Agriculture Technology : शेतजमिनीच्या सपाटीकरणासाठी उपयुक्त यंत्र, अवजारे

Agriculture Implements : गेल्या काही वर्षामध्ये यांत्रिकीकरण वेगाने वाढत आहे. मात्र त्या तुलनेमध्ये डोंगराळ भागामध्ये कामे करू शकतील, अशी यंत्रे अवजारे विकसित करण्याचे काम फारच सावकाश होताना दिसते.
Agriculture Implement
Agriculture ImplementAgrowon

योगेश रा. महल्ले, डॉ. उषा रा. डोंगरवार, प्रशांत बी. उंबरकर

Indian Agriculture : पूर्वी जमिनीचे सपाटीकरण हे प्रामुख्याने पिकांना पाणी देण्याच्या उद्देशाने केले जात असे. कारण पाटपाणी पद्धतीने पाणी सर्व रोपांपर्यंत योग्य रीतीने पोचण्यासाठी त्याची आवश्यकता होती. मात्र अलीकडे अधिक दाबावर चालणाऱ्या सूक्ष्म सिंचनाच्या विविध पद्धती सर्वसामान्यांपर्यंत पोचल्या आहेत.

अर्थात, त्यासाठीही काही प्रमाणात तरी जमिनीचे सपाटीकरण करण्याची आवश्यकता असते. गेल्या काही वर्षामध्ये यांत्रिकीकरण वेगाने वाढत आहे. मात्र त्या तुलनेमध्ये डोंगराळ भागामध्ये कामे करू शकतील, अशी यंत्रे अवजारे विकसित करण्याचे काम फारच सावकाश होताना दिसते.

जमीन सपाट नसल्यास येणाऱ्या अडचणी :

शेत जमीन उंचसखल असल्यामुळे पिकाला समप्रमाणात पाणी पोचत नाही.

शेताच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोचण्यास कमी अधिक जास्त वेळ लागतो.

पावसाचे किंवा सिंचनाचे पाणी हे सखल भागात साठून राहते. त्यामुळे रोपे पिवळी पडतात. अधिक काळ पाणी तसेच राहिले, तर पिकांची मुळे कुजून संपूर्ण रोप मरते.

विविध प्रकारचे यंत्रे अवजारे चालविण्यामध्ये अडचणी येतात. पेरणी असमान होण्याची शक्यता वाढते.

Agriculture Implement
Agriculture Technology : शेताची बांधबंदिस्ती करण्यासाठीची अवजारे

सपाटीकरणाच्या पारंपरिक पद्धती :

जमिनीची प्राथमिक मशागत झाल्यानंतर दुय्यम मशागत किंवा जमीन सपाटीकरणाकरिता बैलचलित किंवा ट्रॅक्‍टरचलित विविध यंत्रे व अवजारे वापरली जातात.

लाकडी फाटा : हे अवजार लाकडी ओंडक्यापासून बनविले जाते. १.५ ते २.० मीटर लांबीच्या जाडजूड अशा लाकडी फळीला लोखंडी साखळीने जोडून हे अवजार तयार होते. साखळीने बैलाच्या किंवा ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने जोडून सपाटीकरणाचे काम करता येते. याच्या साहाय्याने जमीन सपाटीकरणासोबतच काही प्रमाणात ढेकळे फोडण्याचे कामही होते. जमीन सपाट होतानाही काही प्रमाणात चोपली जाते. एका दिवसाला ३ ते ४ हेक्टर जमिनीचे सपाटीकरण होऊ शकते.

टेरेसर ब्लेड लेव्हलर : जमिनीचा उंच सखलपणा, खाच खळगे भरण्यासाठी दुसऱ्या जागेवरून माती ओढून - नेऊन भरण्याचे काम हे ट्रॅक्‍टरचलित अवजार करते. या अवजाराने एका दिवसात ४ ते ५ हेक्टर जमिनीचे सपाटीकरण करता येते. हे टेरेसर ब्लेड लेव्हलर १.५ ते ३.० मीटर रुंदी पर्यंत उपलब्ध आहेत.

ट्रॅक्‍टरचलित हायड्रोलिक लेव्हलर : जमिनीचे सपाटीकरण ही मोठा खर्चिक बाब ठरत आहे. त्यासाठी वेगवेगळी अवजारे, यंत्रे वापरण्यापेक्षा अधिक अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरद्वारे हे काम चांगल्या प्रकारे व कमी वेळात होऊ शकते. परिणामी खर्चात बचत होऊ शकते. ट्रॅक्‍टरचलित हायड्रोलिक लेव्हलर यासाठी उपयोगी ठरू शकतो. हायड्रोलिक लेव्हलर हा मजबूत असून, त्याचे वजन १०० किलो असते. त्यासाठी किमान ४५- ५० व त्यापेक्षा अधिक अश्वशक्तीचा ट्रॅक्‍टर अपेक्षित आहे. या अवजाराद्वारे जमिनीच्या सपाटीकरणाबरोबर शेतातील बांधबंदिस्ती, शेतातील पिकांचे अवशेष सफाई, अशीही काही कामे करता येतात.

