Agriculture Technology: न्यूमॅटिक प्लांटर हे आधुनिक पेरणी यंत्र आहे. त्यातून प्रत्येक ओळीत निश्चित अंतरावर, समान खोलीवर आणि अचूक प्रमाणात एका वेळी एकाच बियाण्याची पेरणी करणे शक्य होते. पारंपरिक पेरणी पद्धतीत होणारा बियाण्याचा अपव्यय, असमान खोलीवरील पेरणीमुळे दिसणारी उगवणीतील असमानता या सारख्या समस्या टाळता येतात. हे यंत्र प्रामुख्याने मका, कापूस, सोयाबीन, सूर्यफूल, ज्वारी आणि विविध भाजीपाला पिकांसाठी उपयुक्त ठरते. सदर ट्रॅक्टरच्या ‘थ्री पॉईंट लिंकेज’ द्वारे हे यंत्र चालवले जाते. या यंत्राची खरेदी करण्यापूर्वी ते चालविण्यासाठी किमान ५० ते ६० एचपीचा ट्रॅक्टर आवश्यक असतो, हे लक्षात ठेवावे. .प्रमुख घटकन्यूमॅटिक प्लांटर मध्ये बियाणे व खतेपेटी, मिटरिंग यंत्रणा (प्लेट प्रकार किंवा न्यूमॅटिक / व्हॅक्यूम प्रकार), फाळ, बियाणे मातीत झाकण्यासाठी साधन व दाबण्याची (कॉम्पॅक्शन) यंत्रणा, चक्री आणि मजबूत फ्रेम असे प्रमुख घटक असतात..Modern Sowing Machines: संवेदकांनी परिपूर्ण आधुनिक पेरणी यंत्रे.कार्यपद्धतीट्रॅक्टरच्या गतीनुसार ड्राईव्ह व्हील (चक्री) फिरते. त्याच्याशी संलग्न मिटरिंग यंत्रणा प्रत्येक सेलमधून एकच बियाणे उचलून ठराविक अंतरावर चरामध्ये टाकते. त्यानंतर मातीने बियाणे झाकून योग्य दाब दिला जातो. मका पिकासाठी साधारणतः ६० ते ७५ सेंमी आणि दोन ओळीतील अंतर २० ते २५ सेंमी ठेवून पेरणी केली जाते..Sowing Machine : कृषिमंत्री सत्तारांनी केली आधुनिक पेरणी यंत्राची पाहणी.आपल्या आवश्यकतेनुसार पेरणीचे अंतर कमी जास्त करता येते. बियाण्याची खोली साधारण ४ ते ६ सेंमी ठेवणे शक्य होते. प्रिसिजन प्लॅंटरच्या वापरामुळे बियाण्यात २० ते ३० टक्के बचत होते. उगवण एकसारखी होते. उत्पादनात सुमारे १० ते १५ टक्के वाढ मिळते. मजुरी व वेळेची मोठी बचत होते..याच सोबत खतांची पेरणी केली जाते. परिणामी खताचा कार्यक्षम वापर होऊन पीक व्यवस्थापन सुलभ होते. मात्र या यंत्राची किंमत इतर पेरणी यंत्रापेक्षा जास्त आहे. ते चालविण्यासाठी प्रशिक्षित चालकाची आवश्यकता भासते. लहान व अनियमित आकाराच्या शेतांमध्ये पेरणी करताना काही मर्यादा असल्या तरी हे यंत्र उपयोगी आहे. मोठ्या शेतांसाठी ते आर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशीर ठरते. कारण मोठ्या शेतासाठी आवश्यक अधिक मजूर, पेरणीचा अधिक कालावधी या समस्यांवर मात करण्यात हे यंत्र उपयोगी ठरते.- ज्ञानेश्वर ताथोड ९६०४८१८२२० कृषी शक्ती व अवजारे विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.