Agriculture Technology : शेती तंत्र प्रशिक्षणात राज्याची देशात आघाडी

राज्यातील शेतकऱ्यांना मोफत शेती तंत्र प्रशिक्षण देण्यासाठी साडेसहा कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शास्त्रीय व तांत्रिक अंगाने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षणाचे पाठबळ देण्यात राज्याने देशात आघाडी घेतली आहे.
Agriculture Technology
Agriculture TechnologyAgrowon

पुणे ः राज्यातील शेतकऱ्यांना मोफत शेती तंत्र प्रशिक्षण (Agri Technology Training) देण्यासाठी साडेसहा कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शास्त्रीय व तांत्रिक अंगाने शेती (Modern Agriculture) करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षणाचे पाठबळ देण्यात राज्याने देशात आघाडी घेतली आहे.

आधुनिक शेतीचे प्रशिक्षण देणारा उपक्रम दोन महिन्यांपूर्वी राज्यभर सुरू झाला आहे. प्रत्यक्ष शास्त्रीय माहितीचे धडे, तज्ज्ञांकडून शंकासमाधान आणि प्रक्षेत्रांना भेटी अशा तीन मुद्द्यांभोवती हा उपक्रम केंद्रित करण्यात आला आहे. आतापर्यंत पाच हजार शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षण दिले गेले आहे. त्यावर राज्य शासनाने ९० लाख रुपये खर्च केले आहेत.

Agriculture Technology
Food Technology : अन्न तंत्रज्ञान उद्योगात करिअरच्या संधी

कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी शेतकऱ्यांनी ‘महाडीबीटी’मध्ये अर्ज केले आहेत. अशा अर्जदार शेतकऱ्यांना प्रशिक्षणात प्राधान्य दिले जात आहे. मात्र, कोणत्याही शेतकऱ्याने तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क केल्यास प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाईल, असे कृषी आयुक्तालयाचे म्हणणे आहे.

Agriculture Technology
Greenhouse Technology : हरितगृह तंत्रज्ञान सहकार्यासाठी नेदरलॅन्डच्या कंपन्या उत्सुक

देशात इतक्या व्यापक प्रमाणात तांत्रिक शेतीचे मोफत प्रशिक्षण देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य ठरले आहे. प्रक्रिया, शीतसाखळी, निर्यात, नव्या बागांची उभारणी, जुन्या बागांचे पुनरुज्जीवन, बहार व्यवस्थापन, भाजीपाला लागवड, रोपवाटिका, संरक्षित शेती, हरितगृह उभारणी, कीड-रोग व अन्नद्रव्य व्यवस्थापन असे विविधांगी विषय या प्रशिक्षणात समाविष्ट केले आहेत.

“जास्त उत्पन्न घेण्यासाठी आधुनिक शेतीशिवाय पर्याय नाही. मात्र, प्रशिक्षण न घेता शेतीचे प्रकल्प उभारले जात असल्यामुळे सल्लागार, मध्यस्थांचे फावते आहे. विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचे प्रकार घडतात. प्रशिक्षण घेतल्यानंतर शेतकरी प्रत्येक पाऊल अभ्यासपूर्वक टाकतो. अनावश्यक खर्च टळतो. त्यामुळेच राज्य शासनाने मोफत प्रशिक्षणावर भर दिला आहे,” अशी माहिती कृषी विभागाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.

‘शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा’

“शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी मार्च २०२३ अखेर एकूण सहा कोटी ५५ लाख रुपये खर्च करण्याची तयारी आम्ही ठेवली आहे. त्यासाठी नामांकित संस्था नियुक्त करण्यात आल्या आहेत. प्रतिशेतकरी प्रतिदिन त्यांना एक हजार रुपये दिले जात आहेत. निधीची टंचाई नसून आता शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यायला हवा,” अशी माहिती कृषी विभागातील प्रशिक्षण समन्वय विभागातून देण्यात आली.

कोणते मोफत प्रशिक्षण कुठे मिळते?

- महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी...आधुनिक डाळिंब शेती

- फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग, औरंगाबाद ...उच्च गुणवत्तेचा केशर आंबा उत्पादन

-फुले गुणवत्ता केंद्र, तळेगाव दाभाडे, पुणे ...डच तंत्रज्ञानावर आधारित फूल शेती

- राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे, पुणे... काढणीत्तर व्यवस्थापन, संरक्षित शेती

- महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ ...शेडनेट, पॉलिहाऊसमधील शेती

- कृषी महाविद्यालय, नागपूर... इंडो इस्राईल तंत्रज्ञानाची संत्रा शेती

- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली...जुन्या केशर आंबा बागांचे पुनरुज्जीवन

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com