सिंधुदुर्गनगरी ः नापणे ऊस संशोधन केंद्रांच्या (Sugarcane Research Centre) माध्यमातून एक डोळा ऊस रोप (Sugarcane Plant Technique) तंत्रज्ञान विकसित करून शेतकऱ्यांना माफक दरात ऊस रोपे उपलब्ध करून देण्यासाठी ५४ लाख ४७ हजार रुपयांच्या निधीची गरज आहे. संशोधन केंद्रांकडून हा प्रस्ताव सिंधुरत्न समृद्धी योजना समितीकडे (Sindhuratn Samrudhhi Yojana) पाठविण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र झपाट्याने (Sugarcane Acreage) वाढले असले तरी एकरी उत्पादन १५ ते ३० टन इतकेच राहिले आहे.
उत्पादन खर्च आणि उत्पन्न याचा मेळ बसत नाही. परंतु नापणे ऊस संशोधन केंद्राला मंजुरी मिळाल्यापासून या केंद्रांचे पथक सातत्याने ऊस रोपे, लागवड, (Sugarcane Cultivation) स्थानिक पातळीवर होणाऱ्या ऊस जातीचा प्रचार, प्रसार करण्याचे काम करीत आहे.
अधिक उत्पादन मिळण्यासाठी रोपनिर्मिती खूप महत्त्वाची असते. त्यामुळे फोंडाघाट प्रक्षेत्रावर गेल्या तीन वर्षांपासून एक डोळा रोप निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित करून रोपनिर्मिती केली जाते.
परंतु हे काम करीत असताना आवश्यक अनुदान कोणत्याच योजनेतून मिळत नसल्यामुळे तंत्रज्ञान विकसित करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
त्यामुळे ‘सिंधुरत्न समृद्धी’तून एका डोळा ऊस रोप तंत्रज्ञान विकसित करणे आणि त्याचा प्रचार, प्रसार करणे या कामाला व्यापक स्वरूप देण्यासाठी ५४ लाख ४७ हजारांचा निधी तीन वर्षांत टप्प्याटप्पाने मिळावा, अशी मागणी संशोधन केंद्राकडून करण्यात आली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.