Agriculture AI : पिकांवरील रोग, कीड ओळखण्यासाठी कृत्रिम बुध्दिमत्तेवर आधारित ॲप- ‘एआय डिस्क’

AI Disk App : कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाची कृषी क्षेत्रासाठीची उपयुक्तता पाहताना एका परदेशी स्टार्टअपने विकसित केलेले पिकावरील रोग व कीड ओळखून नियंत्रणासाठी उपाययोजना सुचविणाऱ्या ॲपची माहिती घेतली.
Agriculture AI
Agriculture AIAgrowon
Published on
Updated on

Pest, Disease Management : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पांतर्गत (NAHEP) नवी दिल्ली येथील भारतीय कृषी सांख्यिकी संशोधन संस्थेने (IASRI) अँड्रॉइड मोबाइलवर वापरण्यायोग्य ॲप्लिकेशन विकसित केले आहे.

त्याचे नाव ‘एआय- डिस्क’ (AI-DISC- Artificial Intelligence based Disease Identification System) असे आहे. या मोबाइल ॲप्लिकेशनची माहिती घेण्यापूर्वी पिकावरील रोग व कीड ओळखण्यासाठी या ॲप्लिकेशनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान कशा प्रकारे वापरले जाते, याची माहिती घेऊ.

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाद्वारे पिकावरील रोग व कीड ओळखण्यासाठी पुढील पद्धतीचा वापर करण्यात येतो.

१) डेटा संग्रह : पिकांच्या निरोगी आणि विविध कीड व रोगामुळे प्रभावित अवयवांच्या (उदा. पाने, खोड, मुळे, फुले, फळे इ.) प्रतिमांचा व्यापक संग्रह केला जातो. यामध्ये वेगवेगळ्या पीक प्रकारानुसार त्याच पिकाच्या विविध जातींनुसारही वैशिष्ट्ये टिपलेली असतात. त्यामुळे त्यावर येणाऱ्या विविध रोग व किडींमुळे होणाऱ्या बदलांच्याही प्रतिमा जमा केलेल्या असतात.

२) प्रतिमा प्रक्रिया : घेतलेल्या प्रतिमेमध्ये मुख्य घटकाशिवायची अन्य असंबद्ध माहिती काढली जाते. प्रतिमा पुढील विश्‍लेषणासाठी तयार केली जाते. प्रतिमेच्या प्रक्रियेमध्ये प्रतिमेचा आकार बदलणे, प्रतिमा आवश्यक तितकी मोठी करणे, अथवा प्रतिमेचा अतिरिक्त भाग कापणे (क्रॉप करणे), प्रतिमा सामान्यीकरण अशा अनेक तंत्राचा वापर केला जातो.

३) कृत्रिम बुद्धिमत्ता प्रारूपाचे प्रशिक्षण : डाटा संग्रहातील प्रतिमा ओळखण्यासाठी वेगवेगळे पॅटर्न व त्यातील बदल (अल्गोरिदम) नोंदवले जातात. विशिष्ट प्रकारच्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रारूपाला (उदा. मशिन लर्निंग अल्गोरिदम) प्रशिक्षित केले जाते. विविध प्रकारचे मशिन लर्निंग अल्गोरिदम यासाठी उपलब्ध आहेत. त्यात अशा कार्यासाठी ‘कन्व्होल्युशन न्यूरल नेटवर्क’ हे अल्गोरिदम प्रभावी मानले जाते.

४) डेटा संग्रहामधील प्रतिमांना विशिष्ट ओळख किंवा लेबल देणे : डेटा सेटमधील प्रत्येक प्रतिमेला ती प्रतिमा कोणत्या पिकाची अथवा प्रजातीची आहे व त्यावर कोणते कीड व रोग आहे अथवा निरोगी आहे याचे लेबल दिले जाते.

