Agriculture Technology : ट्रॅक्टर कसा निवडावा?

Article by Dr. Sachin Nalawade : ज्याच्याकडे कमी अधिक शेती आहे, अशा कोणत्याही शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर खरेदी ही उत्तम गुंतवणूक ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही गुंतवणुक दीर्घकाळपर्यंत परतावा देत राहते.
Agriculture Tractor
Agriculture TractorAgrowon
Published on
Updated on

Agriculture Technology Tractor : पारंपरिक शेतीपासून प्रगतिशील शेतीकडे वळत असलेल्या शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रांची आणि तंत्राची सांगड घालावी लागते. कारण जुन्या काही बाबी आता तितक्या क्षमतेने वापरणे शक्य होत नाही. त्यातच गेल्या काही वर्षांमुळे मशागतीसह अन्य कामांसाठी पशुधनांची आणि मजुरांची कमतरता भासत आहे.

त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कल यांत्रिकीकरणाकडे वळत आहे. पण अनेकांना ट्रॅक्टरसारखी यंत्रे विकत घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाहीत. त्यांच्यासाठी आता विविध बॅंकांमार्फत नवनवीन कर्ज योजना तुलनेने सुलभ झालेल्या आहेत.

तुमच्या शेतासाठी सर्वोत्तम ट्रॅक्टर कसा निवडावा?

ट्रॅक्टर खरेदीचा निर्णय घेतल्यानंतर पहिला प्रश्‍न आपल्या मनात उमटतो, तो म्हणजे कोणता ट्रॅक्टर घ्यावा? त्यात सामान्यतः किती एचपीचा, कोणत्या कंपनीचा किंवा पिकानुसार अनेक शंका मनात असतात.

त्यांचे निरसन करण्यासाठी ट्रॅक्टर वापरत असलेल्या सहकारी शेतकऱ्यांबरोबर, तज्ज्ञांबरोबर चर्चा करावी. तसेच आपल्याला ट्रॅक्टरद्वारे कोणकोणती कामे करावयाची आहेत, याची यादी करावी. फक्त स्वतःच्या शेतातील कामे, भाडेपट्टीवर दुसऱ्याच्या शेतातही वापरणे किंवा माल वाहतुकीसाठी इ.

जर तुम्ही फक्त स्वतःच्या शेतातील कामांसाठी ट्रॅक्टर घेत असाल तर पुढील घटक महत्त्वाचे आहेत.

Agriculture Tractor
Agriculture Technology : ट्रॅक्टर : शेती विकासातील अष्टपैलू यंत्र

उद्देश

ट्रॅक्टरने करू इच्छित असलेल्या कामांचे मूल्यमापन करावे. त्यासोबत कोणकोणती अवजारे, यंत्रे जोडणार आहोत, याचा विचार करावा. त्यात साध्या नांगरांपासून मोल नांगरापर्यंत, ट्रेलरपासून अन्य यंत्रापर्यंत विविध घटकांचा समावेश असू शकतो.

ती जोडण्यासाठी योग्य ते जोड (ट्रेलर अटॅचमेंट) व त्यांना आवश्यक ऊर्जा पुरविण्यासाठी उत्तम पॉवर देण्याची क्षमता असल्याची खात्री करावी.

स्वतःची आर्थिक क्षमता (बजेट)

बजेट म्हणजे तुम्ही ट्रॅक्टरवर खर्च करण्यास तयार असलेली रक्कम. त्यामध्ये खरेदीसाठी लागणाऱ्या खर्चासोबतच प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), विमा खर्च इ. सर्व खर्च धरावेत. जर जुना ट्रॅक्टर खरेदी करणार असाल, तर त्याची सध्याची स्थिती आणि तो आणखी किती वर्षे सेवा देऊ शकेल, याचा अंदाज घ्यावा.

तसेच अशा ट्रॅक्टरची मालकी बदलण्यासाठीचा खर्च आणि तातडीच्या दुरुस्तीच्या खर्चाचा अंदाज घ्यावा. या अंदाजानंतर असो, तुम्ही तुमच्या बजेटमध्ये प्रत्येक खर्चाचा हिशेब द्यावा. असे केल्याने, ते तुम्हाला तुमचे आर्थिक खाते तपासण्यात मदत करेल आणि तुम्हाला ट्रॅक्टरच्या श्रेणीचा अंदाज देखील देईल.

देखभालीची सोय

ट्रॅक्टर हे एक यंत्र आहे. ते सुरळीत चालू ठेवण्यासाठी नियमित देखभालीची आवश्यकता असते. त्यामुळे नियमित देखभाल (सर्व्हिसिंग) करण्यासाठी वितरक किंवा स्थानिक गॅरेज उपलब्ध असावे. देखभालीचे अंतर आणि दर्जा हे खर्चातील प्रमुख मुद्दे आहेत. आपल्या भागामध्ये ज्या कंपनीच्या विक्रीनंतरच्या सेवा चांगल्या आहेत, अशा कंपनीच्या ट्रॅक्टरला प्राधान्य द्यावे.

