Forest Department : ममदापूर साठवण तलावाला वन विभागाची मंजुरी

येवला तालुक्यातील ममदापूर परिसरातील साठवण तलाव ममदापूर या प्रकल्पाला वन विभागाकडून टप्पा एकची परवानगी प्राप्त झाल्यामुळे लवकरच या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
Forest Department
Forest DepartmentAgrowon
Published on
Updated on

नाशिक : येवला तालुक्यातील ममदापूर परिसरातील साठवण तलाव ममदापूर या प्रकल्पाला (Water Project) वन विभागाकडून (Department of Forest) टप्पा एकची परवानगी प्राप्त झाल्यामुळे लवकरच या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी दिली आहे.

Forest Department
Crop Damage : दौंडमधील पीक नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भाग हा सतत दुष्काळग्रस्त असल्याने या ठिकाणची सिंचन क्षमता अधिक वाढविण्यासाठी छगन भुजबळ यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या विशेष प्रयत्नांतून ममदापूर येथे ६४५.६४ लाखांच्या मेळाचा बंधारा या साठवण तलावाच्या कामाला प्रशासकीय मान्यता तसेच या कामाचा कार्यारंभ आदेशदेखील देण्यात आला होता; मात्र हा प्रकल्प ममदापूर राखीव संवर्धन क्षेत्रात येत असल्याने वन विभागाच्या २८.०६ हेक्टर जागेवर साकारला जाणार आहे.

Forest Department
Crop Loan : मराठवाड्यात कर्जपुरवठ्याचं घोडे अडलेलेच

त्यामुळे राज्य आणि केंद्रीय वने व पर्यावरण विभागाच्या विविध परवानग्यांअभावी हे काम सुरू होऊ शकले नव्हते.

राज्य वन्यजीव मंडळाची मान्यता, राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीची मान्यता, केंद्र शासनाच्या वने आणि पर्यावरण विभागाची मान्यता आदी विविध मान्यतांसाठी जलसंधारण विभागाकडून प्रयत्न सुरू होते. २३ मे २०२२ रोजी केंद्रीय वने व पर्यावरण विभागाने या प्रकल्पाला ६ मे २०२२ मधील मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून मान्यता दिली होती.

त्यानंतर जलसंधारण विभागाने विविध अटींची पूर्तता करून नागपूर येथील केंद्र शासनाच्या विभागीय अधिकारप्रधान समितीकडे प्रस्ताव पाठवला होता. १२ सप्टेंबर २०२२ रोजीच्या बैठकीत या समितीने ममदापूर राखीव संवर्धन क्षेत्रातील या साठवण तलावाच्या जमीन वळतीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

याबाबत गेल्या काही दिवसांपूर्वी जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत भुजबळ यांनी बंधाऱ्याच्या कामाचा आढावा घेऊन सदर प्रस्तावाची सद्यःस्थिती जाणून घेतली होती. तसेच या वेळी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या प्रस्तावास लवकरात लवकर मान्यता देण्याच्या सूचनादेखील केल्या होत्या.

या प्रस्तावास अखेर मान्यता मिळाली असून याबाबत वन विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे. आता लवकरच या साठवण तलावाच्या कामाला सुरुवात होणार आहे.

१७६ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार

साठवण तलाव ममदापूर हा २८.०६ हेक्टर वनजमिनीवर होणार आहे. या तलावाचे १८ चौरस किलोमीटर पाणलोट क्षेत्र आणि एकूण क्षमता ३५.६७ दलघफू इतकी असणार आहे.

लांबी २२० मीटर तर सांडव्याची लांबी ७९ मीटर प्रस्तावित आहे. या बंधाऱ्यामुळे ममदापूर परिसरातील १७६ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असून शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. तसेच या साठवण तलावाचा ममदापूर राखीव संवर्धन क्षेत्रातील वन्यजीव आणि प्राण्यांनासुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com