Agriculture AI
AI Mobile App : शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मोबाईल ॲप

५) प्रारूप प्रशिक्षण : याद्वारे शेतातून घेतलेली प्रत्यक्ष प्रतिमा ही प्रतिमा संग्रहामधील लेबल दिलेल्या प्रत्येक प्रतिमेसोबत जुळवणूक करण्यासाठी प्रशिक्षित केले जाते. त्यातून प्रारूप विविध कीड व रोगाशी संबंधित वैशिष्ट्ये ओळखण्यास शिकते.

६) प्रारूप मूल्यांकन : प्रारूपास ज्या डेटा संग्रहामधील प्रतिमेद्वारे प्रशिक्षित केले गेले आहे, त्यापेक्षा वेगळ्या डेटा संग्रह (म्हणजेच प्रशिक्षणासाठी वापरलेल्या डेटा संग्रहामध्ये समाविष्ट नसलेल्या प्रतिमा) वापरून प्रारूपाच्या प्रतिमा ओळखण्याच्या अचूकतेचे मूल्यमापन केल्या जाते. त्यामध्ये सुधारणा करावयाची असल्यास त्या कुठे कराव्या लागतील, हे शोधले जाते.

७) उपयोजन आणि एकत्रीकरण : एकदा प्रारूपाने समाधानकारक कार्य प्रदर्शन केल्यास किंवा निर्णय देत असल्यास त्याचे शेतकऱ्यांना वापरण्याइतके सोपे आणि सुटसुटीत करावे लागते. या प्रारूपाचे निर्णय समर्थन प्रणालीमध्ये एकत्रीकरण करून ते मोबाइल अथवा वेब आधारित साधनामध्ये आणले जाते. त्यानंतर ते प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये (रिअल टाइम) विश्‍लेषणासाठी वापरता येते.

८) प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये विश्लेषण : शेतकरी अथवा वापरकर्ते प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये पिकाचे अथवा पानाचे स्मार्टफोन अथवा कॅमेऱ्याद्वारे फोटो घेतात. ते या ॲपमध्ये अपलोड झाल्यानंतर आतमध्ये असलेले प्रशिक्षित कृत्रिम बुद्धिमत्ता प्रारूप आपल्या

प्रक्रिया सुरू करते. निरोगी पान किंवा रोग, किडीमुळे त्याच्या रंग, आकार व अन्य वैशिष्ट्यामध्ये झालेले बदल व्यवस्थित नोंदवते. त्याची जुळवणूक डेटा संग्रहामध्ये असलेल्या प्रतिमांशी करून नेमकेपणाने ओळख पटविली जाते. त्या संदर्भात शेतकऱ्याला माहिती देते. सोबतच तो रोग अथवा कीड कशा प्रकारे नियंत्रणामध्ये आणायची यासाठी उपाययोजना सुचविते.

Agriculture AI
Agriculture AI Technology : कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आत्मसात करावे लागेल

९) सतत सुधारणा : विकसित केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रारूपाची अचूकता वाढविण्यासाठी या प्रारूपास प्रतिमेच्या नवनवीन डेटा संग्रहाशी नियमितपणे पुन्हा प्रशिक्षित करणे व अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रारूपास जितका अधिक डेटा/माहिती पुरवली जाईल आणि ते बरोबर की चूक या बाबत अभिप्राय मिळतील, तितके फायद्याचे असते. त्यामुळे ती कार्यप्रणाली अधिक सक्षम होण्यास मदत होते.

वर नमूद केलेल्या एकंदर नऊ पायऱ्यांपैकी १ ते ७ व ९ या पायऱ्या प्रारूप विकसित करणाऱ्या संस्थांनी करावयाच्या आहेत. शेतकऱ्यांस अथवा वापरकर्त्यांस फक्त पायरी क्रमांक ९ चा अवलंब करावयाचा असतो. (आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे)

AI-DISC : कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित भारतीय बनावटीचे मोबाइल ॲप्लिकेशन

हे पिकावरील कीड व रोगाचे निदान करणे आणि ते नियंत्रणामध्ये आणण्यासाठीच्या उपाययोजना सुचविण्याचे काम करते. (आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे).

