Digital Agriculture : चला, होऊयात डिजिटल साक्षर

सध्याच्या डिजिटल युगात शेतकऱ्यांमध्येही नवतंत्रज्ञानाचे वारे वाहत आहेत. यामध्ये महिला शेतकरीही मागे नाहीत.
Digital Agricultural
Digital AgriculturalAgrowon
Published on
Updated on

ऋषिराज तायडे

Indian Agricultural : सध्याच्या डिजिटल युगात शेतकऱ्यांमध्येही नवतंत्रज्ञानाचे वारे वाहत आहेत. यामध्ये महिला शेतकरीही मागे नाहीत.

पारंपरिक शेतीपासून ते कॉर्पोरेट, डिजिटल शेतीपर्यंत महिला शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग केले जात आहेत. अशाच नवतंत्रज्ञानाचा वापर करून आपली शेती समृद्ध करूयात...

पुरुषांच्या सोबत आज अनेक माता-भगिनी कृषिक्षेत्रात मोलाची कामगिरी बजावत आहेत, त्याचबरोबरीने नवनवीन प्रयोगही शेतीमध्ये करताना दिसतात. हेच प्रयोग आपल्याही शेतीमध्ये करता यावेत.

त्याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या हातातील मोबाईल चांगला उपयोगी पडू शकतो. तुमच्या मोबाईलमध्ये कृषिविषयक विविध अॅप, यू-ट्यूब, गुगल, न्यूजलेटरचा वापर करून तुम्हाला हवी ती माहिती मिळवता येते. त्याचा वापर तुम्हाला शेतीसाठीही करता येतो.

Digital Agricultural
Mobile Agriculture: मोबाईलमुळे शेतकरी चौथ्या लाटेवर स्वार

मोबाईल अॅप ः

आजकाल बहुतांश शेतकऱ्यांकडे अॅण्ड्रॉइड स्मार्टफोन आहेत. शेतीमधील नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळविण्यासाठी स्मार्टफोनचा प्रभावी वापर करता येतो. शेतीपूरक माहितीसाठी गुगल प्लेस्टोअरवर अनेक अॅप उपलब्ध आहेत.

त्यामध्ये कृषिविषयक मूलभूत माहितीसाठी हवामानविषयक माहिती, बाजारभाव, कीड, रोगांवरील प्रभावी उपाय, सेंद्रिय शेती, एकात्मिक शेतीविषयक माहिती मिळविण्यासाठी विविध अॅपचा वापर करता येतो.

यू-ट्यूब ः

मागील चार वर्षांत खेड्यांमध्ये देखील इंटरनेट पोहोचले आहे. इंटरनेटच्या मदतीने यू-ट्यूबचाही कृषिविषयक माहिती मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर करता येतो. कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषी संशोधक, प्रयोगशील शेतकऱ्यांचे कृषिविषयक माहिती यू-ट्यूबवर उपलब्ध आहे.

त्याशिवाय पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी काही तरुणांनी देशभरातील शेतीतील नवनवे प्रयोग सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचाही वापर आपल्या शेतीसाठी निश्‍चितच करता येतो.

Digital Agricultural
Mobile Van : नंदुरबार शहरात मोबाईल व्हॅन

गुगल ः

तुम्हाला पडलेल्या कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर मिळविण्यासाठी गुगल हा चांगला पर्याय आहे. कृषिविषयक कोणतीही माहिती जाणून घेण्यासाठी गुगलचा चांगल्याप्रकारे वापर करता येतो.

गुगलवर हवी असलेली नेमकी माहिती कशी शोधायची, हा प्रश्‍न काही शेतकऱ्यांना पडणे स्वाभाविक आहे. तुमच्या मोबाईलमधील गुगल अॅप सुरू करून त्यात टाइप करून अथवा बोलून (व्हॉइस टायपिंग) माहिती शोधता येते.

न्यूजलेटर ः

कृषिविषयक संस्था, विद्यापीठाकडून दर महिन्याला, आठवड्याला माहितीपर लेख प्रसिद्ध केले जातात. हे लेख न्यूजलेटरच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलवर वाचता येतात. त्यासाठी केवळ संबंधित संस्थेच्या वेबसाइटवर नावनोंदणी करण्याची आवश्यकता असते.

या न्यूजलेटरमध्ये तुम्हाला कृषिविषयक नवसंशोधन, पिकांच्या नव्या जाती, हवामानविषयक माहिती, बाजारातील चढ-उतार यासह अन्य महत्त्वपूर्ण माहिती दिलेली असते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com