Orchard Cultivation : मराठवाड्यात ‘रोहयो’ मधून ५ हजार ७९९ हेक्टरवर फळबाग लागवड

Rojgar Hami Yojana : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात २०२२-२३ मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ५७९९.५३ हेक्टर वर फळबागाची लागवड झाली.
Orchard cultivation
Orchard cultivationAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात २०२२-२३ मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ५७९९.५३ हेक्टर वर फळबागाची लागवड झाली. दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत कमी फळबाग लागवड झाली त्याचा थेट परिणाम २०२३ - २४ च्या उद्दिष्टांवर दिसतो आहे.

मराठवाड्यात फळबागाच क्षेत्र विस्तारते आहे. खास करून मोसंबी, सीताफळ, केशर आंबा यासह नवख्या ड्रॅगन फ्रूट आधी फळपिकांना शेतकरी पसंती देताना दिसत आहेत. २०२२-२३ मध्ये आठही जिल्ह्यासाठी ९ हजार ५६५ हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते.

त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, या तीन जिल्ह्या मिळून ३ हजार ७५० हेक्टर तर लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यात ५ हजार ८१५ हेक्टर फळबाग लागवडीचा समावेश होता.

कृषीच्या छत्रपती संभाजीनगर विभागात तीन जिल्ह्यात उद्दिष्टाच्या तुलनेत २ हजार ४५९.९९ हेक्टर तर लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यात उद्दिष्टाच्या तुलनेत ३३९.५४ हेक्टर वरच फळबाग लागवड शक्य झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

Orchard cultivation
Employment Guarantee Scheme : रोजगार हमी योजनेतंर्गत फळबाग लागवडीचा लाभ

यंदा ८ हजार २०० हेक्टर लागवडीचे उद्दिष्ट

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात २०२२- २३ मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ९ हजार ५६५ हेक्टर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट गाठले गेले नाही.

त्याचा थेट परिणाम यंदाच्या उद्दिष्टांवर दिसतो आहे. २०२३-२४ च्या हंगामासाठी २०२२ २३ मधील उद्दिष्टाच्या तुलनेत घट करून ८ हजार २०० हेक्टरचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

२०२२-२३ मधील फळबाग लागवड उद्दिष्ट व साध्य (हेक्टरमध्ये)

जिल्हा उद्दिष्ट साध्य

छ. संभाजीनगर - १२००- ६०८.९७

जालना - १८००- १५३९.३८

बीड - ७५० - ३११.६४

लातूर - १२००- ११५९.२

धाराशिव - १११०- ४२२.१

नांदेड- १५९० - २८३.०६

परभणी - १२२० - १२६२.७८

हिंगोली - ६५५ - २१२.४

Orchard cultivation
Employment Guarantee Scheme : ‘रोजगार हमी योजनेत सर्व पिकांचा समावेश करावा’

२०२३-२४ साठी फळबाग लागवडीचे उद्दिष्ट( हेक्टरमध्ये)

छत्रपती संभाजीनगर - १०००

जालना- १८००

बीड - ५००

लातूर - १३००

धाराशिव - ८००

नांदेड - ७००

परभणी - १५००

हिंगोली - ६००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com