Nursery : नव्या मूळखंड उत्पादन तंत्रामुळे रोपवाटिकाधारकांच्या नफ्यात वाढ

कोणत्याही रोपवाटिकेसाठी सर्वांत महत्त्वाचे असतात, ती मूळखंड किंवा कलम काड्या. या दोन्हींच्या उत्तम दर्जेदार उत्पादनाची गरज प्रत्येक रोपवाटिकाधारकांना भासते.
Agriculture Technology
Agriculture TechnologyAgrowon
Published on
Updated on

कोणत्याही रोपवाटिकेसाठी (Nursery) सर्वांत महत्त्वाचे असतात, ती मूळखंड किंवा कलम काड्या (Graft). या दोन्हींच्या उत्तम दर्जेदार उत्पादनाची (Quality Graft Production) गरज प्रत्येक रोपवाटिकाधारकांना भासते. मूळखंडाच्या वाढीसाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर) येथील ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल हॉर्टिकल्चर’ (Central Institute Of Tropical Horticulture) या संस्थेने नवीन पद्धत विकसित केली आहे. या पद्धतीचा वापर करीत हिमाचल प्रदेशातील सलोनी (जि. चंबा) येथील पवनकुमार गौतम (Pawankumar Gautam) यांनी स्वतःची रोपवाटिका उभारली आहे.

Agriculture Technology
रोपवाटिका व्यवसायातून साधली प्रगती

पवनकुमार यांचे कुटुंब आजोबापासून रोपवाटिका व्यवसायात कार्यरत आहेत. ३५ वर्षांपूर्वी आजोबांनी सफरचंदाच्या कलमांपासून रोपवाटिका व्यवसायाला प्रारंभ केला. त्यानंतर त्यांच्या वडिलांनीही व्यवसायामध्ये भर घालत क्षेत्र अर्धा हेक्टरपर्यंत वाढवले. दरम्यानच्या काळामध्ये प्रदेशातील शेतकरीही पारंपरिक पद्धतीने फळबाग लागवडीपेक्षा सघन पद्धतीवर भर देऊ लागल्याने रोपांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. तसेच पारंपरिक मूळखंडची (रूटस्टॉक) मागणी घटून आयता केलेल्या क्लोनल मूळखंडाची मागणी वाढली. मात्र त्यासाठी खर्चामध्ये वाढ होऊ लागल्यामुळे पवनकुमार यांच्या कुटुंबीयांना आर्थिक अडचणी येऊ लागल्या. त्यांना व्यवसायामध्ये वाढ करणे शक्य होत नव्हते.

Agriculture Technology
खरीप हंगामासाठी कांदा रोपवाटिका व्यवस्थापन

पवनकुमार यांनी धाडस करत २०१५ मध्ये अल्प प्रमाणात का होईना पण क्लोनल मूळखंडाच्या वाढीसाठी १०५ वर्गमीटर हरितगृहाची उभारणी केली. त्यामध्ये तेव्हा त्यांना संस्थेकडून उपलब्ध हरितगृह क्षेत्रामध्ये उभ्या पद्धतीने रोपवाटिका तयार करण्यासाठी मार्गदर्शन मिळाले. सुरुवातीच्या काळामध्ये आवश्यक निविष्ठा आणि मजूर यांचा खर्च ३५ हजार रुपयांनी वाढला. नवीन तंत्र शिकणे, त्याचा नियमित वापर करण्यामध्ये काही अडचणी आल्या तरी त्यांनी हिंमत हरली नाही. आज तेवढ्याच क्षेत्रामध्ये ७२०० रोपे अधिक तयार करता येत आहेत. त्याच प्रमाणे या मूळखंडांची विशेषतः त्यांच्या मुळांची वाढ उत्तम प्रकारे होते.

उत्पन्नात मिळाली चांगली वाढ

पूर्वी पवनकुमार यांना वळ प्रति वर्ष सफरचंदाच्या केवळ १८०० क्लोनल मूळखंडाचे उत्पादन मिळू शकत होते. त्यातून त्यांना प्रति वर्ष १.४५ लाख रुपये इतका नफा प्राप्त झाला. मात्र नव्या तंत्रज्ञानामुळे आज ७२०० क्लोनल मुळखंड तयार करता येऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नामध्ये ४.३० लाख रुपयांनी वाढ झाली. म्हणजेच त्यांच्या उत्पन्नामध्ये चार पटीने वाढ झाली. त्याच प्रमाणे पारंपरिक मुळखंडाकडून आधुनिक क्लोनल मूळखंडाकडे संपूर्ण रोपवाटिका वळविण्यातही त्यांना यश आले.

नव्या तंत्रज्ञानाचे ब्रॅण्ड अॅम्बॅसिडर!

पवनकुमार यांनी मिळालेल्या या यशामुळे क्लोनल मुळखंडाची निर्मिती आणि व्हर्टिकल पद्धतीने त्यांची वाढ करण्याचे तंत्राचा प्रसारही अन्य शेतकऱ्यांमध्ये वेगाने होऊ लागला. एका अर्थाने नव्या तंत्रज्ञानाचे ते ब्रॅण्ड अॅम्बॅसिडरच ठरले. डिसेंबर २०२१ मध्ये पवनकुमार यांच्या शेतामध्ये राज्यातील अन्य रोपवाटिकाधारकांसाठी संस्थेने पाच दिवसाचे एक प्रशिक्षणही आयोजित केले होते. त्यात २० रोपवाटिकाधारकांनी भाग घेतला होता. या प्रशिक्षणामुळे युरोप आणि अन्य देशातून आयात कराव्या लागणाऱ्या मूळखंडावरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे. त्यातून आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल सुरू झाली आहे.

------------------------

(स्रोत ः सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल हॉर्टिकल्चर, श्रीनगर, जम्मू आणि काश्मीर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com