शेतकरी पीक नियोजन : संत्रा

आमच्या एकत्रित कुटुंबाची १२ एकर शेती आहे. संपूर्ण क्षेत्रामध्ये संत्रा झाडांची लागवड आहे. बागेतील बहुतांश झाडे ३० ते ३५ वर्षे वयाची आहेत.
Orange
OrangeAgrowon
Published on
Updated on

शेतकरी ः गोपालराव बेलसरे

गाव ः हिंगणा कवीठा, ता.अचलपूर, जि.अमरावती

संत्रा क्षेत्र ः १२ एकर

एकूण झाडे ः १२०० झाडे

----------------------

आमच्या एकत्रित कुटुंबाची १२ एकर शेती आहे. संपूर्ण क्षेत्रामध्ये संत्रा झाडांची लागवड आहे. बागेतील बहुतांश झाडे ३० ते ३५ वर्षे वयाची आहेत. बागेतील ७०० झाडांना ठिबकद्वारे आणि उर्वरित ५०० झाडांना पाटपाणी पद्धतीने सिंचन केले जाते. सिंचनासाठी २ बोअरमधील उपलब्ध पाण्याचा वापर केला जातो. पैशाअभावी संपूर्ण बागेला ठिबक करणे शक्‍य झाले नाही. संपूर्ण संत्रा बागेचे व्यवस्थापन घातखेड येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतो. मागील दोन वर्षांपर्यंत संपूर्ण बागेचे व्यवस्थापन सेंद्रिय पद्धतीने करण्यावर माझा भर होता. परंतु फळांचा दर्जा राखण्यासाठी मर्यादित स्वरूपात रासायनिक खतांची शिफारशीत मात्रा देण्याचा निर्णय घेतला.

मागील कामकाज ः

- मी बागेत प्रामुख्याने आंबिया बहर धरतो. त्यानुसार डिसेंबर महिन्यात बाग ताणावर सोडली होती.

- ताण तोडण्याआधी झाडांना रिंग पद्धतीने सिंगल सुपर फॉस्फेट, पोटॅश, अमोनिअम सल्फेट याप्रमाणे रासायनिक खतांची मात्रा दिली. तसेच एकरी ३ ट्रॉली याप्रमाणे शेणखत दिले.

- जानेवारी महिन्यात बागेचा ताण तोडला. ताण तोडताना काही झाडांना पाटपाणी आणि काहींना ठिबकद्वारे पाणी दिले.

- बागेमध्ये नांगरणी, वखरणीची कामे करणे टाळले जाते. कारण या कामांमुळे संत्रा झाडांच्या मुळांना इजा होण्याची शक्यता असते.

- तणांचा प्रादुर्भाव पाहून नियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर केला.

- या वर्षी तापमानात अधिक वाढ झाली होती. त्यामुळे झाडाची पाण्याची गरज वाढली होती. त्यानुसार ठिबकद्वारे आठवड्यातून २ वेळ ५ ते ६ तास सिंचन केले.

पुढील २० दिवसांतील नियोजन ः

- सध्या बागेतील झाडांवर लिंबू आकाराची फळे लागली आहेत.

- कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी झाडांचे वेळोवेळी निरिक्षण केले जाईल. आवश्यकतेनुसार रासायनिक फवारणी घेतली जाईल.

- सद्यःस्थितीत बागेत कोणत्याही फवारणीची किंवा खताची आवश्यकता नाही.

- मॉन्सूनच्या पावसाचा अंदाज बागेची पाण्याची गरज पाहून सिंचन केले जाईल. पाऊस चांगला झाला तर सिंचन करणे थांबविले जाईल.

- सिंचनाचे योग्य नियोजन न केल्यास फळगळ होण्याचा अधिक धोका असतो. त्यामुळे सिंचनावर विशेष भर दिला जाईल.

---------------

- गोपालराव बेलसरे, ९०९६६८२०४१

(शब्दांकन ः विनोद इंगोले)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com