अर्गोनॉमिक्स

ट्रॅक्टरचे विविध पैलू उदा. ट्रॅक्टरचे डिझाइन, केबिन, बसण्याची सोय, शेतजमिनीवर तसेच रस्त्यावरील त्यांचा वेग इ.ची नोंद घ्यावी.

Agriculture Tractor
Agriculture Technology : शेतीला होईल उपग्रहांची लक्षणीय मदत

नवीन, नूतनीकृत किंवा जुना

नवीन ट्रॅक्टर किंवा कंपनीनेच नूतनीकृत केलेला किंवा एखाद्या शेतकऱ्याकडून जुना ट्रॅक्टर घ्यावयाचा याचा स्वतः विचार करावा. ही बाब आपल्या आर्थिक क्षमतेप्रमाणे व विश्‍वासानुसार ठरते. जुन्या ट्रॅक्टरच्या खरेदी-विक्रीसाठी अनेक नवे ॲप बाजारात उपलब्ध आहेत. मात्र त्यावर खरेदी विक्रीचा व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीवर करावेत.

शेतजमीन

ट्रॅक्टर कमी ते उच्च शक्तीपर्यंत विस्तृत श्रेणीत उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या भूप्रदेशांनुसार त्यात काही प्रकार पडू शकतात. उदा. कमी शेती असल्यास कमी क्षमतेचा ट्रॅक्टर पुरेसा असतो. स्वतःच्या शेतीसोबत भाड्याने देण्याच्या उद्देशाने ट्रॅक्टर खरेदी करत असाल, तर त्याप्रमाणे नियोजन करावे. डोंगराळ प्रदेशामध्ये कामे करण्यासाठी किंवा वाहतुकीसाठी मध्यम ते उच्च शक्तीचे ट्रॅक्टर आवश्यक असतील.

अ) तुमच्याकडे शेती किती आहे?

काही वेळा केवळ मोठेपणाच्या नादाने आवश्यकतेपेक्षा मोठा ट्रॅक्टर खरेदी केला जातो. त्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते. पुन्हा त्याची ताकद पूर्णपणे वापरली जात नाही आणि घसारा व व्याजापोटी तोटा सहन करावा लागतो. आवश्यकतेपेक्षा कमी ताकदीचा ट्रॅक्टर घेतल्यास कामे वेळेत पूर्ण होत नाहीत.

म्हणजे ट्रॅक्टर घेण्याचा उद्देशच सफल होत नाही. वर्षातून एकच पीक घेतल्या जाणाऱ्या जमिनीसाठी प्रत्येक दोन हेक्टर जमिनीला एक अश्‍वशक्ती (हॉर्सपॉवर) पुरेशी होते. म्हणजेच ४० हेक्टर जमिनीसाठी २० ते २५ अश्‍वशक्तीचा ट्रॅक्टर पुरेसा होतो. मात्र बागायती व एकापेक्षा अधिक पिके घेतल्या जाणाऱ्या शेतासाठी ट्रॅक्टर घेत असाल, तर मोठा ट्रॅक्टर घ्यावा. त्यामुळे मोठी अवजारे वापरून कामे कमी वेळेत करणे शक्य होते.

अन्य कामांसाठी (उदा. पेरणी, कुळवणी, पफवारणी, मळणी, कापणी, ऊस वाहतूक इ.) ट्रॅक्टर वापरला जाणार असेल, त्यातील अवघड, वेळखाऊ आणि अधिक ताकद लागणारी कामे विचारात घेऊन आवश्यक तेवढा मोठा ट्रॅक्टर घ्यावा. काही तज्ज्ञांच्या मते, केवळ नांगरणीच्या उद्देशाने ट्रॅक्टर व त्याची ताकद ठरवणे योग्य नाही. कारण नांगरणी दरवर्षी करण्याची आवश्यकता नसते. हे काम भाड्याने ट्रॅक्टर घेऊनही पूर्ण करता येते. सामान्यतः भारतात ४५ ते ६० अश्‍वशक्तीचे ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणावर वापरले जातात.

ब) मातीचा प्रकार कोणता?

मातीच्या प्रकारानुसार कामे करतेवेळी प्रतिरोध होत असतो. जड माती (उदा. कापसाची काळी कसदार जमीन) सर्वांत जास्त विरोध करते, तर वाळूमिश्रीत मातीचा विरोध कमी असतो. हलक्या जमिनात एखादे अवजारे ज्या खोलीवर ज्या वेगाने काम करी शकते, त्याच खोलीवर तितक्या वेगाने काळ्या मातीत करू शकत नाही. म्हणजेच त्याच क्षमतेच्या ट्रॅक्टरचा वेग कमी करावा लागतो. म्हणजेच अशा जमिनीत कामे वेळेत पूर्ण करणे अवघड होते.

भारी जमिनीत वाफसा येण्यासाठी हलक्या जमिनीपेक्षा जास्त वेळ लागतो. म्हणजेच अशा जमिनीत कोणत्याही हंगामात काम करण्यासाठी मिळणारा वेळ कमी राहतो. म्हणजेच अशा जमिनीसाठी मोठ्या अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरची निवड करावी.

पुढील भागामध्ये ट्रॅक्टरची निवड करण्यासाठी आवश्यक तांत्रिक मुद्दे आणि गणिती सूत्रे पाहू.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com