ट्रॅक्टरचलित लेझर मार्गदर्शित लेव्हलरमध्ये सपाटीकरणाचे काम स्वयंचलित पद्धतीने केले जाते. या तंत्रामध्ये जमिनीच्या सपाटीकरणाची अचूक पातळी राखली जाते. सपाटीकरणामुळे पाणी वापर कार्यक्षमतेत ५० टक्के वाढ होते.एकसमान पेरणीची खोली तसेच पिकांची एकसमान वाढ होते. जमिनीचे सपाटीकरण हा शेती मशागतीतील आवश्यक भाग आहे. जमिनीच्या सपाटीकरणामध्ये एकसमान पातळीवर मोठ्या प्रमाणात भर दिला जातो. शेत जमिनीवरील असमानतेमुळे पिकाला समप्रमाणात पाणी दिले जात नाही. त्यामुळे दिलेले पाणी शेताच्या शेवटच्या टोकापर्यंत पोचण्यास जास्त वेळ तर लागतो. पाणी देखील जास्त द्यावे लागते. त्यामुळे पिकांची असमान वाढ होते, तणांचा जास्त प्रादुर्भाव दिसून येतो. परिणामी उत्पन्न आणि उत्पादन गुणवत्ता कमी होते. ट्रॅक्टरचलित लेझर मार्गदर्शित लेव्हलरचे फायदे
प्रभावी सपाटीकरणामुळे व्यवस्थापन करण्यासाठी लागणारे श्रम कमी होतात. धान्य गुणवत्ता, उत्पादन दोन्ही वाढते. ट्रॅक्टरचलित लेझर मार्गदर्शित लेव्हलरमध्ये सपाटीकरणाचे काम स्वयंचलित पद्धतीने केले जाते. या तंत्रामध्ये जमिनीच्या सपाटीकरणाची अचूक पातळी राखली जाते. या तंत्रज्ञानामध्ये प्रकाश किरण उत्सर्जित करण्यासाठी एक ट्रान्समीटर युनिट वापरतात, त्याला लेझर ट्रान्समीटर म्हणतात. जे शेतात १००० मीटर व्यासापर्यंत वर्तुळाकार प्रकाशकिरण सोडते. लेझर ट्रान्समीटर हे वेगवेगळ्या क्षमतेचे असतात. हे किरण लेव्हलर वर बसवलेल्या लेझर रिसीव्हरद्वारे प्राप्त केले जातात. प्राप्त झालेले सिग्नल हे लेव्हलर ब्लेड (फळी किंवा बकेट) खाली वर करून जादा माती समपातळीत पसरली जाते. लेव्हलरमधील हे कार्य स्वयंचलित पद्धतीने हायड्रॉलिक नियंत्रण व्हॉल्व्हद्वारे केले जाते. अशाप्रकारे लेझर लेव्हलिंग, माती समपातळीत आणली जाते. लेझर लॅंड लेव्हलर वापरण्याआधी शेताची मशागत करून साधी फळी मारली मारली जाते. जेणे करून यंत्रणेने माती काढणे सोपे होईल. लेझर ट्रान्समीटर (प्रकाशकिरण उत्सर्जन), लेझर रिसीव्हर (प्रकाशकिरण प्राप्तकर्ता), विद्युत नियंत्रित बोर्ड, हाइड्रोलिक सिलेंडर, कंट्रोल व्हॉल्व्ह, लेव्हलर फळी (बकेट), ग्राउंड व्हील. लेझर लेव्हलरसाठी ४० ते ४५अश्वशक्ती ट्रॅक्टरची आवश्यकता आहे. लेव्हलर ब्लेड (फळी) च्या रुंदी वरून किती अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरची गरज आहे हे ठरवले जाते. लेझर लॅंड लेव्हलरचे फायदे
सिंचनासाठी वेळ आणि पाणी बचत होते (३५ टक्यांपेक्षा जास्त पाण्याची बचत होते) पाण्याचे एकसारखे वितरण होते. सपाटीकराणामुळे पाणी वापर कार्यक्षमतेत ५० टक्के वाढ होते. एकसमान पेरणीची खोली तसेच पिकांची एकसमान वाढ होते. एकसमान खतमात्रेमुळे पीक उत्पन्नामध्ये १० ते १५ टक्के सुधारणा होते. पिकांसाठी अधिक एकसमान मातीचा ओलसरपणा टिकून राहतो. एकसमान अंकुरण आणि पिकांची जलद वाढ होते. पिकाच्या परिपक्व्तेमध्ये एकसारखेपणा येतो. जमिनीच्या सपाटीकरणामुळे पीक व्यवस्थापनाचे काम कमी होते. हे यंत्र संपूर्णपणे स्वयंचलित असल्यामुळे ऑपरेटरवर कमी भार येतो. संपर्क - डॉ.अमोल गोरे,९४०४७६७९१७ (कृषी अभियांत्रिकी विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, औरंगाबाद)