तंत्रज्ञान वेगाने बदलत असल्याने त्याचा शेती क्षेत्रावर (Agriculture Technology) परिणाम दिसून येत आहेत. शेतकऱ्यांना ‘सलाम किसान' (Salam Kisan) या उपक्रमाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान (Modern Technology) उपलब्ध करून देण्यात येत आहे. यापैकीच एक म्हणजे ड्रोन तंत्रज्ञान. (Drone Technology) शेतकरी आता ‘सलाम किसान'च्या मदतीने आपल्या शेतात ड्रोनच्या मदतीने पेरणी (Drone Sowing), फवारणी (Drone Spraying) करू शकतील. ड्रोनमुळे अवघ्या ६ ते ७ मिनिटांमध्ये एका एकरावर फवारणी करता येऊ शकेल. शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. शेतीमध्ये भूमीअभिलेखाच्या नोंदी (Land Record), खते, किटकनाशक फवारणीसाठी ड्रोनच्या वापरला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.
शेतीत ड्रोन वापरण्याचे फायदे पुढीलप्रमाणे आहेतः
हवामानात अचानक होणाऱ्या बदलामुळे होणारे शेतमालाचे नुकसान कमी करण्यास मदत.
पिकांवर फवारणी करता येते.
जिओ फेन्सिंग.
पिकाचे निरीक्षण करता येते.
जमिनीचे निरीक्षण होते.
पशुधन व्यवसायावर नजर ठेवता येते.
पिकांची तपासणी करता येते.
रसायनांचा अतिरिक्त वापर टाळता येतो.
ड्रोनची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेतः
ड्रोनच्या वापरामुळे मजुरांच्या तुलनेत दुप्पट काम होऊ शकते. वेळ वाचतो.
पारंपरिक फवारणी पद्धतीच्या तुलनेत खते व किटकनाशकाची बचत होते.
ड्रोनला तुलनेने खर्च कमी येतो.
ड्रोनमध्ये काढता येणारी टाकी, कमी खर्चाचा साचा आणि किटकनाशकांच्या योग्य फवारणीची सुविधा उपलब्ध असते.
या ड्रोनचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे ड्रोन३० किलो वजन सहन करू शकते. त्यामध्ये एक टॅंक फिट केला आहे ज्यामध्ये बियाणे लोड केले जाते. त्यानंतर हे ड्रोन शेताच्या वरून उडवून ते ड्रोन बियाणे सरीमध्ये व्यवस्थित टाकते.
ड्रोन कसे काम करते?
ड्रोनला मॉडीफाय करून त्यामध्ये असलेल्या टाकीच्या खाली सीड ड्रील सारखे होल फनल जोडून त्याच्या साह्याने बियाणे पेरणी केली जाते.
ड्रोन कसा ऑपरेट करतात?
ड्रोन ऑपरेट करण्यासाठी शेतकऱ्यांना त्याचा पुरेपूर ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यासाठी मोबाईल किंवा टॅबलेटमध्ये गुगल मॅप च्या साह्याने शेताचा नकाशा फीड करावा लागतो. त्यानंतर लोड केलेले बियाणे किंवा बॅटरी संपत नाही तोपर्यंत लोड केलेल्या नकाशाप्रमाणे त्या शेताच्या क्षेत्रात बियाणे लागवडीचे काम केले जाते. बियाणे किंवा बॅटरी संपल्यानंतर ड्रोन आपोआप आपल्या जागेवर लँड होते.
या ड्रोनमुळे लागवडीसाठी ट्रॅक्टरची गरज राहणार नाही. शेतकरी शेताच्या एका कोपऱ्यात उभे राहून लागवड करू शकतात. ड्रोनच्या फनेलद्वारे आवश्यक तेवढेच बियाणे टाकले जाते त्यामुळे बियाण्याची नासधूस थांबते. तसेच हा ड्रोन मॅपच्या साह्याने दाखवलेल्या दिशेनेच चालते. त्यामुळे बियाणे सारख्या अंतरावर पेरले जाते. पिके एका रेषेत उगवतात.
किटकनाशक फवारणीसाठी वापर
मागल्या वर्षी २०२० मध्ये राजस्थान येथे नाकतोडा आक्रमण ड्रोनच्या साहाय्याने किटकनाशक फवारणी करून आटोक्यात आणले होते. त्याचे चांगले परिणाम दिसून आले. ड्रोनचा वापर प्रामुख्याने उंच असलेल्या ठिकाणी फवारणीसाठी केला जातो कारण अशा ठिकाणी माऊंटेड स्प्रेयर पोहोचू शकत नाही. ड्रोनच्या साह्याने एका तासात दहा एकर क्षेत्रामध्ये किटकनाशक फवारले जाते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.