Khandesh Rainfall : खानदेशात काही भागांत ४० मिमी पाऊस

Heavy Rain Agriculture Damage : खानदेशात चांगल्या पावसाची प्रतीक्षा अनेक दिवस होती. बुधवारी (ता. ११) रात्री वादळी पावसात नुकसान झाले. गुरुवारीदेखील ढगाळ वातावरण व उकाडा अशी स्थिती होती.
Unseasonal Rain
Unseasonal RainAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात गुरुवारी (ता. १२) रात्री अनेक भागांत पाऊस झाला. यात काही भागांत चांगला किंवा ४० मिमीपर्यंत पाऊस झाला. काही शेतकऱ्यांची जमीनदेखील यात खरडून गेल्याच्या तक्रारी आहेत. खानदेशात चांगल्या पावसाची प्रतीक्षा अनेक दिवस होती. बुधवारी (ता. ११) रात्री वादळी पावसात नुकसान झाले. गुरुवारीदेखील ढगाळ वातावरण व उकाडा अशी स्थिती होती.

शेतकरी वादळी पाऊस यायला नको, अशी आळवणी करीत होती. दुपारी ऊन पडले. मध्यम, हलक्या जमिनींत पूर्वमशागतीचे कामही गुरुवारी सुरू होते. सायंकाळी पावसाळी वातावरण तयार झाले. रात्री १० नंतर तुरळक पाऊसही काही भागात झाला.

यानंतर मध्यरात्री चांगला पाऊस अनेक भागांत झाला. जळगाव, धरणगाव, एरंडोल, चोपडा, धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर, नंदुरबारमधील नंदुरबार, शहादा, तळोदा भागांत पावसाने हजेरी लावली. जळगाव, एरंडोल भागांत काही मंडलांत ४० मिमीपर्यंत पाऊस झाला.

Unseasonal Rain
Maharashtra Rains: कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार

अनेक महसूल मंडलांत सुमारे अर्धा ते पाऊणतास चांगला पाऊस झाला. कुठलेही वादळ, गारपीट अशी स्थिती नसल्याने याचा फटका पिकांना बसलेला नाही. परंतु तापी, गिरणा, पांझरा, अनेर नदीच्या क्षेत्रात काही शेतकऱ्यांच्या शेतातील माती वाहून गेली आहे. जमिनी खरडल्याचे प्रकारही जळगाव, चोपडा भागात झाले आहेत.

Unseasonal Rain
Heavy Rain : सिंधुदुर्गात पावसाचे जोरदार पुनरागमन

सिंचनाची लगबग थांबणार

चांगला पाऊस झाल्याने केळी, कापूस व अन्य पिकांचे सिंचन करण्याची गरज किमान तीन ते चार दिवस राहणार नाही. बुधवारच्या वादळात चोपडा, पाचोरा, धरणगाव, एरंडोल, जळगाव आदी भागांत शिवारात विजेचे खांब तुटले. तारा विस्कळित झाल्या.

अनेक भागात मोठे वृक्ष पडले. यात मोठी हानीही झाली. वीजपुरवठा बुधवारी बंद होता. यात बुधवारी पाऊस कमी व नुकसान अधिक असल्याने पिकांच्या सिंचनाची गरजही होती. गुरुवारी रात्री पाऊस आल्याने सिंचनाची अडचण दूर झाली.

पूर्वमशागत व पेरणीला अडचण

चांगला पाऊस झाल्याने अनेक भागांत ट्रॅक्टरने किंवा बैलजोडीने मशागत, पेरणीसाठी वाफसा नव्हता. शुक्रवारी (ता. १३) सकाळी ऊन पडले. परंतु दुपारपर्यंत अनेक भागांत वाफसा स्थिती नव्हती. यामुळे पेरणी कुठेही सुरू नव्हती.

अनेक शेतकऱ्यांची शेती नांगरून पडली आहे. त्यात रोटाव्हेटर करायचे आहे. तर अनेकांनी रोटाव्हेटर करून बैलांकरवी त्यात आणखी मशागत सुरू केली. परंतु यात पावसाने व्यत्यय आला. काही भागात पेरणीयोग्य पाऊसही नव्हता. यामुळे पेरणीचे कामेही सुरू नव्हती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com