Pune ZP Recruitment : अजूनही रखडली ‘झेडपी’ची भरती

जिल्हा परिषदेत रिक्त असलेल्या तब्बल १८ हजार ९३९ रिक्त पदांच्या भरतीसाठी २०१९ मध्ये राज्य सरकारने जाहिरात काढली. मात्र, कोरोनाच्या साथीत ही भरती प्रक्रिया मागे पडली.
Pune ZP Recruitment : अजूनही रखडली ‘झेडपी’ची भरती
Agrowon

Pune ZP News जिल्हा परिषदेत रिक्त असलेल्या तब्बल १८ हजार ९३९ रिक्त पदांच्या भरतीसाठी (Pune ZP Recruitment) २०१९ मध्ये राज्य सरकारने जाहिरात काढली. मात्र, कोरोनाच्या साथीत ही भरती प्रक्रिया मागे पडली.

आता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य सरकारने ७५ हजारांच्या भरतीचा गाजावाजा केला. मात्र, वास्तवात चार वर्षांनंतरही जिल्हा परिषदेची रखडलेली भरती नक्की होणार की नाही, याबद्दल उमेदवार संभ्रमात आहेत.

सरकारच्या आश्वासनांबरोबरच सरकारी अध्यादेशांवरचाही विश्वास उडत चालल्याची संतप्त भावना उमेदवारांनी व्यक्त केली आहे. लवकरच सरळसेवा भरती प्रक्रिया पार पडेल, असे मागील चार वर्षांपासून उमेदवारांना सांगितले जाते. परंतु याबाबतची ठोस माहिती मिळत नसल्याने, यावेळीही विद्यार्थ्यांचा अपेक्षा भंग होणार आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Pune ZP Recruitment : अजूनही रखडली ‘झेडपी’ची भरती
Pune ZP Loan : पुणे ‘झेडपी’च्या दहा हजार बचत गटांना ३०० कोटीचे कर्ज

जिल्हा परिषदेतील रिक्त जागांसह तलाठी, वनरक्षक, नगरपरिषदेमध्ये रिक्त पदांची भरती प्रक्रिया रखडली आहे. शासनाने जिल्हा परिषदेच्या भरतीसाठीसंभाव्य वेळापत्रकही घोषित केले होते.

मात्र, त्यातील एकही वेळ पाळली गेली नसल्याचे आता सिद्ध झाले आहे. शासनाने भरती होणार की नाही, याबाबत स्पष्ट सांगावे, विनाकारण अधांतरी ठेवून विद्यार्थ्यांचा पैसा व वेळ वाया घालवू नये, अशा संतप्त प्रतिक्रिया उमेदवारांनी व्यक्त केल्या.

सद्यःस्थिती काय?

भरतीची जाहिरात नक्की केव्हा येणार, याबद्दल उमेदवार अनभिज्ञ पोलिस शिपाई भरती वर्ग ‘क’ आणि ‘ड’ सोडता इतर कोणत्याही पदांच्या जाहिराती आलेल्या नाहीत.

जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच सर्व प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते; मात्र अद्यापही कोणतेच अपडेट नाही.

ग्रामविकास विभागाचे २०१९ मधील परिक्षा शुल्काचा प्रश्न अनिर्णित.

Pune ZP Recruitment : अजूनही रखडली ‘झेडपी’ची भरती
Pune ZP Recruitment : झेडपी ८८९ पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविणार

आश्वासने...

पुढील काही दिवसांत जाहिरात प्रसिद्ध होईल.

दहा ते पंधरा दिवसांत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे.

विद्यार्थ्यांना लवकरच ऑनलाइन अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल.

जाहिरात प्रसिद्ध करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

जिल्हा परिषदेची २०१९ मधील भरती प्रक्रिया अजूनही रखडली आहे. विशेष म्हणजे ही भरती केव्हा होणार, या बद्दल संभ्रम आहे. वादग्रस्त आरोग्य विभागाच्या भरती बद्दलही उमेदवार प्रचंड संभ्रमात आहे. अनेकांच्या संयमाचा बांध आता फुटत आहे.
- महेश घरबुडे, समन्वयक, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ही आश्वासने ऐकण्याचा कंटाळा आला आहे. कारण मंत्रालयात याबाबत माहिती विचारली तर जिल्हा परिषदेत विचारा, असे सांगितले जाते आणि जिल्हा परिषदेत विचारले तर ग्रामविकास विभागाकडे विचारा, असे सांगितले जाते. गेल्या चार वर्षांपासून शासनाला जिल्हा परिषदेच्या भरती प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. तर १५ ऑगस्ट पूर्वी ७५ हजार जागांची भरती कशी पूर्ण होईल.
- शीतल जाधव, उमेदवार (नाव बदलले)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com