Sadabhau Khot : उसाप्रमाणे दुधालाही ‘एफआरपी’प्रमाणे दर द्या

Milk Rate : उसाप्रमाणे दुधालाही ‘एफआरपी’प्रमाणे दर द्यायला हवा. तरच दूध उत्पादकांना हा व्यवसाय परवडेल, अन्यथा नाही, त्यामुळे यापुढे स्वतः शासन दरबारी पाठपुरावा करू, असे आश्‍वासन मंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.
Sadabhau Khot
Sadabhau KhotAgrowon
Published on
Updated on

Solapur News : उसाप्रमाणे दुधालाही ‘एफआरपी’प्रमाणे दर द्यायला हवा. तरच दूध उत्पादकांना हा व्यवसाय परवडेल, अन्यथा नाही, त्यामुळे यापुढे स्वतः शासन दरबारी पाठपुरावा करू, असे आश्‍वासन मंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.

चळेमध्ये रयतक्रांती संघटनेच्या वतीने आयोजित दूध परिषदेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून श्री. खोत बोलत होते. सुरेश मोरे हे या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते.

या वेळी रयत क्रांती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले, प्रा. सुहास पाटील, नामदेवराव पवार, छगन पवार, नंदकुमार व्यवहारे, रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष रुपेश वाघ, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष रामदास घाडगे, प्रताप गायकवाड, बंडू मोरे, उपस्थित होते.

Sadabhau Khot
Farmer March : रयत क्रांतीची पदयात्रा पोलिसांनी अडवली; सदाभाऊ खोत आक्रमक, मोर्चा तोडगा न निघाल्यास मुंबईवर धडकणार

श्री. खोत म्हणाले, की सध्या शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय केला जातो. परंतु मागील काही दिवसांपासून दूधदरामध्ये सातत्याने कपात होत असल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.

पण त्याचा विचार कोणीच करत नाही. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रूपेश वाघ यांनी केले, बालाजी शिंदे यांनी आभार मानले.

दुधाची कावड यात्रा काढणार

राज्यातील एका नामवंत अशा खासगी संस्थेच्या चेअरमनचा हस्तक्षेप दूधदर कपातीमध्ये वाढला आहे. त्यांची दादागिरी सुरू आहे. शेतकऱ्यांना चिरडण्याचे काम ते करत आहेत. पण शासनाने याप्रकरणात लक्ष घालण्याची गरज आहे.

त्याचसाठी आपण लवकरच गोपाळपूर ते पंढरपूर अशी दुधाची कावड यात्रा काढणार असल्याचेही खोत यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com