Modern 'Biodrum' Technology : सांडपाणी प्रक्रियेसाठी आधुनिक ‘बायोड्रम’ तंत्रज्ञान

Wastewater Treatment : पुणे जिल्ह्यातील बोपगाव (ता. पुरंदर) येथील ज्ञानेश्‍वर व पल्लवी या फडतरे दांपत्याने सांडपाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध पाणी मिळविण्यासाठी बायोड्रम हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
Modern Biodrum Technology
Modern Biodrum Technology Agrowon
Published on
Updated on

श्रीकृष्ण नेवसे

Biodrum Technology : पुणे जिल्ह्यातील बोपगाव (ता. पुरंदर) येथील ज्ञानेश्‍वर व पल्लवी या फडतरे दांपत्याने सांडपाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध पाणी मिळविण्यासाठी बायोड्रम हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. कमी जागेमध्ये उभारता येणारा प्रकल्प वीज आणि देखभाल खर्चातही मोठी बचत करणारा आहे. या प्रकल्पास भारत सरकारचे पेटंटही मिळाले आहे.


पुणे जिल्ह्यातील बोपगाव (ता. पुरंदर) येथील उद्योजक ज्ञानेश्‍वर दत्तात्रेय फडतरे आणि त्यांच्या पत्नी पल्लवी फडतरे यांनी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी पाणी शुद्धीकरणाचा प्रकल्प उभारला आहे. ज्ञानेश्‍वर हे बी.ई. (सिव्हिल), एम.टेक. (पर्यावरण अभियांत्रिकी) आहेत, तर पल्लवी एम.फार्म. व शेतकरी गटाशी संबंधित आहेत. ‘फडतरे एन्व्हाएरो सोल्युशन’ असे या दांपत्याच्या कंपनीचे नाव असून, त्यांनी विकसित केलेल्या सांडपाणी शुद्धीकरणाच्या तंत्रज्ञानाला ‘बायोड्रम’ असे नाव दिले आहे. या तंत्रज्ञानास भारत सरकारचे पेटंटही (स्वामित्व हक्क) प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पेटंट मिळविण्यासाठी १५७ देशांकडे प्रस्ताव देण्यात आला आहे.

किमान शंभर निवासी फ्लॅटसची इमारत किंवा गृहनिर्माण सोसायटीस बांधकाम परवानगी देताना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची प्रशासनाची अट असते. मात्र सांडपाणी शुद्धीकरणासाठी सध्या वापरामध्ये असलेल्या अनेक पद्धतीसाठी अदिक जागा आणि खर्च लागतो. त्याच प्रमाणे सातत्याने देखभाल करावी लागते. त्या तुलनेमध्ये फडतरे यांनी विकसित केलेल्या जैव पद्धतीवर आधारित या तंत्रज्ञानासाठी फारच कमी जागा लागते. त्यासाठी लागणारा प्रारंभिक खर्चही तुलनेने कमी असून, पुढे वीजही कमी लागते. त्याच प्रमाणे सांडपाण्यातील गाळ नियमितपणे बाजूला काढत राहण्याची गरजही फारच कमी (वर्षातून एकदा) असल्याचे ज्ञानेश्‍वर फडतरे यांनी सांगितले. या तंत्रज्ञानाविषयी बोलताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी किरण हसबनीस म्हणाले, की या प्रकल्पाच्या वापरासाठी किंवा व्यावसायिक वापरासाठी वेगळ्या मान्यतेची गरज नाही. शुद्धीकरण पाण्याविषयीचे मंडळाची जी मानके आहेत, तीच याला लागू होतात.

Modern Biodrum Technology
Modern Technology : शेतकऱ्यांपर्यंत नवतंत्रज्ञान पोचवा

तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये ः
- प्रचलित ‘मिक्स मीडिया बायो डायजेस्टर’ तंत्रज्ञानाची सुधारित आवृत्ती. जिवाणूंच्या कार्यावर आधारित प्रकल्प रचना.
- यात कुठल्याही रसायनाचा वापर होत नाही. हाताळण्यास सुलभ.
- स्क्रीन चेंबर, बायोड्रम, सँड फिल्टर, कार्बन फिल्टर, यूव्ही (निर्जंतुकीकरण) तंत्र यांचा समावेश.
- १५ वर्षांची ‘मेकॅनिकल वॉरंटी’.
- प्रति शंभर फ्लॅटसाठी दिवसाला ७० हजार लिटर प्रक्रियायुक्त पाणी, तसेच त्याहून अधिक क्षमतेचा प्रकल्पही उभारता येतो.
-प्रति दिन ७० हजार लिटर क्षमतेच्या प्रचलित प्रकल्पाची किंमत बांधकामासह २७ लाख रुपये येते. हीच किंमत ‘बायोड्रम’ पद्धतीत २० ते २२ लाख रुपयांच्या दरम्यान येते. या क्षमतेसाठी वार्षिक साडेचार ते पाच लाख रुपये वीजबिल. तर ‘बायोड्रम’साठी केवळ दीड ते दोन लाख रु. वीजबिल येते

- ७० हजार लिटर क्षमतेच्या प्रचलित प्रकल्पासाठी ५० ते ६० चौरस मीटर, तर बायोड्रम प्रकल्पास १५ ते १८ चौरस मी. जागा लागते.
-प्रचलित प्रकल्पात गाळाची विल्हेवाट लावण्यासाठी वार्षिक साडेतीन ते ४ लाख रुपये खर्च, तर बायोड्रम प्रकल्पात वर्षातून एकदाच १० हजार रुपये खर्च.
-‘बायोड्रम’ प्रकल्पात बंदिस्तपणा असल्याने दुर्गंधीचा त्रास होत नाही.

निमशहरी, शहरी भागात हा सहजपणे परवडणारा प्रकल्प आहे. मोकळ्या जागेसह भूमिगत तसेच टेरेसवर किंवा उंचावर तो बसविता येतो.
- ज्ञानेश्‍वर फडतरे
संपर्क ः ७५८८५८०४९४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com