Spray Indicator App : शेतकऱ्यांसाठी विकसित केले ‘फुले स्प्रे इंडिकेटर ॲप’

Agriculture Technology : मोबाइल ॲप्लिकेशन गूगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध असून ते इंटरनेटची सोय असताना म्हणजेच ऑनलाइन व इंटरनेटची सोय नसताना देखील म्हणजेच ऑफलाइन या दोन्हीही मोडमध्ये काम करते.
Pesticide
Pesticide Agrowon
Published on
Updated on

Pune News : पिकांवर कोणत्यावेळी फवारणी करावी याची माहिती होण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीने पुढाकार घेऊन फुले स्प्रे इंडिकेटर (फुले फवारणी सूचक) हे मोबाइल ॲप्लिकेशन (ॲप) विकसित केले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना फवारणीची योग्य वेळ ठरवण्यास मदत करून त्यांचा वेळ, पैसा व श्रम या तिन्ही गोष्टींची बचत करणारे फुले स्प्रे इंडिकेटर (फुले फवारणी सूचक) या मोबाइल ॲप्लिकेशनचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

मोबाइल ॲप्लिकेशन गूगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध असून ते इंटरनेटची सोय असताना म्हणजेच ऑनलाइन व इंटरनेटची सोय नसताना देखील म्हणजेच ऑफलाइन या दोन्हीही मोडमध्ये काम करते.

या फुले स्प्रे इंडिकेटर (फुले फवारणी सूचक) ॲपच्या आधारे शेतकऱ्यांना सध्याचे वातावरण हे पिकावर फवारणी करण्यास योग्य आहे की नाही हे डेल्टा टी चार्टच्या आधारे अत्यंत सोप्या पद्धतीने पाहता येते.

Pesticide
Spray Pump : फवारणी पंपांचे वितरण थांबवले?

या ॲप्लिकेशन (ॲप) च्या माध्यमातून फवारणी करण्यास सुयोग्य वेळ हिरव्या रंगाच्या माध्यमातून, फवारणी करण्यास साधारणतः योग्य वेळ पिवळ्या रंगाच्या माध्यमातून तर फवारणी करिता अयोग्य वेळ लाल रंगाच्या माध्यमातून दाखवली जाते व शेतकऱ्यांना फवारणी करण्याबाबतचा निर्णय घेणे अतिशय सोपे होते.

Pesticide
Agriculture Festival : परळीत उद्यापासून कृषी महोत्सव

हे ॲप्लिकेशन महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या एक्सलन्स सेंटर (गुणवत्ता केंद्र) : अद्ययावत व काटेकोर शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञान या प्रकल्पाअंतर्गत प्रमुख शास्त्रज्ञ पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने, माजी संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, सहयोगी प्रा. डॉ. सुनील कदम, डॉ. सोमनाथ माने या शास्त्रज्ञांच्या चमूने विकसित केले आहे.

हे ॲप्लिकेशन विकसित करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील व विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांचे मार्गदर्शन मिळाले.

‘फुले स्प्रे इंडिकेटर’ ॲप शेतकऱ्यांना वापरण्यासाठी अत्यंत सहज व सोपे आहे. अशा छोट्या, साध्या गोष्टीतूनच शेतकऱ्यांपर्यंत माहिती तंत्रज्ञान युगाचे फायदे खऱ्या अर्थाने पोहोचणार आहेत.
- डॉ. प्रशांतकुमार पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
‘फुले स्प्रे इंडिकेटर’ ॲप बदलत्या वातावरणामध्ये पिकांवर फवारणी करताना शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून कीटकनाशकांची योग्यवेळी फवारणी होऊन शेतकऱ्यांची बचत होणार आहे.
- डॉ. महानंद माने, सहयोगी अधिष्ठाता, कृषी महाविद्यालय, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com