Agriculture Management : दोनशे एकरांत यंत्रांच्या साह्याने चोख व्यवस्थापन

Success Story of Farmer : जळगाव जिल्ह्यात निंबोल (ता. रावेर) येथील पाच पाटील भावंडांचे संयुक्त कुटुंब व दोनशे एकर शेती आहे. वडील, काका यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या पिढीतील जितेंद्र, राजेंद्र, महेंद्र, चंदन वैभव, गौरव ही सहा भावंडे शेतीची मुख्य जबाबदारी सांभाळतात.
जितेंद्र पाटील
जितेंद्र पाटीलAgrowon
Published on
Updated on

चंद्रकांत जाधव

Farm Management : जळगाव जिल्ह्यात निंबोल (ता. रावेर) येथील पाच पाटील भावंडांचे संयुक्त कुटुंब व दोनशे एकर शेती आहे. भागवत, जगन्नाथ, युवराज, किशोर व संजय ही या कुटुंबातील वडील पिढीतील भावंडांची नावे आहेत.

त्यांच्या म्हणजे वडील, काका यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या पिढीतील जितेंद्र, राजेंद्र, महेंद्र, चंदन वैभव, गौरव ही सहा भावंडे शेतीची मुख्य जबाबदारी सांभाळतात.जितेंद्र यांनी कायदेविषयक पदवी पुणे येथील प्रसिध्द संस्थेतून घेतली. सहा महिने तेथे ‘प्रॅक्टीस’ केली. परंतु शेतीची आवड व मोठ्या क्षेत्रावरील शेतीची जबाबदारी ओळखून ते गावी परतले.

शेती व्यवस्थापन, पीक पद्धती

निंबोल शिवारात केळी अधिक. गाव तापी नदीलगत. कूपनलिका, विहिरींना पाणी मुबलक.

जितेंद्र यांच्या कुटुंबात ४० कूपनलिका, लहान-मोठी अशी ११० जनावरे, सहा मोठे, दोन मिनी ट्रॅक्टर,

१० मजूर बारमाही.

८० एकरांत ग्रॅण्ड नैन केळीं. दरवर्षी एक लाख झाडांचे व्यवस्थापन.

केळीची ९५ टक्के काढणी झालेल्या बागांत रब्बीतील पिके.

कापूस ३० ते ४० एकर (पूर्वहंगामी). रब्बीत मका, गहू, हरभरा.

शेतीचा जमा-खर्च, विविध वाण, वैशिष्ट्ये आदी सर्व नोंदी ठेवण्यात येतात. त्यातून पुढील वर्षाचे शेतीचे नियोजन होते.

जितेंद्र पाटील
Agriculture Technology : शाश्‍वत शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व

शेतीत केले यांत्रिकीकरण

दोनशे एकरांत शेतीचे व्यवस्थापन करण्यासाठी सहाही भावंडांनी त्या त्या कामांची जबाबदारी उचलली आहे. वेळ, श्रम व आर्थिक बचत व मजूरटंचाईवरही मात करण्यासाठी पेरणी ते काढणीपर्यंत यांत्रिकीकरण केले आहे. ते पुढीलप्रमाणे

सेंद्रिय, जैविक खते, स्लरी ठिबकमधून देण्यासाठी ट्रॅक्टरचलित फिरता फर्टिलायझर टँक तयार केला आहे. त्याआधारे हव्या त्या क्षेत्रात फर्टिगेशन करता येते. टँकला स्वयंचलित पंप असून तो टँकमधील स्लरी, खते ओढण्याचे काम करतो.

तीन ग्रेडमध्ये हळदीची प्रतवारी करण्यासाठी टाकाऊ लोखंडी साहित्यापासून २० ते २५ एचपी क्षमतेच्या ट्रॅक्टरला जोडलेले यंत्र विकसित केले. त्यास चारही बाजूंना मजबूत लोखंडी रॉडस व तीन प्रकारच्या चाळण्या आहेत. दहा मजूर असले तर प्रति दिन १७५ पोत्यांतील (प्रति पोते ५० ते ६० किलो) प्रतवारी हे यंत्र करते.

