Zero Tillage : समस्येपासून मिळविली मुक्ती

Agriculture Technology : दीपक जोशी यांचे कुटुंब चार पिढ्यांपासून कृषी, शिक्षण, क्रीडा, समाजकारणात अग्रेसर आहे. काळानुसार बदल स्वीकारून कुटुंबाची घोडदौड होते आहे. शेतीतील नवतंत्र अवलंबत शेतीमध्ये विना नांगरणीचा प्रयोग करत प्रगती साधली आहे.
Zero Tillage Crops
Zero Tillage CropsAgrowon
Published on
Updated on

Success Story of Zero Tillage : शेतकरी म्हणून हेच मागणं देवाकडे सुरू होतं. आणि विना नांगरणी, शून्य मशागत तंत्रज्ञान प्रताप चिपळूणकर या शेतीतील अवलिया अभ्यासकाने आमच्यापर्यंत पोहोचविलं. हे ज्ञान समजून उमजून आत्मसात केलं, शेतीला जोड देऊन जवळपास सहा एकरांवर राबविलंही. त्याचा परिणाम म्हणून एक असं शेत, ज्यात पावसाळा म्हटलं की जाणं शक्य होत नव्हतं ते आता पिकू लागलं. मातीतलं उपजाऊपण वाढलं आणि खर्चात मोठी कपात झाली. प्रतिकूलतेतही आपला खर्च वाजवी असल्यानं मिळणारं उत्पन्न बरं वाटायला लागलं, असे काहीसे शब्द आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगाव (ता. पैठण) येथील दीपक जोशी यांचे. म्हणतात ना काळानुरूप बदललं पाहिजे, अगदी तसंच जोशी कुटुंब पहिल्या पिढीपासून शेतीसह विविध क्षेत्रांत नावीन्याचा ध्यास घेऊन मार्गक्रमण करत आहे.

जोशी कुटुंब मूळचे बसनी (ता. जि. रत्नागिरी) इथले. अठराव्या शतकाच्या शेवटी मुंबई राज्यामध्ये महसूल खात्यात मोजणीदार असलेले दीपकराव यांचे पणजोबा पांडुरंग जोशी उद्योगधंद्यासाठी छत्रपती संभाजीनगरला आले. पिंप्रीराजा (ता. जि. छत्रपती संभाजीनगर) येथील योगी पुरुष ब्रह्मानंद स्वामी यांनी पांडुरंग यांना थांबवून घेतले. ब्रह्मानंद स्वामींनी हैदराबादच्या निजामाकडे शब्द टाकून पिंप्रीराजा जहागिरीतील जमिनी मोजणीसाठी पांडुरंग जोशी यांची नियुक्ती करून घेतली. आणि खऱ्या अर्थाने कोकणातलं जोशी कुटुंब मराठवाड्यातील पिंप्रीकर झाले. पांडुरंग जोशींना सहा मुलं. त्यापैकी दत्तात्रय, चिंतामण, वामन यांनी त्यांचा वारसा पुढे चालू ठेवला आहे. गावपातळीवरील सर्व सामाजिक उपक्रमात पिंप्री राजा आणि देवगाव येथे विस्तारलेल्या जोशी कुटुंबाचा सक्रिय सहभागी असतो.

Zero Tillage Crops
AI In Agriculture : कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित 'कृषी २४/७' पोर्टल येणार शेतकऱ्यांच्या भेटीला; केंद्रीय कृषी विभागानं दिली माहिती

