Salam Kisan: सलाम किसान हे सुपरॲप इतरांपेक्षा वेगळे कसे?

सध्या शेतीविषयक अनेक ॲप उपलब्ध आहेत. परंतु ‘सलाम किसान' हे ॲप त्यांच्या तुलनेत वेगळे आणि अधिक चांगले आहे, असा कंपनीचा दावा आहे. ‘
Salam Kisan
Salam KisanAgrowon

शेतकऱ्यांची माहितीची भुक भागवण्यासाठी सध्या अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु विश्वासार्ह, अचूक आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर (Farmer Issues) तोडगा देणारी माहिती असेल तरच ती शेतकऱ्यांना निर्णय घेण्यासाठी उपयुक्त ठरते. या पार्श्वभूमीवर Prym Solutions Private Limited या कंपनीच्या वतीने ‘सलाम किसान' (Salam Kisan) हे सुपरॲप विकसित करण्यात आले आहे.

Salam Kisan
Salam Kisan: ९० सेंकंदात माती परीक्षण करणे शक्य होणार

सध्या शेतीविषयक अनेक ॲप उपलब्ध आहेत. परंतु ‘सलाम किसान' हे ॲप त्यांच्या तुलनेत वेगळे आणि अधिक चांगले आहे, असा कंपनीचा दावा आहे. ‘

सलाम किसान' ॲपची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:

या ॲपसाठी कोणतेही शुल्क नाही. त्याचे सब्स्क्रिप्शन मोफत आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पीक दिनदर्शिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापनाविषयी कस्टमाईज्ड स्वरूपात ॲलर्ट मिळतील. या ॲपमुळे शेतकऱ्यांना केवळ ९० सेकंदात थेट बांधावर माती परीक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे.ऑफलाईन पेमेंटची सुविधा या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल. हे ॲप वापरायला अधिक सोपे आहे.

Salam Kisan
Salam Kisan: शेतीतल्या सर्व अडचणींसाठी ‘सलाम किसान'ची सेवा

शेतकऱ्यांना या सुपर ॲपच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान आणि सेवांचा पुरवठा केला जाणार आहे. शेती मूल्यसाखळीतील सर्व घटकांना ‘एन्ड टू एन्ड सोल्युशन' पुरवले जाईल, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. ‘सलाम किसान'च्या माध्यमातून शेतकऱ्यानी प्रगत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच विविध उत्पादने आणि सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांच्या (बियाणे, खते, किटकनाशके, बुरशीनाशके इ.) पुरवठ्यापासून ते त्यांच्या शेतीमालाच्या विक्रीव्यवस्थेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर ‘सलाम किसान'ची सेवा उपलब्ध असेल. शेतीमालाच्या पुरवठा मूल्यसाखळीमध्ये शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा मिळवून देण्याचा हा प्रयत्न असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

सलाम किसान कोणत्या सेवा पुरवते?

हवामान अंदाज: शेतकऱ्यांना मिळेल दररोज हवामान अंदाजविषयक माहिती.

पीक दिनदर्शिका: शेतकऱ्यांना पिकांबद्दल लागवडीपासून ते काढणीपर्यंत मिळेल संपूर्ण माहिती.

माती परीक्षण: कमी वेळेत व कमी खर्चात करता येणार मातीचे परीक्षण.

ड्रोन सुविधा: ‘सलाम किसान'च्या मदतीने ड्रोनमुळे शेतात फवारणी करणे सोपे होईल.

पीकसंरक्षण: कीड व रोग व्यवस्थापनासाठी सर्वंकष मदत.

कृषी तज्ज्ञांचा सल्ला: ‘सलाम किसान'चे कृषी तज्ज्ञ देणार शेतीबद्दल वेळोवेळी सल्ला.

बाजार भाव: दररोजच्या बाजार भावाबद्दलची माहिती उपलब्ध करून देण्यात येईल.

बाजार उपलब्धता: शेतीमाल बाजाराबद्दल शेतकऱ्यांना माहिती देण्यात येईल.

वाहतुक सुविधा: शेतीमालाच्या वाहतुकीसाठी शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.

बातम्या: कृषी क्षेत्रातील घडामोडींची माहिती, बातम्या शेतकऱ्यांना मिळतील.

सलाम किसान शॉप: शेतीसाठी लागणारी सर्व उत्पादने एकाच जागेवर उपलब्ध करून देण्यात येतील. धनश्री मानधनी या ‘सलाम किसान'च्या संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक आहेत. प्रद्युम्न मानधनी हे कंपनीचे संचालक आहेत तर अक्षय खोब्रागडे हे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com