१) AI-DISC ॲप्लिकेशन स्मार्ट मोबाइलवर स्थापित करणे : आपण स्मार्ट मोबाइल फोनवर कुठलेही ॲप्लिकेशन ज्याप्रमाणे स्थापित करतो त्याप्रमाणे वेगवेगळ्या स्टोअर (गुगल प्ले स्टोअर)वर AI-DISC हे नाव टाइप करून शोध घ्यावा. त्यानंतर Install वर क्लिक करावे. तुमच्या फोनद्वारे AI-DISC ॲप्लिकेशन स्थापित झाल्याचे सांगेपर्यंत प्रतीक्षा करणे.

२) वापरकर्ता / शेतकरी नोंदणी करणे : ॲप्लिकेशन स्थापित झाल्यानंतर शेतकऱ्याला प्रथम नोंदणी करावी लागते. त्यात शेतकऱ्याचे नाव, गाव, मोबाइल क्रमांक, इमेल इ.ची माहिती पुरवावी लागते.

Agriculture AI
Agriculture AI : रोगग्रस्त गहू दाणे ओळखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

३) पीक व पिकाच्या कीड व रोग प्रादुर्भाव अथवा त्याची शंका असलेल्या अवयवाचा फोटो काढून अपलोड करणे ः वापरकर्त्यांनी/शेतकऱ्यांनी “AI-DISC” ॲपमध्ये त्यांच्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याच्या साह्याने पीक, फळझाड, त्यांची पाने किंवा कोणत्याही कीड व रोग प्रभावित भागाचा फोटो काढून अपलोड करावा लागतो.

४) प्रभावित भागांच्या फोटो/प्रतिमांची ओळख करणे : अपलोड केलेल्या प्रत्यक्ष शेतातील फोटोची तुलना किंवा जुळवणूक ॲपच्या संग्रहामध्ये असलेल्या प्रतिमांशी केली जाते. त्यातून आपणास पीक, पिकावर पडलेला रोग व कीड यांची ओळख पटवून आपल्याला सुचवली जाते.

५) पिकावरील कीड व रोग नियंत्रणासाठीच्या उपाययोजना : एकदा कीड, रोग यांच्या प्रादुर्भावाचे निदान झाले, की तो नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्याची गरज आहे, याची माहिती दिली जाते.

AI-DISC ची ठळक वैशिष्ट्ये ः

• या अ‍ॅपचे आरेखन (design) शेतकऱ्यांना सहजपणे करता येईल, इतके सोपे केले आहे.

• स्वयंचलित प्रतिमा-आधारित रोग आणि कीटक डीप लर्निंग मॉडेल्स वापरून ओळख : वापरकर्त्याला/ शेतकऱ्यांना फक्त पिकाच्या प्रभावित भागांचे फोटो घ्यावे लागतात. ते ॲपमध्ये समाविष्ट केल्यानंतर त्वरित निदान प्राप्त होते.

• भारतातील प्रमुख पिके व त्यावरील रोग व कीड ओळखण्यासाठी प्रतिमा ओळख तंत्रज्ञानाचा वापर करते. या ॲपमध्ये फळे, भाजीपाला, तृणधान्ये आणि इतर १९ प्रमुख भारतीय पिकांची व त्यावरील साठहून अधिक रोगांची विस्तृत श्रेणी समाविष्ट आहे. रोग आणि कीड संक्रमित पिकांच्या प्रतिमांचे राष्ट्रीय स्तरावरील विस्तृत माहितीसंच उपलब्ध आहे.

• हे मोबाइल ॲप वापरकर्त्याचे/ शेतकऱ्याचे स्थान, पीक निवड आणि विशिष्ट पीक समस्यांवर आधारित व्यक्तिगत शिफारशी देते. यात कीड व कीटक व्यवस्थापन, रोग प्रतिबंधक आणि पिकांचे आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी सल्लासुद्धा दिला जातो.

• पिकासंदर्भात दिलेला सल्ला किंवा अन्य कोणत्याही बाबींसंदर्भात शेतकरी प्रश्‍न विचारू शकतात. आपल्या शंकाचे समाधान सुचविण्याचा प्रयत्न केला जातो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com