Galyukt Shiwar Yojana : ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ अभियानाला प्रारंभ

Galmukt Dharan Yojana : धरण आणि तलावांमधील पाणीसाठा वाढविण्याबरोबरच, गाव शिवारात गाळाच्या माध्यमातून सुपीक माती उपलब्ध व्हावी या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ अभियानाला जिल्ह्यात शनिवारी (ता.२०) सुरुवात करण्यात आली.
Galyukt Shiwar Yojana
Galyukt Shiwar Yojana Agrowon

Sarkari Scheme : धरण आणि तलावांमधील पाणीसाठा वाढविण्याबरोबरच, गाव शिवारात गाळाच्या माध्यमातून सुपीक माती उपलब्ध व्हावी या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ अभियानाला जिल्ह्यात शनिवारी (ता.२०) सुरुवात करण्यात आली.

योजनेअंतर्गत एकाच दिवशी जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील ११ कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामाचे प्रातिनिधीक उद्‍घाटन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते नावळी तोरवे (ता.पुरंदर) येथे करण्यात आले

Galyukt Shiwar Yojana
Galyukt Shiwar Yojana : नापीक शेती, माळरान होणार बागायती

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. अंकित गोयल नावळी गावाचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.

जिल्ह्यात एकाच दिवसात नावळी (ता.पुरंदर), गुंजवणे (ता. वेल्हा), मोराची चिंचोली (ता. शिरूर), बाबुर्डी (ता.बारामती), मदनवाडी (ता. इंदापूर), जरेवडी, रासे (ता.खेड), आणे पोडगा (ता.जुन्नर), वडगावपीर (ता. आंबेगाव) अशा ११ ठिकाणी एकाच दिवसात कामे सुरू करण्यात आली आहेत.

जिल्हा परिषदेचा लघुपाटबंधारे विभाग आणि जलसंपदा विभागांतर्गत १ हजार १६ पाझर तलावांची यादी तालुकास्तरीय यंत्रणांना उपलब्ध करून देण्यात आली. त्यापैकी ३७ कामांचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत.

ही कामे लवकरच सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. येत्या आठवड्यात प्रत्येक तालुक्यातून १० कामे सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले.

Galyukt Shiwar Yojana
Galyukt Shiwar Yojana : ‘गाळयुक्त शिवार’अंतर्गत काजळेश्‍वर येथे लोकसहभागातून कामास प्रारंभ

‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ अभियानामुळे धरण व तलावातील गाळ उपसून शेतात पसरविल्यास कृषी उत्पादनात वाढ होण्यासोबतच धरणाची व तलावाची मूळ साठवण क्षमता पुनर्स्थापित होण्यास मदत होणार आहे.

तलावातील मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ शेतकऱ्यांना आपल्या शेतात टाकावयाचा असल्यास संबंधित ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा. या योजनेसाठी इंधन व यंत्रसामग्रीसाठी लागणारा प्रति घनमीटर ३१ रुपये खर्च राज्य शासन देणार आहे.

अनुदानाचे स्वरूप

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत विधवा, अपंग, आत्महत्याग्रस्त शेतकरी, सीमांत, अत्यल्पभूधारक (१ हेक्टरपर्यंत) व लहान (१ ते २ हेक्टर) शेतकऱ्यांना एकरी १५ हजार रुपये याप्रमाणे अडीच एकर क्षेत्रासाठी ३७ हजार ५०० रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.

येत्या काळातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामपंचायतींनी आपल्या परिसरातील पाणीसाठ्यातील गाळ काढून पाण्याची साठवण क्षमता वाढवणे, त्यांची कायमस्वरूपी निगा राखणे व पाण्याचा अपव्यय टाळून योग्य वाटप करण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. जलसाठ्यातून निघालेला गाळ आपल्या शेतात टाकून शेताची सुपीकता वाढवावी यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी अभियानात सहभागी होऊन या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच अशासकीय संस्थानी ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ या योजनेचा हेतू साध्य करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा.
- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com