Agriculture Implement
Agriculture Technology : अचुक अंतरावर, खोलीवर पेरणीसाठी यंत्रे

ट्रॅक्‍टरचलित लेसर मार्गदर्शित जमीन सपाटीकरण यंत्र :

शेतजमिनीच्या नेमक्या व अचूक सपाटीकरणासाठी लेसर लेव्हलर विकसित केलेले आहे. हे ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने चालविण्यात येणारे, लेसरच्या मार्गदर्शना खाली चालणारे जमिनीचे सपाटीकरण करणारे असे उपकरण आहे. याद्वारे लेसर किरणांच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्वयंचलितपणे जमिनीच्या सपाटीकरणाचे काम केले जाते.

या तंत्रामध्ये जमिनीच्या सपाटीकरणाची अचूक पातळी राखली जाते. अचूक सपाटीकरण झाल्यामुळे पाणी वापर कार्यक्षमतेत ५० टक्क्यांपर्यंत वाढ होते. या उपकरणामुळे बागायतीसाठी लागणाऱ्या पाण्यामध्ये ३०% इतकी प्रचंड बचत होते. पिकांच्या उत्पादनामध्ये वाढ होते.

ट्रॅक्‍टरचलित लेसर मार्गदर्शित जमीन सपाटीकरणाचे फायदे :

जमीन सपाटीकरणासाठी लागणारा वेळ कमी होतो.

सिंचनासाठी लागणारा वेळ व पाण्याची जवळ जवळ ३०% ने बचत होते.

संपूर्ण शेतजमिनीवर सारख्याच प्रमाणात पाण्याचे वाटप होते. यामुळे पाणी वापर कार्यक्षमतेत ५० टक्के वाढ होते.

जमिनीच्या एकसमानतेमुळे मातीचा ओलसरपणा टिकून राहतो.

पिकांचे एकसमान अंकुरण व वाढ सर्वत्र सारख्या प्रमाणात होते.

एकसमान खतमात्रेमुळे पीक उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होते.

हे यंत्र संपूर्णपणे स्वयंचलित असल्याने ऑपरेटरवर कमी भार येतो.

यंत्रातील कार्यरत घटक :

लेसर नियंत्रण व्यवस्थेसाठी एक लेसर ट्रान्समीटर (प्रेषक यंत्र किंवा प्रकाश किरण उत्सर्जन), एक लेसर रिसीव्हर (प्रकाश किरण प्राप्तकर्ता), सर्व्हे रिसीव्हर, एक इलेक्ट्रिक (विद्यूत) नियंत्रण पॅनेल, आणि एका दुहेरी लेसर नियंत्रण वॉल्व्ह, हायड्रोलिक सिलिंडर, लेव्हलर फळी (बकेट) व ग्राउंड व्हील इ.

हे तंत्रज्ञान कसे काम करते?

या तंत्रज्ञानामध्ये लेसर ट्रान्समीटर मधून फिरणारा लेसर प्रकाशाचा झोत हा सपाटीकरण करावयाच्या शेतात ६०० ते १२०० मीटर व्यासापर्यंत वर्तुळाकार पाठविला जातो. हे लेसर ट्रान्समीटर हे वेगवेगळ्या क्षमतेचे असतात. हे उत्सर्जित किरण लेव्हलिंग फरांडीवर बसवलेल्या लेसर रिसिव्हरद्वारे प्राप्त केले जातात. प्राप्त झालेले सिग्नल हे ट्रॅक्‍टरवर बसवलेल्या नियंत्रण पॅनेल रिसिव्हरकडे पाठविण्यात येतात.

तिथे या सिग्नलचा अर्थ लावला जातो. त्यानुसार हायड्रोलिक कंट्रोल वॉल्व्ह उघडतो किंवा बंद होतो. त्यामुळे लेव्हलर फळी (बकेट) उचलली जाते किंवा खाली केली जाते. या पद्धतीने जादा माती समपातळीत पसरवली जाते. लेव्हलरमधील हे कार्य स्वयंचलित पद्धतीने हायड्रोलिक नियंत्रण वॉल्व्हद्वारे केले जाते. अशा प्रकारे लेसर लेव्हलिंगने माती समपातळीत आणली जाते. लेसर लेव्हलिंग करण्याआधी शेताची मशागत करून फळी मारली जाते. त्यामुळे यंत्राने माती काढणे सोपे होते.

डॉ. उषा रा. डोंगरवार , ९४०३६१७११३

कृषी विज्ञान केंद्र, भंडारा ( साकोली)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com