पाणंद रस्ते योजना यशस्वी करा

पाणंदी व शेतरस्ते हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. पाणंद रस्त्यांच्या मुरमीकरण व खडीकरणामुळे शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा संपतील, असा विश्वास आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
Hasan Mushrif
Hasan MushrifAgrowon
Published on
Updated on

कोल्हापूर ः पाणंदी व शेतरस्ते (Farm Road) हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. पाणंद रस्त्यांच्या (Panand Road) मुरमीकरण व खडीकरणामुळे शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा संपतील, असा विश्वास आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी व्यक्त केला. हद्दीवरून व अतिक्रमणांच्या तक्रारी न करता ही योजना यशस्वी करा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

येथील मातोश्री योजनेअंतर्गत पाणंदी, शेतरस्त्यांच्या मुरमीकरण व खडीकरण मोहिमेचा प्रारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुश्रीफ बोलत होते. या वेळी येथील इनाम पाणंद शेतरस्त्याच्या मुरमीकरण, खडीकरण कामाचा प्रारंभ मुश्रीफ यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी अरुण भोसले होते. मुश्रीफ म्हणाले, की थोरले भाऊ पोलिस सेवेत गेल्यानंतर शेतीची जबाबदारी माझ्यावर आली. पाणंदी आणि शेतरस्त्यांमध्ये शेतकऱ्यांचे होणारे हाल विशेषत: पावसाळ्यातील दुर्दशा मी अनुभवलेली आहे.

Hasan Mushrif
गोकुळचे शेतकरीच अमूलचं आव्हान परतवतीलः मुश्रीफ

केडीसीसीचे संचालक भैया माने म्हणाले, की सत्ता असो वा नसो आमदार हसन मुश्रीफ निधीचा ओघ आणत आहेत. दुसरीकडे आणलेला निधी अडवण्याची प्रवृत्ती कार्यरत झाली आहे. जी विकासाला घातक आहे. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव म्हणाले, की मातोश्री पाणंद व शेतरस्ते मुरमीकरण व खडीकरण योजना लोकसहभागातूनच अधिकाधिक यशस्वी होईल. तहसीलदार शिल्पा ठोकडे म्हणाल्या, मातोश्री पाणंद योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करा, अतिक्रमणे काढून घ्या. नसेल तर कायद्याचा वापर करून अतिक्रमणे काढली जातील.

गटविकास अधिकारी सुशील संसारे, बिद्रीचे संचालक प्रवीणसिंह भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच छाया चव्हाण, विकास पाटील, डी. पी. पाटील, आर. व्ही. पाटील, मकबूल मकानदार, धीरज मगदूम उपस्थित होते. संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य सदाशिव तुकान यांनी स्वागत केले. विवेक गवळी यांनी सूत्रसंचालन केले. बशीर नदाफ यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com