सातारा : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शेततळ्यास अस्तरीकरण (Farm Pond Lining) व सामूहिक तलाव या घटकांसाठी राज्यस्तरीय कार्यालयात नोंदणी झालेल्या प्लॅस्टिक फिल्म पुरवठादार (Plastic Film Supplier) कंपन्यांचे विक्रेते व वितरकांनी १५ डिसेंबरपर्यंत जिल्हास्तरावर नोंदणी करणे बंधनकारक असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी सांगितले.
नोंदणीसाठीच्या अर्जाचा नमुना तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी तसेच जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय येथे उपलब्ध आहे. अर्जासोबत शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या नावे राष्ट्रीयीकृत किंवा अनुसूचित बँकेचे दोन लाख रुपयांचे मूळ हमीपत्र (बँक गॅरंटी) व एक छायांकित प्रत, शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरील नोंदणीच्या अटी व शर्तीबाबत करारनामा,
मान्यता प्राप्त कंपनीचे वितरक प्रमाणपत्र, कंपनीचे राज्यस्तरीय नोंदणी प्रमाणपत्र, वितरक व उत्पादक कंपनी यांच्यातील करारनाम्याची साक्षांकित प्रत, वितरक दुकान स्थळ/जागेचा पुरावा, ८ अ/ग्रामपंचायत किंवा नगरपालिका मालमत्ता पत्रक, दुकान भाड्याने असल्यास भाडेकरार, दुकान नोंदणी प्रमाणपत्र, पॅनकार्ड, जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र, आधारकार्ड, बँक पासबुकची छायांकित प्रत इत्यादी कागदपत्रे जोडणे आवश्यक असल्याचेही श्री. राऊत यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.