Crop Insurance : ‘माझी पॉलिसी माझ्या हातात’

राज्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकविमा योजनेची माहिती समजावून सांगण्यासाठी आणि पीक विम्याबाबतच्या समस्यांचे निरसन करण्यासाठी ‘माझी पॉलिसी माझ्या हातात’ या उपक्रमास गुरुवार (ता. १)पासून सुरुवात झाली.
Crop Insurance Scheme
Crop Insurance SchemeAgrowon

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकविमा योजनेची (Crop Insurance Scheme) माहिती समजावून सांगण्यासाठी आणि पीक विम्याबाबतच्या (Crop Insurance) समस्यांचे निरसन करण्यासाठी ‘माझी पॉलिसी माझ्या हातात’ (My Policy In My Hand) या उपक्रमास गुरुवार (ता. १)पासून सुरुवात झाली.

Crop Insurance Scheme
Kharif crop management: खरीप पिकांसाठी ही काळजी घ्या

या उपक्रमांतर्गत ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा घेतला आहे, अशा शेतकऱ्यांना मूळ प्रत सुपूर्द करण्यात येणार आहे. राज्यात पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या खरीप हंगामासाठी राज्यात ९६ लाखांपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. खरीप २०२१ मधील खरीप हंगामासाठी अर्जांची संख्या जवळपास लाख ८४ लाख होती. गतवर्षीच्या तुलनेत जवळपास १२ लाख जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. वातावरण बदलाच्या पार्श्‍वभूमीवर उशिराने येणारा पाऊस, अतिवृष्टी, ढगफुटी, पावसातील खंड, कीड व रोगांचा प्रादुर्भाव अशा विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी यंदापासून बीड पॅटर्न लागू करण्यात आला आहे.

राज्यात २०१६ पासून २३ हजार कोटींपेक्षा जास्त रकमेची नुकसानभरपाई विमा योजनेतून देण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांत पीकविमा योजनेचा लाभ मिळण्यापासून काही शेतकरी वंचित राहत होते. याचे मुख्य कारण म्हणजे या योजनेची माहिती अनेक शेतकऱ्यांना नव्हती. त्यामुळे त्याबाबत जागृती करण्यासाठी केंद्र सरकारने ‘मेरी पॉलिसी मेरे हाथ’ हा उपक्रम सुरू केला आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत यंदाच्या खरीप हंगामात नोंदणी केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला पीक विम्याची मूळ प्रत गावस्तरावर विशेष कार्यक्रमात वितरित केली जाणार आहे.

Crop Insurance Scheme
Crop Damage : पहिल्या दोन महिन्यांतील पीक नुकसानभरपाईसाठी हवे ८०७ कोटी

गावोगावी होणार वितरण

पालकमंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, खासदार, आमदार आणि जिल्हाधिकारी यांच्या हस्ते या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात यावा, असे निर्देश दिले आहेत. या कार्यक्रमात लोकप्रतिनिधींसह पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, राज्याचे आणि जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी, विमा कंपन्या प्रतिनिधी, प्राथमिक कृषी सहकारी संस्था, सार्वजनिक सुविधा केंद्रे, शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या सहभागाने पीकविमा पाठशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच धान्य बाजार, फळबाजार, कृषी उत्पन्न बाजार समिती, बियाणे व खत विक्रेत्यांची दुकाने, अन्नधान्य महामंडळाची गोदामे, नाफेडची खरेदी केंद्रे, इफ्को व कृभको यांची विक्री केंद्रे, आठवडी बाजार या ठिकाणी या कार्यक्रमांचे आयोजन करावे, अशी सूचनाही केंद्र सरकारने केली आहे. या कार्यक्रमात शेतकऱ्यांचे अनुभव, त्यांनी दिलेले काही पुरावे, पीकविम्याच्या यशोगाथा यांची अंमलबजावणी करावी, अशी सूचना दिली आहे.

मोहिमेचा उद्देश...

१. शेतकऱ्याला पीकविम्याची रक्कम, विमा उतरलेल्या पिकाचा प्रकार, एकूण क्षेत्र, हप्त्याची रक्कमेचा पुरावा मिळेल, त्याचा वापर भविष्यात दाव्यासाठी होईल.

२. या योजनेच्या संदर्भात अधिकाधिक माहिती शेतकऱ्यांपर्यंत जाईल.

३. ज्या भागातील शेतकरी या विमा योजनेत सहभागी होत नाहीत त्यांना योजनेची माहिती देऊन सहभागी होण्यास प्रबोधन होईल.

४. शेतकऱ्यांना या योजनेचे महत्त्व समजावून सांगणे.

५. पीकविमा योजनेच्या संदर्भात शेतकऱ्याच्या विविध शंकांचे निरसन करण्यात येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com