
MGNREGA Scheme In Jalgaon : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात सध्या दहा हजारांवर मजूर काम करीत आहेत. मजुरांच्या संख्या मागील महिन्यात चार हजारांपर्यंत होती. ती या महिन्यात दहा हजारांवर झाली आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागातील नागरिकांना काम मिळणे दुरापास्त होते. यामुळे कुटुंबाचा गाडा कसा हाकावा, असा यक्षप्रश्न मजुरांसमोर उभा राहतो. अशा परिस्थितीत मजुरांना रोजगार उपलब्ध होऊन ही योजना आधारवड ठरली आहे, हे विशेष.
सध्या या योजनेची २०९८ कामे सुरू आहेत. त्यात फळबाग, गोठा शेड, विहीर, वैयक्तिक व सार्वजनिक वृक्ष लागवड, शोषखड्डा, पेव्हर ब्लॉक बसविणे, नाडेप कंपोस्ट, व्हर्मी कंपोस्ट व इतर, अशी कामे सध्या सुरू आहेत. या कामांवर १० हजार ४४९ मजूर काम करीत आहेत. या मजुरांना मजुरीही वेळेवर देण्यात येत आहे.
तालुकानिहाय मजुरांची उपस्थिती
अमळनेर - १०८७, भडगाव - १९९, भुसावळ - ४२४, बोदवड- १८१, चाळीसगाव - १२५०, चोपडा- ४८, धरणगाव - ४३२, एरंडोल - १९९, जळगाव - ४२०, जामनेर - १५९७, मुक्ताईनगर - ७३, पाचोरा - ६४८, पारोळा - २७१९, रावेर - ९४२, यावल - २३१
एकूण १० हजार ४४९
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.