Precision Farming: शेतांमध्ये सेन्सरचा वापर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मातीचे महत्त्वाचे घटक जसे तापमान, आर्द्रता, सामू, क्षारता हे सर्व तपासण्यासाठी आता विविध सेन्सर्सचा वापर केला जातो. या सेन्सर्सच्या मदतीने पाण्याची, खतांची आणि खर्चाची बचत होऊन शेती अधिक सुखकर होत आहे. सेन्सरकडे अनेक शेतकरी खर्चिक पर्याय म्हणून दूर्लक्ष करतात परंतु तो खर्च नसून गुंतवणूक आहे. सेन्सर एकदा घेतले की अनेक हंगामांसाठी ते फायदेशीर राहते..मातीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रमुख सेन्सरमध्ये आर्द्रता सेन्सर, तापमान सेन्सर, सामू/ pH सेन्सर, ईसी सेन्सर, माती पोषण सेन्सर आणि सेंद्रिय कर्ब सेन्सर यांचा समावेश होतो. १. माती आर्द्रता सेन्सर (Soil Moisture Sensor)हा सेन्सर मातीमध्ये ओलावा किती आहे हे मोजतो. यामुळे कधी पाणी द्यायचे आणि किती द्यायचे याचा निर्णय सोपा होतो. शिवाय यामुळे पाण्याची बचत होते आणि पिकांना पाण्याचा ताण येत नाही. या सेन्सरच्या मदतीने पाण्याच्या वापरात ४० ते ६० टक्के बचत होते. .IoT in Animal Farming: सेन्सरमुळे वाढणार पशुपालनाची कार्यक्षमता.२. माती तापमान सेन्सर (Soil Temperature Sensor)हा सेन्सर मातीचे तापमान किती आहे हे सांगतो. बियाणांची उगवणी, अन्नद्रव्यांचे शोषण आणि मुळांची वाढ या सर्वांवर तापमानाचा परिणाम होतो. त्यामुळे हे मातीसाठी महत्त्वाचे सेन्सर आहे. याच्या वापराने शेतकरी योग्य तापमानात पेरणी आणि खतांचा वापर करु शकतात जे पिकाचे उत्पन्न वाढवण्यात मदत करतात. .३. माती सामू सेन्सर (Soil pH Sensor)मातीचा pH योग्य अवस्थेत नसेल तर पिके अन्नद्रव शोषू शकत नाहीत आणि पिकाची वाढ थांबते. हा सेन्सर माती आम्लीय, क्षारीय की तटस्थ आहे हे तपासतो. त्यानुसार मातीसाठी उपाययोजना करु शकतात आणि मातीचा सामू सुधारु शकतात. .४. EC सेन्सर (Electrical Conductivity Sensor)हा सेन्सर मातीमध्ये खारटपणा किंवा मीठाचे प्रमाण किती आहे हे मोजतो. ईसी जास्त असला तर पिके वाळतात आणि उत्पादन कमी होते. सेन्सरमुळे मीठ वाढलेल्या जमिनीच्या सुधारासाठी योग्य उपाय करता येतात आणि उत्पादन वाचवता येते..५. माती पोषण सेन्सर (NPK Sensor)माती पोषण सेन्सर मातीमध्ये नत्र, स्फुरद, पालाश किती आहे हे मोजतो. या तीन खतांची संतुलित उपलब्धता उत्पादनासाठी सर्वात महत्त्वाची असते. या सेन्सरमुळे पिकाला गरजेनुसार खत देऊन खर्च कमी होतो आणि उत्पादन जास्त मिळते.६. सेंद्रिय कर्ब सेन्सर (Soil Organic Carbon Sensor)हा सेन्सर जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब किती आहे हे सांगतो. सेंद्रिय कर्ब मातीच्या सुपीकतेसाठी अत्यंत गरजेचा असतो. त्यामुळं सेन्सरद्वारे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण तपासून शेतकरी कर्बाचे प्रमाण वाढवू शकतात. मातीत कर्ब जास्त असेल तर जमीन अधिक भुसभुशीत आणि सुपीक होते..हे सेन्सर मातीचे आरोग्य तपासतात. ठिबक सिंचनात, फवारणीच्या नियोजनात, खत देण्यापूर्वी, पेरणीपूर्व जमिनीचे परीक्षण करण्यासाठी ते वापरले जातात. हे सर्व सेन्सर वेगवेगळे आणि एकत्रित स्वरुपात एकाच यंत्रासुद्धा मिळतात. कंपनीनुसार आणि गुणवत्तेनुसार या सेन्सर यंत्राच्या किंमतीत बदल पहायला मिळतात..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.