Crop Insurance : सोलापुरात पावणेसात लाख शेतकऱ्यांनी भरला पीकविमा

Solapur Crop Insurance Scheme : या विम्यामुळे आता ५ लाख २३ हजार १७५ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे. त्यामध्ये बार्शी आणि अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

Solapur News : राज्य शासनाने यंदा एक रुपयात पीकविमा भरण्याचा सोय केली आहे. या योजनेला सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून, तीन ऑगस्टपर्यंत दिलेल्या वाढीव मुदतीनंतर तब्बल ६ लाख ७६ हजार ३०९ शेतकऱ्यांनी खरिपातील पिकासाठी विमा उतरला आहे. या विम्यामुळे आता ५ लाख २३ हजार १७५ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे. त्यामध्ये बार्शी आणि अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.

सोलापूर जिल्हा रब्बीचा म्हणून ओळखला जात होता. पण अलीकडच्या काही वर्षांपासून खरिपातही मोठ्या प्रमाणात पीके घेतली जात आहेत. त्यातही सोयाबीन, तूर, कांदा, उडीद या पिकांचा सर्वाधिक समावेश आहे.

त्यामुळे विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्येही वरचेवर वाढत आहे. त्यातच यावर्षी खरीप हंगामात एक रुपयात विमा भरण्याची सोय शासनाने केल्यामुळे शेतकऱ्यांचा प्रतिसाद चांगला मिळाला आहे.

Crop Insurance
Crop Insurance : पीकविमा योजनेला ‘रेकॉर्डब्रेक’ प्रतिसाद

जिल्ह्यातील महाईसेवा केंद्रे, आपले सरकार सेवा केंद्रे यांसारख्या सुविधा केंद्रांवर शेतकऱ्यांनी विमा भरला. आधी ३१ जुलैपर्यंत असणारी मुदत शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव तीन दिवस वाढविण्यात आली. त्या वेळी साडेचार लाखापर्यंत शेतकऱ्यांचे अर्ज दाखल झाले होते. पण पुन्हा तीन दिवसांची मुदत वाढवल्यानंतर त्यात तब्बल पावणेतीन लाख शेतकऱ्यांची भर पडली.

Crop Insurance
Crop Insurance : खरीप पीकविमा योजनेत २ लाख शेतकऱ्यांचा सहभाग वाढला

पंढरपुरातून सर्वांत कमी अर्ज

संपूर्ण जिल्ह्यातून एकूण ६ लाख ७६ हजार ३०९ शेतकऱ्यांनी पीक विमा भरला. त्यात बिगर कर्जदार ६ लाख ७४ हजार ५७१ तर कर्जदार १७३८ शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यात बार्शी तालुक्यातून सर्वाधिक १ लाख १८ हजार ६४० शेतकऱ्यांनी विमा उतरवला. त्या खालोखाल अक्कलकोट तालुक्यात १ लाख ४९८ शेतकऱ्यांनी विमा उतरवला.

त्यानंतर करमाळ्यातून ८६ हजार ३८२, माढ्यातून ८५ हजार ७११, मंगळवेढ्यातून ६७ हजार ९०२, मोहोळमधून ३९ हजार ७६७, सांगोल्यातून ६० हजार ५७६, दक्षिण सोलापुरातून ५४ हजार ६७९ माळशिरसमधून २२ हजार ७०३ आणि उत्तर सोलापुरातून २३ हजार २३९ अर्ज दाखल झाले. तर सर्वात कमी पंढरपुरातून फक्त १४ हजार ८४६ शेतकऱ्यांनी विमा भरला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com