Loan Interest Concession Scheme : व्याज सवलत योजनेचा जवळपास तीन लाख शेतकऱ्यांना लाभ

या योजनेंतर्गत तीन लाख रुपयांपर्यंत अल्पमुदत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना मुदतीत कर्जाची परतफेड केल्यास ३ टक्के व्याज सवलत देण्यात येते.
Crop Loan Scheme
Crop Loan SchemeAgrowon
Published on
Updated on

Agriculture Scheme News Pune: डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंचा (Dr. Panjabrao Deshmukh Interest Concession Scheme) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.

या योजनेंतर्गत २०२२-२३ या वर्षात जिल्ह्यातील अल्पमुदत पीककर्ज (Crop Loan) घेऊन मुदतीत परतफेड २ लाख ८८ हजार ९१७ शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. व्याज सवलतीपोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर ५७ कोटी ३१ लाख ७७ हजार २५ रुपये जमा करण्यात आले आहेत.

Crop Loan Scheme
Crop Loan : वर्ध्यात ६९ हजार शेतकऱ्यांना ९३१ कोटींचे कर्ज

या योजनेंतर्गत तीन लाख रुपयांपर्यंत अल्पमुदत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना मुदतीत कर्जाची परतफेड केल्यास ३ टक्के व्याज सवलत देण्यात येते. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राज्य सरकारमार्फत राबविण्यात येते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सर्व राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँकातून पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवण्यात येते.

Crop Loan Scheme
Crop Loan : शेतकऱ्यांकडून अर्धा टक्का व्याजाची वसुली

या योजनेंतर्गत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (पुणे ग्रामीण) यांच्यामार्फत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून प्राप्त तसेच शासनाकडून प्राप्त निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ६० हजार २५४ शेतकऱ्यांना १२ कोटी ९१ लाख ६९ हजार ९३९ रुपये आणि राज्य शासनाकडून प्राप्त निधीतून २ लाख २८ हजार ६६३ शेतकऱ्यांना ४४ कोटी ४० लाख ७ हजार ८६ रुपये इतकी व्याज सवलतीची रक्कम अदा करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (पुणे ग्रामीण) प्रकाश जगताप यांनी दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com