
अमरावती : खरीप हंगामातील (Kharip Season) नुकसानीनंतरही डावललेल्या पाच तालुक्यांतील २३०९ शेतकऱ्यांना ९.६ कोटींची भरपाई विमा कंपनीद्वारा देण्यात आली.
मात्र याच तालुक्यातील किमान १५,००० शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप होत आहे.
गेल्या खरीप हंगामात ८४ महसूल मंडळांत अतिवृष्टी व संततधार पावसाची नोंद करण्यात आली होती.
या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर ९.२६ लाख शेतकऱ्यांनी विहित मुदतीत वीमा कंपनीकडे पूर्वसूचना दाखल केल्या आहेत.
त्यापैकी तब्बल २६,३८४ अर्ज कंपनीस्तरावर नाकारण्यात आले. हे अर्ज गाह्य धरण्यात यावे यासाठी अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या असताना कंपनीने त्याची कोणतीच दखल घेतली नाही. या ८४ महसूल मंडळांत अतिवृष्टी व सततच्या पावसाने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.
सरासरी उत्पादन ५० टक्क्यांनी घटले असताना जिल्हाधिकाऱ्यांनी ८० महसूल मंडळासाठी अधिसूचना जाहीर केली. यानंतर एका महिन्यात शेतकऱ्यांना सरसकट विमा भरपाई देणे कंपनीला बंधनकारक होते.
परंतु विमा कंपनीकडून त्या टाळाटाळ करण्यात आली.
पाच तालुक्यांतील हजारो शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून वाऱ्यावर सोडण्यात आले होते.
या शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर त्याची दखल घेत भरपाईसाठी विमा कंपनीकडून तयारी दर्शविण्यात आली.
पिकाच्या काढणीपश्चात झालेल्या नुकसानीसाठी १०,५७६ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. यामध्ये अचलपूर तालुक्यात १२३६, अमरावती ३९०, अंजनगाव २९०९, भातकुली ४५८, चांदूर रेल्वे २३७, चांदूरबाजार २७२२, चिखलदरा ३९८, दर्यापूर ३५३, धामणगाव ४७९, धारणी ३९४, मोर्शी २९४, नांदगाव २१४, तिवसा ६३०९ व वरुड तालुक्यात १४२९ शेतकरी आहेत.
कंपनीविरोधात रोष
पाच तालुक्यांत विमा कंपनीकडून परतावा मंजूर करण्यात आला आहे त्यामध्ये अचलपूर तालुक्यात ५७० शेतकऱ्यांना ३२.१३ लाख, अंजनगाव सुर्जी २४२ शेतकऱ्यांना ९.६५, चांदूरबाजार १२५१ शेतकऱ्यांना ५१.५६, चिखलदरा ४१ शेतकऱ्यांना २.५७, धारणी २०५ शेतकऱ्यांना १०.५८
याप्रमाणे एकूण २३०९ शेतकऱ्यांना १.०६ कोटी रुपयांचा परतावा देण्यात येणार आहे. मात्र त्यानंतर देखील १५००० शेतकऱ्यांना कंपनीने वाऱ्यावर सोडल्याचा आरोप होत असल्याने शेतकऱ्यांत रोष आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.