प्रदीप साबळे, संकेत जाधवAgriculture Tractor Equipment: आजच्या काळात ट्रॅक्टर क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाची भर पडली असून सिंक्रोमेष गिअरबॉक्स हाय-लो शटल, ऑटोमॅटिक गिअरशिफ्ट यांसारख्या प्रणाली उपलब्ध झाल्या आहेत. तरीदेखील बहुतांशवेळी अवजड कामामध्ये योग्य ती ताकद ट्रॅक्टरला मिळत नाही. परिणामी ट्रॅक्टरच्या कार्यावर त्याचा परिणाम होतो. उदाहरणार्थ, ऊस ट्रॉली ओढण्यासाठी ट्रॅक्टरला खूप ताकदीची गरज असते. काही वेळेला ट्रॉली शेतामधून काढत असताना योग्य ताकद न मिळाल्यामुळे ट्रॅक्टरचे टायर जागच्या जागी फिरू लागतात. .अशावेळी टायरचे घर्षण होऊन त्याची झीज होते त्याचबरोबर डिझेल विनाकारण वाया जाते आणि वेळही वाया जातो. हे लक्षात घेऊन ५० किंवा त्यापेक्षा जास्त एचपी क्षमतेच्या ट्रॅक्टरमध्ये ऱ्हायनो-हॉर्स या नव्या गिअर सिस्टिमचा अवलंब करण्यात येत आहे. या गिअर सिस्टिममुळे अवजड कामामध्ये ट्रॅक्टरला जास्त ताकद मिळते आणि शेतकऱ्याच्या गरजेनुसार ट्रॅक्टरचा वेग वाढवू शकतात. सध्या जरी हाय-लो गिअर सिस्टिम ट्रॅक्टरमध्ये असली तरी म्हणावी तेवढी ताकद मिळत नाही..Agriculture Technology: यंत्रसामग्रीच्या व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर.ऱ्हायनो-हॉर्स गिअर सिस्टिमऱ्हायनो गिअर : कमी वेगाने चालणारा, पण जबरदस्त ताकद देणारा गिअर. हा गिअर वापरून ट्रॅक्टर जड नांगरणी, ओझे वाहून नेणे किंवा कठीण शेतमातीवर काम करू शकतो.हॉर्स गिअर : हा गिअर जास्त वेग देतो, पण ताकद तुलनेने कमी असते. तो रस्त्यावर जलद वाहतूक आणि हलकी मशागतीसाठी फायदेशीर ठरेल..महत्त्वाची कारणेस्वस्त व टिकाऊऱ्हायनो-हॉर्स गिअर सिस्टिममधील गिअरबॉक्सची रचना अत्यंत साधी असल्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो महागडे स्पेअर पार्ट किंवा अत्याधुनिक साधनांची गरज नसते, त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचतो.हा गिअरबॉक्स जड कामासाठी अत्यंत योग्य आहे. लो गिअरमध्ये चांगली ताकद मिळाल्याने नांगरणी, रोटाव्हेटर, ट्रॉली ओढणे यांसारखी कामे सहज होतात. या गिअरचे दात जाडसर आणि मजबूत असल्यामुळे ग्रामीण भागातील धूळ, चिखल, उंचसखल रस्ते यांनाही ते चांगले तोंड देतात. योग्य वेळेवर ऑईल बदल आणि थोडीशी देखभाल केली तर हा गिअरबॉक्स दीर्घकाळ उत्तम चालेल..Tractor Sales: ट्रॅक्टर विक्रीला माॅन्सूनचा ‘बूस्ट’.दुरुस्ती सोपीया गिअर सिस्टिमची दुरुस्ती अतिशय सोपी आहे. गिअरबॉक्सची रचना साधी असल्यामुळे त्यात गुंतागुंतीचे किंवा महागडे पार्ट नसतात. त्यामुळे गावातील मेकॅनिकसुद्धा सहजपणे दुरुस्ती करू शकतात. सिंक्रोमेष गिअरप्रमाणे विशेष प्रशिक्षण किंवा आधुनिक साधनांची आवश्यकता नसते. स्पेअर पार्ट सहज उपलब्ध होतात. ट्रॅक्टरमध्ये काम करताना गिअरमध्ये काही अडचण आली तरी ती लगेच दुरुस्त करता येते. त्यामुळे ट्रॅक्टर दीर्घकाळ कार्यक्षम राहतो..शेतीसाठी योग्यभारतीय शेतीच्या परिस्थितीसाठी ऱ्हायनो-हॉर्स गिअर सिस्टीम अत्यंत योग्य ठरते. आपल्या देशातील शेती बहुतेक ठिकाणी उंचसखल, चिखलमय किंवा कठीण जमिनीत केली जाते. अशा परिस्थितीत ट्रॅक्टरला जास्त ताकदीची गरज असते. ही ताकद ऱ्हायनो-हॉर्स गिअरमध्ये सहज उपलब्ध होते. नांगरणी, रोटाव्हेटर, भुईमूग खोदणी, ऊस ट्रॉली ओढणे यांसारख्या जड कामात हा गिअरबॉक्स सक्षम ठरतो. तसेच हॉर्स गिअर वापरून शेतमाल जलदगतीने बाजारपेठेत नेता येतो. ग्रामीण भागातील धूळ, पाणी व चिखल अशा प्रतिकूल परिस्थितीतही ही प्रणाली चांगली काम करते..वाहतुकीत उपयोगीऱ्हायनो-हॉर्स गिअर सिस्टीमचा उपयोग केवळ शेतातील कामापुरता मर्यादित नसून ती वाहतुकीसाठीही अत्यंत उपयुक्त ठरते. हॉर्स गिअर वापरल्यास ट्रॅक्टरला जास्त वेग मिळतो. या गिअरमुळे रस्त्यावर लांब अंतर कापणे सोपे होते.ऱ्हायनो-हॉर्स गिअर सिस्टिमची वैशिष्ट्येघटक / वैशिष्ट्ये माहितीगिअर प्रकार कॉन्स्टंट मेश गिअरगिअर मांडणी १६F + ४R (Forward + Reverse)ऱ्हायनो गिअर कमी वेग, जास्त ताकद (नांगरणी, जड कामांसाठी योग्य)हॉर्स गिअर जास्त वेग, कमी ताकद (वाहतूक, शेतमाल ने-आण).तांत्रिक वैशिष्ट्येगिअरप्रकार वेग टॉर्क उपयुक्त कामऱ्हायनोगिअर कमी जास्त नांगरणी, जड काम, ओझे ओढणेहॉर्स गिअर जास्त कमी रस्त्यावर वाहतूक, हलकी कामे- प्रदीप साबळे ९९२२११५३३७(साहाय्यक प्राध्यापक, कृषी अवजारे व शक्ती अभियांत्रिकी विभाग, डॉ. डी.वाय.पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, तळसंदे, कोल्हापूर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.