Artificial Intelligence : शेतीमालाची गुणवत्ता तपासणं झालं सोपं! मशिन सांगणार शेतमालाची गुणवत्ता फक्त २५ मिनिटांत

Agriculture Technology : आता मात्र मिरची पिकाची गुणवत्ता सांगणारं कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित मशिन बाजारात आलं आहे. या मशिनमध्ये शेतकऱ्यांना एकावेळेला शेतमालातील ओलाव्याचं प्रमाण आणि रासायनिक घटक समजणार आहेत.
Agriculture Technology
Agriculture TechnologyAgrowon

स्वराज टार्गेट ६३० बाजारात दाखल

स्वराज या ट्रॅक्टर निर्मिती कंपनीनं अलीकडेच कमी वजनाची नवीन मॉडेल बाजारात आणले आहेत. स्वराज टार्गेट ६३० महाराष्ट्र आणि कर्नाटक भागासाठी विकसित करण्यात आला आहे. या ट्रॅक्टरची किंमत ५ ते ६ लाखांच्या दरम्यान ठेवण्यात आली आहे. २० ते ३० एचपची क्षमतेचं इंजिन असलेल्या या ट्रॅक्टरनं फळबागांच्या आंतरमशागत अधिक चांगली होत असल्याचा कंपनीचा दावा आहे. 

भात आंतरमशागतीसाठी पॅडी पॉवर

भात पिकामध्ये आंतरमशागतीची कामं ही चिखलातच करावी लागत असल्यानं जिकिरीची ठरतात. अशा कामांसाठी मजुरांची उपलब्धता ही एक समस्या आहे. अशा स्थितीमध्ये यंत्र आणि अवजारांचा वापर करण्याची गरज आहे. बाजारात पेट्रोलवर चालणारे सिंगल रो पॅडी पॉवर विडर, डबल रो पॅडी पॉवर विडर आणि ब्रश कटर चलित सिंगल रो पॅडी पॉवर विडर उपलब्ध आहेत. पॅडी पॉवर विडरचे हे स्वयंचलित यंत्र आहे. यंत्राचे वजन १७ किलो असून, स्त्री अथवा पुरुष सहज चालवू शकतात. हे विडर १.७५ अश्वशक्तीच्या इंजिनावर चालते. या यंत्रास ८ पाते दोन शाफ्टवर बसविलेले असतात. त्याचा वेग ३०० फेरे प्रति मिनिट असतो. त्यामुळं भाताची आंतरमशागत सोपी झाली आहे.

Agriculture Technology
Health Tips : डेंग्यूमध्ये किवी खाण्याचा सल्ला का दिला जातो ?

 स्माम अंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोनचं प्रशिक्षण 

शेती क्षेत्रात ड्रोनचा प्रभावी वापर करता यावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. दिवसेंदिवस ड्रोन तंत्रज्ञानात आधुनिक फीचर्स देखील उपलब्ध करून दिले जात आहेत. मारुत कंपनीननं एजी३६५एस या ड्रोनचं प्रशिक्षण बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आयोजित केलं. केंद्र सरकारच्या स्माम योजनेअंतर्गत ड्रोनचं प्रशिक्षण दिलं जात आहे. स्माम ही केंद्र सरकारची कृषी यांत्रिकीकरणावर अनुदान देणारी योजना आहे. शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवावी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर शेतीत करता यावा, यासाठी मारुत आणि राज्य सरकारच्या वतीनं प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं आहे.

पिकाला पाणी देणार रोबोट 

शेतात शेती कामासाठी रोबोट अवतरण्यास सुरुवात झालीय. रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीतील सिंचन व्यवस्थापन केलं जाऊ लागलं आहे. या विकसित रोबोटवर पाण्याची टाकी आणि पाणी फवारणी यंत्रणा जोडलेली असते. या रोबोटवर इतर सेन्सरशिवाय जमिनीमधील ओलावा मोजणारी किंवा झाडांच्या पानांमधील पाण्याची स्थिती मोजणारी सेन्सर बसवलेली असतात. तसेच या रोबोटला जमिनीच्या सिंचनाची सर्व माहिती दाखवणारा जी.पी.एस. नकाशा दिलेला असतो. हा रोबोट शेतामध्ये फिरताना जमिनीमध्ये असलेला ओलावा मोजतो तसेच पानांतील पाण्याची स्थितीही मोजतो. आणि त्या माहितीच्या आधारे पाण्याची नेमकी गरज कुठे आहे, ते ओळखतो. जसं की, एखाद्या भागामध्ये, रोपाला पाण्याची गरज आहे की नाही, गरज असेल तर किती आहे हेही ठरवतो. आणि जिथे गरज आहे तिथे तो फवारणी करतो.

मिरची पिकाची गुणवत्ता सांगणारं मशिन

आर्टिफिशल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमता शेती क्षेत्रात नवनवीन घटना घडवून आणत. शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाची गुणवत्ता कशी आहे ते अचूक कळत नाहीत. त्यामुळं बाजारात गेल्यावर अनेकदा व्यापारी म्हणेल त्या दरात शेतकरी शेतमाल विकतात. पण आता मात्र मिरची पिकाची गुणवत्ता सांगणारं कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित मशिन बाजारात आलं आहे. या मशिनमध्ये शेतकऱ्यांना एकावेळेला शेतमालातील ओलाव्याचं प्रमाण आणि रासायनिक घटक समजणार आहेत. शेतीमालाचा भाव ठरवताना शेतमालातील ओलावा महत्वाचा घटक असतो. पण त्यांची माहिती शेतकऱ्यांना मिळत नाही, त्यामुळं शेतकऱ्यांची फसवणूक होते. व्यापारी म्हणेल त्या दरात शेतमाल विकावा लागतो.

त्यामुळं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतं. हीच समस्या ओळखून एजी नेक्स्ट या स्टार्टअपनं मशिन विकसित केलं आहे. सध्या शेतमालाची गुणवत्ता तपासायची तर किमान २४ तासांचा वेळ लागतो. पण एजीनेक्स्टनं विकसित केलेल्या मशिनवर फक्त २५ मिनिटात शेतमालाच्या गुणवत्तेचा अहवाल मिळतो. शेतकऱ्याला त्यासाठी कुठेही जायची गरज नाही, शेतकऱ्याच्या मोबाइलवर अहवालाचा मेसेज येतो. त्यामध्ये ए बी सी आणि डी नुसार श्रेणी निश्चित केलेली असते. त्यावरून  शेतकऱ्यांना शेतमालाची गुणवत्ता कळते, अशी माहिती एजीनेक्स्ट स्टार्टअपनं दिली आहे. 

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com