेतकऱ्यांना रोबोचा फायदा झाल्याचं कंपनीनं म्हंटलं आहे. आशिया देशातील बाजारपेठ लक्षात घेऊन कंपनीनं अमेरिकतील तीन कंपनीच्या मदतीनं भारतातही रोबो उपलब्ध करून देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com