Jaljeevan Mission : सांगोल्यातील ‘त्या’ गावांत नियमांचे उल्लंघन

सांगोला तालुक्यातील आठ गावांमध्ये जलजीवन मिशनमधून झालेल्या कामांमध्ये नियमांचे उल्लंघन झाले असल्याचा अभिप्राय ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दिला आहे.
Jaljeevan Mission
Jaljeevan MissionAgrowon

Solapur News : सांगोला तालुक्यातील आठ गावांमध्ये जलजीवन मिशनमधून (Jaljeevan Mission) झालेल्या कामांमध्ये नियमांचे उल्लंघन झाले असल्याचा अभिप्राय ग्रामीण पाणीपुरवठा (Rural Water Supply) विभागाने दिला आहे.

शेकापने केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचा शिक्कामोर्तब ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अभिप्रायामुळे झाला आहे. यानंतर प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर काय कारवाई करणार यावर जलजीवन मिशनमधील पारदर्शकता अवलंबून आहे.

Jaljeevan Mission
Jaljeevan Mission : ‘जलजीवन’ची कामे गतीने, दर्जेदार केल्यास गौरविणार

जल जीवन मिशनमध्ये सांगोला तालुक्यातील एखतपूर, चकदाणी, कटफळ, वाणी चिंचाळे, वाटंबरे, लक्ष्मीनगर, धायटी व महिम या आठ गावांमध्ये ठेकेदाराने काहीच काम न करता जिल्हा परिषदेच्या वतीने त्यांना पाच कोटी ७५ लाख रुपयांचे बिल अदा केले असल्याचा आरोप शेकाप नेते बाबासाहेब कारंडे, बाळासाहेब काटकर यांनी केला होता.

मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी चौकशीसाठी तीन सदस्यांची चौकशी समिती नेमली होती. या समितीचा अहवाल जिल्हा परिषदेला मिळाल्यानंतर त्यावर कोहिनकर यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा अभिप्राय मागितला होता.

Jaljeevan Mission
Jaljeevan Mission : ‘जलजीवन’ला प्राधान्य द्या

ठेकेदाराला गेले १ कोटी ३० लाख रुपये जादा

सांगोला तालुक्यातील त्या आठ गावांमधील संबंधित ठेकेदाराला ६० टक्क्यांपर्यंत बिल अदा करण्याची निविदा प्रक्रियेत अट असताना जिल्हा परिषदेने त्या ठेकेदाराला ८५ टक्क्यांपर्यंत रक्कम अदा केली आहे. ही रक्कम वाटप करताना डीएसआरचा आधार घेण्यात आला आहे.

त्यामुळे ठेकेदाराला १ कोटी ३० लाख रुपयांची रक्कम अधिकपणे वाटप झाली आहे. मी निविदा प्रक्रियेतील अटीवर ठाम राहणार असल्याची माहिती प्रभारी सीईओ कोहिनकर यांनी दिली.

अधिक्षक अभियंता माळी समितीचाही अहवाल आलेला आहे. कुलकर्णी समितीच्या अहवालावर अभिप्राय आलेला आहे. या दोन्ही अहवालातील संबंधित व्यक्तींवर सोमवारपर्यंत (ता.१४) जबाबदारी निश्‍चित करून त्या आठवड्यात कारवाईला सुरवात केली जाईल.

जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्याने सुशिक्षित बेरोजगार अभियंता म्हणून कामे घेतल्याच्या आरोपात प्रथमदर्शनी तथ्य आढळत आहे. या प्रकरणी देखील येत्या आठवड्यात कार्यवाही केली जाईल. - संदीप कोहिनकर, प्रभारी सीईओ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com