Insurance Scheme : प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेबद्दल जाणून घ्या

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना शेतकरी आणि सर्व भारतीय नागरिकांच्या दृष्टीने चांगली आहे. ही योजना जून २०१५ पासून सुरू झाली.
PM Insurance Scheme
PM Insurance SchemeAgrowon
Published on
Updated on

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PM Surksha Bima Yojana) शेतकरी आणि सर्व भारतीय नागरिकांच्या दृष्टीने चांगली आहे. ही योजना (Insurance Scheme) जून २०१५ पासून सुरू झाली. या योजनेत विमाधारकाचा अपघातात मृत्यू (Accidental Death) झाल्यास किंवा तो पूर्ण अपंग झाल्यास त्यांना किंवा त्यांनी घोषित केलेल्या वारसदारांना दोन लाख रुपये मदत मिळणार आहे. विमाधारकास काही प्रमाणात अपंगत्व आल्यास एक लाख रुपये मदत मिळणार आहे.

PM Insurance Scheme
Pomegranate Crop Insurance : डाळिंब पीकविम्यात शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा

योजनेत भाग घेण्यासाठी संबंधित भारतीय नागरिकाकडे राष्ट्रीयीकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे. या शिवाय मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, जन्म दिनांक प्रमाणपत्र, एखादी शारीरिक व्याधी असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र, ई-मेल आणि वारसदाराचे नाव आणि पूर्ण माहिती आवश्यक आहे

PM Insurance Scheme
Crop Insurance : विमा वंचित २३०९ शेतकऱ्यांना मिळणार एक कोटीचा परतावा

योजनेचा वार्षिक हप्ता २० रुपये आहे. वयाच्या ७० वर्षापर्यंत विमा संरक्षण देय आहे. या योजनेत भाग घेण्यासाठी ग्राह्य वयोमर्यादा १८ वर्षे पूर्ण ते ७० वर्षे अशी आहे.

योजनेमध्ये विमाधारकाचा मृत्यू झाल्यास किंवा त्यांचे दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात अथवा दोन्ही पाय किंवा एक हात आणि एक पाय किंवा एक डोळा गेल्यास दोन लाख रुपये मदत मंजूर आहे. एक डोळा किंवा एक पाय किंवा एक हात गेल्यास रुपये एक लाख रुपये मदत मंजूर आहे.

योजनेत भाग घेण्यासाठी आपल्या संबंधित बँकेत जेथे आपले बचत खाते आहे, तेथे जाऊन योजनेत भाग घेण्याचा फॉर्म भरून द्यावा. याचा वार्षिक विमा कालावधी हा १ जून ते ३१ मे असा आहे. फॉर्म भरून दिल्यानंतर दर वर्षी आपल्या बँक खात्यातून हा विमा हप्ता मे महिन्यात वगळून घेतला जाईल. वयाच्या ७० वर्षांपर्यंत विमा संरक्षण सुरू राहील.

आपल्या बँक बचत खात्यात पुरेशी रक्कम नसल्यास किंवा बँक खाते बंद केल्यास विमा संरक्षण बंद होते. घरातील व्यक्ती गेल्यास किंवा अपंग झाल्यास आर्थिक अडचण निर्माण होते. अशा परिस्थितीत या योजनेत अत्यंत अल्प विमा हप्त्यात मिळणारी मदत ही कुटुंबाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असते.

विनयकुमार आवटे,

९४०४९६३८७०

(लेखक कृषी विभागामध्ये कृषी सहसंचालक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com