अभ्यासपूर्ण शेतीस प्रारंभ

पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर दीपकरावांनी १९८४ मध्ये वडील पुरुषोत्तम जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला. विविध प्रयोगशील शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले. दीपकराव व्हॉलिबॉलचे उत्तम खेळाडू. शेती करत त्यांनी युवकांना एकत्र करून कब्बडी, व्हॉलिबॉलसारखे खेळ सुरू केले. यातूनच अनेक शेतकरी जोडले गेले. दीपकराव यांचे पुतणे पांडुरंग जोशी हे देखील पिंप्रीराजा शिवारातील शेतीत विविध प्रयोग करत असतात. हरितक्रांतीच्या काळात उत्पादकता वाढीसाठी जमिनीची पोषकता लाभकारक ठरली होती. मात्र कालपरत्वे ती पोषकता जपून ठेवणारे घटक कमी झाल्याने सेंद्रिय कर्ब जतन करण्याची गरज निर्माण झाली. त्यातूनच मागील पाच वर्षांपासून प्रताप चिपळूणकर यांच्या विनानांगरणी शेती, फक्त तण व्यवस्थापन या तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये अवलंब करत कोरडवाहू कापूस, तूर, रब्बी ज्वारी पीक घेण्यास सुरुवात केली.

तयार करतोय फोरम...

विनानांगरणी विषयी ‘ॲग्रोवन’मध्ये प्रकाशित झालेल्या यशोगाथेमुळे राज्यातील अनेक शेतकरी माझ्या संपर्कात आले. ‘विनानांगरणी शेतकरी मंच’ या नावे व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला. या तंत्रज्ञानाचा अवलंब करणारे राज्यातील साधारण २०० शेतकरी या ग्रुपद्वारे जोडले गेले आहेत. भविष्यात या तंत्रज्ञानाचा धोरणात्मक निर्णयात समावेश व्हावा म्हणून एक फोरम तयार करीत आहोत. त्यासाठीची प्राथमिक बैठक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घेतली.

Zero Tillage Crops
Agriculture Technology : पशुपालकांनो, माहिती तंत्रज्ञानाची साथ मोलाची...

‘जय जवान, जय किसान’ शेतकरी मंडळाची स्थापना

जय जवान, जय किसान शेतकरी मंडळामार्फत २०१० पासून प्रयोग राबविणे सुरू केले आहे. त्यात २०१४ मध्ये कपाशीमध्ये घन लागवड, विद्राव्य खतांचा वापर, ठिबक सिंचनाला प्रोत्साहन, माती परीक्षण, अभ्यास दौरे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे उपक्रम राबविले जातात.

एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या माध्यमातून २५ एकरांमध्ये स्वयंचलित यंत्राद्वारे कपाशी लागवडीचा प्रयोग, २०१३ ते १८ दरम्यान बी.टी. कापूस आणि देशी कापूस यांचा तुलनात्मक अभ्यास, कोरोना काळात ना नफा, ना तोटा तत्त्वावर भाजीपाला, फळे, धान्य यांचे साधारण २०० कुटुंबांना वितरण असे उपक्रम राबविण्यात आले. वर्ग-१ दर्जाच्या रेशीम कोष उत्पादनासाठी शेतकरी मंडळाचे शहादेव ढाकणे आणि सदाशिव गीते यांचा पुरस्कार देऊन सन्मानही झाला आहे.

कुटुंबात १० शिवछत्रपती पुरस्कार

सुधीर जोशी (संघटक), सौ. मंजिरी जोशी-कुलकर्णी (खेळाडू), ॲड. संकर्षण जोशी (खेळाडू), ऋग्वेद जोशी (खेळाडू) यांना एकवेळ, तर डॉ. मकरंद जोशी, डॉ. आदित्य जोशी व अमेय जोशी यांना प्रत्येकी दोन वेळा खेळाडू व मार्गदर्शक रूपात शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे. दीपक यांचा मुलगा डॉ. नीलेश जोशी हे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तर सारंग अविनाश जोशी व सौ. वृषाली जोशी राष्ट्रीय खेळाडू आहेत.

दीपक जोशी, ९८५०५०९६९२

‘ॲग्रोवन’ने वाढविला हुरूप

२०१२ मध्ये ‘जय जवान, जय किसान’ शेतकरी गटाच्या कार्याची दखल ‘ॲग्रोवन’ने घेतली. गटाला मिळालेली प्रसिद्धी पाहून गावातील युवकांचा शेतीत काम करण्याचा हुरूप वाढला. ॲग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी गटातील शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयोगांची प्रत्यक्ष भेट घेऊन दखल घेतली. त्यामुळे शेतकरी मित्रांना अधिक स्फूर्ती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com