Milk Plant : हिमाचल सरकार ८०-१०० रुपये लिटर दराने शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करणार

Himachal Milk Projects : हिमाचल सरकार कांगडा जिल्ह्यातील डगवार येथे 250 कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक दूध प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
Milk Rate
Milk RateAgrowon
Published on: 
Updated on: 

Milk Rate Update : हिमाचल सरकारने म्हैस आणि गायीच्या दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्यात निर्णय घेतला आहे. त्यामुळे हिमाचलमध्ये खरेदीदर आता ८०-१०० रुपयांपर्यंत पोहोचणार असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. यासाठी राज्य सरकार कांगडा जिल्ह्यातील डगवार येथे २५० कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक दूध प्रक्रिया प्रकल्प उभारणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी केली.

Milk Rate
Sadabhau Khot : उसाप्रमाणे दुधालाही ‘एफआरपी’प्रमाणे दर द्या

शिमला येथे  झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री सुखू यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या (NDDB) सहकार्याने दूध प्रक्रिया प्रकल्प उभारला जाईल. या प्लांटची क्षमता १ लाख लिटर ते ३ लाख लिटर इतकी असेल, त्यात चांगल्या दर्जाचे दुधाचे पदार्थही तयार करण्यात येणार आहेत.
एनडीडीबीचे अध्यक्ष मीनेश शाह यांनी सांगितले की, या मिशनसाठी ते हिमाचल प्रदेशला सर्वतोपरी मदत करतील. एनडीडीबी प्लँटच्या संचालनासाठी आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विपणनासाठी स्वखर्चाने दोन सल्लागार देखील देईल, असे निवेदनात म्हटले आहे.

Milk Rate
Milk Rate In Maharashtra : दुधाचे दर पडल्याने शेतकरी उतरले रस्त्यावर; दूध अंगावर ओतून सरकारला दिला इशारा

मुख्यमंत्र्यांनी पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यामध्ये गाईचे दूध ८० रुपये प्रतिलिटर आणि म्हशीचे दूध १०० रुपये लिटर दराने दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याचे आश्वासन दिले होते. तेच आश्वासन पूर्ण करण्याच्या दिशेने राज्य सरकार वाटचाल करत आहे.

सुखू म्हणाले की  राज्यातील सुमारे 90 टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते आणि पशुपालन आणि शेती यांचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे   शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून, त्यासाठी ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणे गरजेचे आहे. डगवार येथे प्लांटच्या उभारणीमुळे कांगडा, हमीरपूर, उना आणि चंबा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होईल. , असेही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com