Subsoiler Use : कोणत्या जमिनीत सबसॉयलरचा वापर करावा ?

जमिनीवरील आधीचे पीक, नंतर घ्यावयाचे पीक, तणांचा प्रकार व प्रमाण, स्थानिक हवामान आणि जमिनीचा प्रकार या बाबींवर जमीन नांगरणे आवश्यक आहे. अशी खोल नांगरट करण्यासाठी सबसॉयलरचा वापर केला जातो.
 subsoiler
subsoilerAgrowon
Published on
Updated on

उसासारखे बहुवर्षायू बागायती पीक आणि भुईमुगासारख्या काही पिकांना जमीन भुसभुशीत लागते, त्यासाठी नांगरट करणे आवश्यक असते.

दीर्घ मुदतीच्या काही पिकांसाठी खोल नांगरट करावी लागते. चिकण मातीचे प्रमाण ५० टक्के किंवा त्याहून अधिक असेल, तर अशा जमिनीतील निचरा क्षमता सुधारण्याकरिता तीन-चार वर्षांतून एकदा खोल नांगरट करतात.  

जमिनीवरील आधीचे पीक, नंतर घ्यावयाचे पीक, तणांचा प्रकार व प्रमाण, स्थानिक हवामान आणि जमिनीचा प्रकार या बाबींवर जमीन नांगरणे आवश्यक आहे. अशी खोल नांगरट करण्यासाठी सबसॉयलरचा वापर केला जातो.

पृष्ठभागाखाली तयार झालेला घट्ट थर फोडण्यासाठी सबसॉयलरचा वापर आवश्‍यक आहे. सबसॉयलर चालविण्यासाठी डिसेंबर ते मे महिन्याचा कालावधी चांगला असतो. 

सबसॉयलरचा वापर करताना...

सबसॉयलर जमिनीच्या पृष्ठभागाखालून १.५ ते २ फूट चालतो.याचा तळी फोडणारा टोकदार फाळ एक फूट लांबीचा असतो.जमिनीत जाणारी मांडी ही २.५ फुटांची असते.

हलक्‍या व कमी खोलीच्या जमिनीत १.५ फूट खोल आणि भारी, खोल जमिनीत १.५ ते २ फूट खोलीपर्यंत सबसॉयलर चालवावा.

नांगरटीपूर्वी ५ फूट अंतरावर सबसॉयलर चालवावा. सबसॉयलरने ट्रॅक्‍टरच्या अश्‍वशक्तीनुसार १.५ ते २ फूट खोलीपर्यंत नांगरट करून जमीन मोकळी केली जाते.

जमिनीच्या पृष्ठभागाखालील घट्ट थर फोडला जातो,त्यामुळे जमिनीत हवा भरून माती मोकळी होऊन जमीन भुसभुशीत होते. 

 subsoiler
Fodder : नेपियर चाऱ्याची कोणत्या जमिनीत लागवड करावी ?

जमिनीस वाफसा लवकर येऊन हवा खेळती राहते,त्यामुळे जमिनीची मशागत चांगली खोलवर करता येते.

जमिनीतील जास्तीच्या पाण्याचा व क्षाराचा निचरा होतो. 

जमिनीची भौतिक, जैविक व रासायनिक सुपीकता वाढण्यास मदत होते. पिकाच्या मुळांची वाढ चांगली होऊन पीक लोळण्याचे प्रमाण कमी होते.

सबसॉयलर चालविण्यापुर्वी जमिनीमध्ये असणारी पाण्याची पाइपलाइन, विजेची वायर असणाऱ्या ठिकाणी अगोदर मार्किंग करून घ्यावे, ते तुटणार नाही याची दक्षता घ्यावी.

सबसॉयलरचा वापर खोडव्यामध्ये करताना खोडकी, जमिनीलगत छाटलेली असावी. सबसॉयलर २ ते ३ वर्षांतून एकदा वापरावा. सबसॉयलरचा वापर केलेली जमीन ८ ते १५ दिवस उन्हामध्ये तापून त्यानंतरच पुढील मशागत करावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com