

राज्यात हायड्रोपोनिक्स् प्रकल्प राबवण्यात येणार
शेती क्षेत्रातील जोखीम लक्षात घेऊन त्याचं व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीनं सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येऊ लागला आहे. हायड्रोपॉनिक्स, व्हर्टिकल फार्मिंग, एरोपॉनिक्स, ग्रो टॉवर असा नवा प्रकल्प राज्यात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी हायड्रोपोनिक्स् प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळानं मंजुरी दिली आहे. या प्रकल्पावर अंदाजे एक कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.
जमिनीच्या सपाटीकरणासाठी लेझर लेव्हलरचा वापर फायदेशीर
शेतकऱ्यांना जमिनीच्या चढ-उताराची अडचण होते. जमीन सपाट नसेल तर पिकाला पाणी किंवा खत देताना अडथळा निर्माण होतो. तसेच पिकात तणाचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे उत्पादनात घट येते. त्यामुळे जमिनीचं सपाटीकरण करणं गरजेचं आहे.
सध्या ट्रॅक्टर चलित लेव्हलिंग मशीनचा वापर करून जमिनीचं सपाटीकरण केलं जातं. परंतु आता लेझर लॅंड लेव्हलर या अत्याधुनिक यंत्राचा वापर फायदेशीर ठरतो आहे. ट्रॅक्टरचलित लेव्हलर लेझरच्या मदतीनं जमिनीचं सपाटीकरण करतं. ४० ते ४५ एचपी क्षमतेचा ट्रॅक्टरवर लेझर लेव्हरलं मशिन जोडता येतं. त्यामुळे ५० टक्के जलदगतीनं जमिनीचं सपाटीकरण करता येतं. या यंत्रामुळे वेळ आणि इंधनाची बचत होते, असं जाणकार सांगतात.
आधुनिक शेतीचं शेतकऱ्यांना मिळणार प्रशिक्षण
शास्त्रीय पद्धतीनं फळबागा तसंच आधुनिक शेतीचं प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यासाठी प्रशिक्षण संस्थांना अनुदान देण्यास कृषी विभागानं मान्यता दिली आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानामध्ये मनुष्यबळ विकास कार्यक्रम राबविण्याची तरतूद आहे. त्यासाठी प्रशिक्षण संस्थांची निवड झाली असून शेतकरी प्रशिक्षणाचा आराखडा निश्चित करण्यात आलाय.
ठाणे, पुणे, कोल्हापूर विभागातील शेतकऱ्यांना पुणे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत प्रशिक्षण मिळेल. तसंच नाशिक, औरंगाबाद, लातूर विभागांतील शेतकऱ्यांना बारामती कृषी विज्ञान केंद्रात तर अमरावती, नागपूर विभागांत पुण्याच्या साखर संकुलमध्ये महाराष्ट्र सहकार विकास महामंडळात प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
शेती क्षेत्रावर गुगल लक्ष केंद्रित करणार
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कृषी क्षेत्रात वाढतोय. चॅट-जीपीटीनंतर गुगलनेही कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित बार्ड हे टुल लॉच केलं आहे. गुगल आता १०० भारतीय भाषांचा समावेश असणाऱ्या एका मॉडेलवर काम करत आहे. त्याच्या मदतीनं भारतीय शेतीतील समस्या लक्षात घेऊन त्यावर उपाय सुचवणारं टुल गुगल इंडिया विकसित करणार आहे. या प्रकल्पावर गुगलची टीम काम करत असल्याची माहिती गुगल रिसर्च इंडियाचे संचालक मनीष गुप्ता यांनी दिली आहे.
स्टार्टअप कंपनीनं कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ट्रॅकरची निर्मिती
शेती मशागतीसाठी ट्रॅक्टर उपयुक्त ठरतो आहे. बहुतांश शेतकरी भाडे तत्वावर ट्रॅक्टर देऊन त्यातून व्यवसाय उभा करतायत. परंतु भाड्यानं ट्रॅक्टर दिल्यानंतर ट्रॅक्टर मालकाला आपला ट्रॅक्टर कुठे आहे? किती वेळ त्यानं मशागत केली? डिझेलचं प्रमाण किती आहे? तसेच किती क्षेत्रावर ट्रॅक्टरनं मशागत केली आहे? असे प्रश्न असतात.
हीच समस्या ओळखून कार्नोट टेक्नोलॉजी या स्टार्टअपनं कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ट्रॅकरची निर्मिती केली आहे. या ट्रॅकरच्या मदतीनं ट्रॅक्टरसह शेती अवजारावर लक्ष ठेवता येतं. ट्रॅक्टरला ट्रॅकर डिव्हाईस जोडल्यानंतर मोबाइल अॅपच्या मदतीनं ट्रॅक्टरच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईनं लक्ष ठेवता येतं. त्यामुळे डिझेलचा वापर आणि किती क्षेत्रावर पेरणी झाली याची अचूक माहिती ट्रॅक्टर मालकाला मिळते. त्यामुळे डिझेलची चोरी रोखता येते. मशागत क्षेत्राची अचूक माहिती मिळत असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.