POCRA Scheme : कुठे ट्रॅक्टर कामाला, कुठे दर आकारणी फलक गायब

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (पोकरा) जिल्ह्यात अनुदान दिलेल्या अवजारे बँकांची एकाचवेळी गुरुवारी (ता.२०) धाडी टाकून चौकशी करण्यात आली.
POCRA Scheme
POCRA SchemeAgrowon

Akola News नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (पोकरा) जिल्ह्यात अनुदान (Subsidy) दिलेल्या अवजारे बँकांची (Farm Implement Bank) एकाचवेळी गुरुवारी (ता.२०) धाडी टाकून चौकशी करण्यात आली. या दरम्यान कुठे ट्रॅक्टर कामाला गेल्याचे सांगण्यात आले.

बऱ्याच ठिकाणी अवजार वापराचा फलक गायब दिसून आला. काही अवजारे बँकांचे साहित्य व्यवस्थित असल्याचेही दिसून आले, अशी माहिती तपासणी पथकात सहभागी सूत्राने दिली. आता या चौकशीचा नेमका काय अहवाल येतो? यावर पुढील कारवाई अवलंबून आहे.

POCRA Scheme
PoCRA Project : पोकरा प्रकल्पाने राजंदा गावात घडवला बदल

अकोला जिल्ह्यात ‘पोकरा’तून सुमारे १८९ अवजारे बँकांना १७ कोटी ७९ लाखांचे अनुदान दिले आहे. संबंधित अवजारे बँकेला ६० टक्क्यांपर्यंत अनुदानाची तरतूद आहे.

अवजारे बँका वाटपात मोठ्या अनियमितता असल्याचा ठपका चौकशी समितीने अहवालात ठेवला आहे. यामुळे पुन्हा एकाचवेळी गोपनीय पद्धतीने ८२ अवजारे बँकांची चौकशी लावण्यात आली.

यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील मंडळ, कृषी पर्यवेक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या टीम बनवून त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी पाठविण्यात आले. ही चौकशी गोपनीय पद्धतीने आयोजिली होती.

POCRA Scheme
POCRA Subsidy : नांदेडमध्ये पोकरांतर्गत ९७ कोटींचे अनुदान वितरित

अवजारे बँक वाटपात अनियमितता झाल्याने कुठे साहित्य खरेदीत, तर कुठे शेड उभारणीत चालढकल करण्यात आल्याचा संशय आहे.

वास्तविक अवजारे बँक घेणाऱ्या गट, कंपनीला अवजारे ठेवण्यासाठी शेड उभारणे, त्या ठिकाणी उपलब्ध साहित्य, त्याच्या वापरासाठी आकारला जाणारा दर अशा माहितीचे फलक लावणेही गरजेचे होते. यंत्रणांनी याकडे फारसे गांभिर्याने पाहिलेले नाही.

त्यामुळे चौकशीसाठी आलेल्या सदस्यांनी याची नोंद आपल्याकडे घेतल्याचे सांगितले. काही अवजारे बँकांचे काम चांगल्या पद्धतीने सुरू असल्याचेही निरिक्षण समिती सदस्यांनी नोंदवले आहे.

निरोप पोहोचविल्याची चर्चा

‘पोकरा’च्या अवजारे बँकांची चौकशी होणार असल्याचे बुधवारी (ता.१९) संकेत मिळाल्यानंतर काहींनी तातडीने खालपर्यंत निरोप पोहोचवून साहित्याची व्यवस्थित जुळवाजुळव करून ठेवण्याबाबत संबंधितांना सतर्क केल्याची खमंग चर्चा कृषी विभागात सुरू होती. यामुळे चौकशीसाठी गेलेल्या सदस्यांना सर्वकाही व्यवस्थित दाखवण्यात यश आले आहे.

जिल्ह्यात ‘पोकरा’प्रकल्पांतर्गत १८९ शेती अवजारे बँका वाटप झालेल्या असताना नेमक्या ८२ बँकांचीच चौकशी करण्याचे गमक काय, असाही प्रश्‍न उपस्‍थित केला जात आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com