विदेशी फळे, फुले, मसाला पीक लागवडीसाठी रत्नागिरीत अनुदान

कृषी विभागाकडून कोकणात विदेशी फळांसह फुले व मसाला पिकांच्या लागवडीला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन प्रस्ताव मागविले आहेत.
Spices
SpicesAgrowon

रत्नागिरी ः कृषी विभागाकडून (Agriculture Department) कोकणात विदेशी फळांसह (Exotic Fruit) फुले व मसाला पिकांच्या लागवडीला (Spices Crop Cultivation) चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान (Subsidy) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन प्रस्ताव मागविले आहेत.

Spices
Spices : शेतकरी कंपनीद्वारे मसाल्यांना दिली बाजारपेठ

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत २०२२-२३ या वर्षात फळे, फुले, मसाला लागवड व आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करण्याकरिता अनुदान देण्यात येत आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या घटकांचा लाभ होण्यासाठी महा डिबीटी या संगणकीय प्रणालीवर अर्ज घेण्यात येणार आहेत. यामध्ये कट फ्लॉवरसाठी अल्प भूधारकांना हेक्टरी ४० हजार रुपयांपर्यंत आणि ४० टक्के, इतर शेतकऱ्यांना २५ टक्के किंवा २५ हजारांपर्यंत अनुदान मिळणार आहे.

कंदवर्गीय फुलांसाठी ६० हजार रुपये कमाल किंवा ४० टक्के, इतर शेतकऱ्यांसाठी २५ टक्के किंवा ३७ हजार ५०० रुपये अनुदान मिळेल. सुटी फुले लागवडीसाठी १० हजार ते १६ हजार रुपये अनुदान, मसाला पीक लावगडीमध्ये बियावर्गीय व कंद वर्गीयसाठी १२ हजार रुपये जास्तीत जास्त किंवा ४० टक्के, बहुवर्षीय मसाला पिकांमध्ये २० हजार रुपये किंवा ४० टक्के अनुदान. विदेश फळपिक लागवडीमध्ये ड्रॅगनफ्रुट, अंजीर व किवीसाठी १ लाख ६० हजार किंवा ४० टक्के, स्ट्रॉबेरीसाठी १ लाख १२ हजार रुपये अनुदान दिले जाईल. पॅशनफ्रुट, ब्लुबेरी, तेंदुफळ व अवॅकॅडोसाठी ४० हजार रुपये जास्तीत जास्त किंवा ४० टक्के अनुदान मिळेल. जुन्या बागांच्या पुनरुज्जीवनासाठी खर्चाच्या ५० टक्के किंवा २० हजार रुपये जास्तीत जास्त अनुदान दिले जाऊ शकते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com