YSR Raythu Bharosa Scheme : काय आहे आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांसाठीची रायथू भरोसा योजना

latest Agriculture Scheme : केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धरतीवर नुकतीच महाराष्ट्र सरकरानेही शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला मंजुरी दिली आहे.
Agriculture Scheme
Agriculture Scheme Agrowon
Published on
Updated on

Latest Agriculture Update : देशातील शेतकऱ्यांना आर्थिक समृद्ध करण्यासाठी केंद्र सरकारसह अनेक राज्य सरकारांकडून अनेक शेतकरी कल्याणाच्या योजना राबविल्या जात आहेत. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धरतीवर नुकतीच महाराष्ट्र सरकरानेही शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला मंजुरी दिली आहे.

अशाच प्रकारे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने राज्यात वायएसआर रायथू भरोसा-पीएम किसान योजना राबवली जात आहे. गेल्या चार वर्षांपासून सुरू असून योजनेच्या पाचव्या वर्षांतील पहिला हप्ता आंध्र सरकारने नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे.

वायएसआर रायथू भरोसा-पीएम किसान योजनेंतर्गत आंध्र प्रदेशातील सुमारे ५२ लाखांहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात ५५०० रुपये जमा करण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत आंध्र प्रदेश सरकार केंद्र सरकारकडून मिळालेल्या रकमेसह शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण १३ हजार ५०० रुपये देते.

निवडणुकीच्या जाहिरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार ५०० रुपये आर्थिक मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. आता ही रक्कम योजनेच्या पाचव्या वर्षांसाठी १३ हजार ५०० रुपये करण्यात आली आहे.

Agriculture Scheme
PM Kisan Scheme : पीएम किसान योजनेचा आता तरी मिटवा वाद

काय आहे रायथू भरोसा योजना

वायएसआर रायथू भरोस-पीएम किसान योजनेंतर्गत आंध्र प्रदेशातील भूमिहीन मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांक शेतकऱ्यांना वार्षिक १३ हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ही रक्कम लाभार्थ्यांना तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. आंध्र सरकारने गेल्या चार या योजनेच्या अंतर्रगत ३० हजार ९८५ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत.

योजनेचा उद्देश

  • शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करणे

  • राज्यातील कृषी क्षेत्राचा विकास करणे

  • पीक उत्पादन वाढविणे

  • शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करणे

Agriculture Scheme
Namo Mahasanman Nidhi : शेतकऱ्यांना मिळणार वार्षिक ६ हजार रुपये; नमो शेतकरी महासन्मान योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी

योजनेचे नियम व अटी

योजनेचा लाभ घेणारा लाभार्थी हा आंध्र प्रदेशचा रहिवाशी असला पाहिजे. तसेच योजनेसाठी इच्छुक अर्जदार हा कृषी क्षेत्राशी संबंधित असला पाहिजे. या योजनेंतर्गत अल्पभूधारक शेतकरीदेखील अर्ज करू शकतात. यासाठी शेतकऱ्याकडे किमान पाच एकर शेतजमीन असणे आवश्यक आहे.

तीन हप्त्यात रक्कम वितरित

वायएसआर रायथू भरोसा-पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मे महिन्यामध्ये पहिला हप्ता दिला जातो. यामध्ये राज्य सरकारकडून ५५०० आणि केंद्र सरकाच्या पीएम किसान योजनेतून दोन हजार रुपये दिले जातात. योजनेचा दुसरा हप्ता ऑक्टोबर महिन्याात दिला जातो.

दुसऱ्या हप्त्यात राज्य सरकारकडून दोन हजार आणि पीएम किसान योजनेचे दोन हजार असे चार हजार शेतकऱ्यांना मिळतात. तर योजनेचा तिसरा आणि शेवटचा हप्ता जानेवारी महिन्यात रायथू भरोसा योजनेंतर्गत दोन हजार रुपये असे एकूण १३ हजार ५०० रुपये दिले जातात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com