रान भुसभुशीत करण्यासह सऱ्या पाडण्यासाठी मिनी ट्रॅक्टरचलित यंत्र तयार केले आहे. केळी काढणी पूर्ण झालेल्या किंवा जुनारी बागांत मक्यासारख्या पिकांसाठी ही लहान यंत्रणा किफायतशीर ठरते.

पॉवर टिलरमुळे केळी बागांतील तणनियंत्रण सोपे झाले आहे. एका दिवसात तीन एकरांत आंतरमशागत करता येते. केळीची काढणी पूर्ण झाल्यानंतर त्याचे उभे खांब बारीक करण्यासह अन्य अवशेषांचे तुकडे करण्यासाठी यंत्र आहे. आठ तासांत पाच- सहा एकरांत हे काम होते. या अवशेषांचे पुढे सेंद्रिय खत तयार होते.

जितेंद्र पाटील
Agriculture Technology : प्रयोगशील, संरक्षित शेतीचे गवसले तंत्र

मका, गहू, ज्वारी आदींसाठी ट्रॅक्टरचलित बहुउद्देशीय पेरणी यंत्र आहे. त्याच पध्दतीचे ट्रॅक्टरचलित मळणी यंत्रही आहे. हरियाणातून ते घेतले आहे

मका कापणी, मळणी, व अन्य कामे ज्यावेळी वेगात असतात त्या काळात शेणखत, माती वाहतूक करणे, शेतात मातीची भर घालणे ही कामे असतात. त्या काळात मजूरटंचाई अधिक असते. यावर उपाय म्हणून ट्रॅक्टरचलित लोडर आहे. हे यंत्र ५५ एचपी ट्रॅक्टरवर चालते. एका दिवसात ३० ते ४० ट्रॉली शेणखत भरून ते शेतात पोचविणे शक्य होते.

त्या तुलनेत मनुष्यबळाच्या साह्याने हे काम केवळ आठ ते १० ट्रॉली एवढेच होते. अतिपावसात अनेकदा बांध फुटतात. माती वाहून जाते. याशिवाय पाईपलाईनचे काम, केळीने भरलेले चिखलात रुतलेले वाहन खेचणे आदी कामांसाठी जेसीबी यंत्र घेतले असून त्यासाठी कुशल कामगार नियुक्त केला आहे.

३४, ३३ व ४५ एकर असे तीन टप्पे पाडून एकूण ११२ एकरांसाठी ‘ड्रीप ऑटोमेशन’यंत्रणा बसविली आहे. वीजभार नियमनाच्या काळात अनेकदा रात्री वीज असते. अशा काळात काटेकोर ‘फर्टिगेशन’ करता येते. खते- पाण्याचा कार्यक्षम वापर करता येतो.

केळी हवामानाला संवेदशनशील व नाजूक आहे. तीव्र उन्हाळ्यात वा अन्य वेळी वीजपुरवठा खंडीत होतो. अशावेळेस ट्रॅक्टरचलित जनरेटरची सुविधा आहे. त्यातील एक ट्रॅक्टरचलित ३० केव्ही क्षमतेचे व व दुसरे ट्रकच्या यंत्रावर आधारित ७० केव्ही क्षमतेचे आहे.

त्याच्या साह्याने एकावेळी सात पंप सुरू करणे शक्य होते. यातील ७० केव्ही क्षमतेचा जनरेटर बाजारात उपलब्ध नव्हता. तो तज्ज्ञांच्या मदतीने तयार करून घेतला.

उत्पादन (एकरी)

केळी २१ ते २५ किलोची रास.

कापूस- ११ ते १४ क्विंटल.

मका- पावसाळ्यात २७ ते ३० क्विं. तर उन्हाळ्यात ३५ क्विंटलपर्यंत.

गहू- १३ ते १४ क्विंटल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com