Lemon Cutting Machine : लिंबाचे काप करणारे यंत्र

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाने लिंबाचे काप करणारे यंत्र विकसीत केले आहे.
lemon Cutting Machine
lemon Cutting Machine Agrowon
Published on
Updated on

उन्हाळ्यात लिंबाला प्रचंड मागणी असते. लिंबापासून सरबत, लोणचे आणि इतर प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले जातात. लिंबापासून कोणताही प्रक्रिया पदार्थ करताना प्रथम त्याचे काप करावे लागतात. हे काम अतिशय वेळखाऊ असते.

त्यामुळे ते मजूरांकडून करुन घ्यावे लागते. त्यामुळे खर्चात वाढ होते. ही गरज ओळखून अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाने लिंबाचे काप करणारे यंत्र विकसीत केले आहे. या यंत्राने अतिशय कमी वेळात लिंबाचे काप करता येतात.

lemon Cutting Machine
Lemon : अकोला जिल्ह्यात रुजतेय लिंबाचे हस्त बहर तंत्र

यंत्राची वैशिष्ट्ये काय आहेत?

या यंत्राद्वारे तासाला १५० लिंबाचे काप करता येतात. या यंत्राची कार्यक्षमता ९० ते ९५ टक्के आहे.

एका ठिकाणाहून यंत्र दुसरीकडे नेता येऊ शकते. तसेच या यंत्राची दुरुस्ती, हाताळणी सोपी असल्यामुळे घरगुती प्रक्रिया उद्योग करणाऱ्या महिलांसाठीही हे यंत्र उपयुक्त आहे.

व्यावसायिकदृष्ट्याही हे यंत्र उपयोगी आहे.

साधारणतः ३५ ते ४० हजारांपर्यंत हे यंत्र उपलब्ध होऊ शकते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com