Weed Control Machine: लहान शेतकऱ्यांची पिकातील तणाची कटकट आता संपणार?

पिकातील तण काढणीची शेतकऱ्यांना चिंता असते. वेळेवर मजूर मिळत नाही. त्यामुळे पिकापेक्षा तण अधिक वाढतं. परिणामी उत्पादन घट येते. जगभरात विकसित होणाऱ्या कृषी तंत्रज्ञानामुळे तण समूळ नष्ट करणं शक्य होतं आहे.
Weed Control Machine
Weed Control MachineAgrowon

1) महात्मा फुले कृषी विद्यापीठानं केली २८ अवजारांची निर्मिती

हवामान बदलाचा शेती क्षेत्राला मोठा फटका बसतो आहे. पावसांचं असमान वितरण आणि तापमानातील वाढ यामुळे सिंचनाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञानाला चालना दिली जात आहे. पिकांच्या आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जातोय. जीपीआय, सेन्सर्सचा वापर करून पिकाच्या गरजेनुसार पाणी देणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर पुढील काळातही महत्वाचा ठरणार आहे, असं अभ्यासकांचं मत आहे.    

2) पिकांना पाणी देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर 

पिकाच्या आंतरमशागतीसाठी विविध कृषी अवजारे महत्त्वाची असतात. खुरपी, विळा, कोयता यासारख्या अवजारांपासून तर ट्रॅक्टरचलित लावणी, काढणी यंत्र शेती कामात मोलाची ठरतात. राहूरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठानं अत्याधुनिक पद्धतीच्या २८ अवजार विकसित केले आहेत.

यामध्ये ज्योती बहुपीक लागवड यंत्र, नांगर, ऊस लागवड यंत्र, फळबागातील तण काढणी यंत्र, शेवगा काढणी अवजार, वैभव विळा, लक्ष्मी विळा, खुरपे, कोयता, भुईमग काढणी अवजार, बी टोकण यंत्र, सायकल कोळपे, ज्वारी काढणी चिमटा इत्यादी अवजारांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या संकेतसंस्थळावर त्यांची सविस्तर माहिती पाहता येईल.

3)आयसीएआर करणार फ्लिपकार्ट आणि जिओशी करार

मागील माहिन्यात भारतीय कृषी संशोधन परिषद म्हणजेच आयसीएआरनं अॅमेझोनसोबत कृषी तंत्रज्ञानला चालना देण्यासाठी करार केला आहे. या करारानंतर आता आयसीएआरनं कृषी तंत्रज्ञानासाठी फ्लिपकार्ट आणि जिओसारख्या इतर खाजगी कंपन्यांशी करार करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. शेतकऱ्यांचं उत्पन्नात वाढ करण्यासाठी एक आराखडा करून त्यानुसार काम करण्याची योजना आयसीएआरनं आखली आहे. तशा सूचना अॅमेझोनला दिल्या आहेत, अशी माहिती आयसीएआरचे उपमहासंचालक यू.एस. गौतम यांनी दिली.     

Weed Control Machine
AI Mobile App : शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मोबाईल ॲप

4) शेतकरी आणि प्रक्रिया उद्योगासाठी 'सौदाबुक'

शेतमालाची मूल्यसाखळी विकसित करण्यासाठी खाजगी कंपन्यांचा प्रयत्न सुरू आहे. २०१६ साली स्थापन झालेल्या फार्ममार्ट या खाजगी अ ॅग्रीटेक कंपनीनं शेतकरी आणि अन्नप्रकियादार यांच्यासाठी सौदाबुक नावाचा ऑनलाइन प्लॅटफॉर्म उभारला आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेतकरी शेतमाल थेट प्रक्रियादारांना विक्री करू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफाही मिळू शकतो, असा दावा कंपनीनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात केला आहे.

5) अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी तण काढणी यंत्र फायदेशीर

पिकातील तण काढणीची शेतकऱ्यांना चिंता असते. वेळेवर मजूर मिळत नाही. त्यामुळे पिकापेक्षा तण अधिक वाढतं. परिणामी उत्पादन घट येते. जगभरात विकसित होणाऱ्या कृषी तंत्रज्ञानामुळे तण समूळ नष्ट करणं शक्य होतं आहे. अमेरिकेत तर लेझर बेस विड कंट्रोल मशिन वापरले जात आहेत. परंतु देशातील शेतीचं तुकडीकरण लक्षात घेता, मोठे यंत्र वापरण्यास समस्या निर्माण होतात.

त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सनेडो यंत्र विकसित केलं आहे. रिक्षा-ट्रॅक्टरच्या आकाराच्या या यंत्राला तीन आणि चार चाक दिलेली आहेत. पिकांच्या आंतरमशागतीसाठी त्याचा वापर करता येतो. या यंत्राच्या इंजिनची क्षमता १० एचपी आहे. प्रति तास या यंत्र ८०० मिली डिझेल लागतं. यातून शेतकऱ्यांना कमी तण नष्ट करता येतं. अल्पभूधारक शेतकरी या छोट्या यंत्राच्या मदतीनं पिकातील तण नष्ट करू शकतात. या यंत्राची किंमत १ लाख २५ हजार आहे. भारतातील विविध कंपन्यांकडून या यंत्राची निर्मिती केली जात आहे. त्यांची किंमतही क्षमतेनुसार ठरवलेली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com