Crop Insurance : पीकविमा भरण्यासाठी अखेरचे तीन दिवस

खरीप हंगामासाठी कृषी विभागामार्फत राज्यासह पुणे जिल्ह्यात पीकविमा योजना राबविण्यात आली आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवण्याची अंतिम मुदत ३१ जुलै असून आता शेवटचे तीन दिवस उरले आहेत.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

पुणे : खरीप हंगामासाठी कृषी विभागामार्फत राज्यासह पुणे जिल्ह्यात पीकविमा योजना (Crop Insurance Scheme) राबविण्यात आली आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवण्याची अंतिम मुदत ३१ जुलै असून आता शेवटचे तीन दिवस उरले आहेत. (Last Three Days For Crop Insurance) गर्दी टाळण्यासाठी अंतिम दिनांकाची वाट न पाहता त्यापूर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा हप्ता (Crop Insurance Premium) भरावा, असे आवाहन मावळचे तालुका कृषी अधिकारी दत्तात्रेय पडवळ यांनी केले आहे.

योजनेचा उद्देश :

- नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांसारख्या आपत्कालीन प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे.

- पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.

- शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे.

- कृषी क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेकरून कृषी क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हेतू साध्य होण्यास मदत होईल.

Crop Insurance
Crop Insurance : साडेअकरा लाख हेक्टर क्षेत्र पीकविमा संरक्षित

योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये :

- योजना ही अधिसूचित क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी असेल.

- कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी योजना ऐच्छिक आहे.

- अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी खातेदाराचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.

- योजनेअंतर्गत सर्व पिकांसाठी ७० टक्के जोखीमस्तर निश्‍चित करण्यात आला आहे.

- शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी २० टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्का व नगदी पिकासाठी ५ टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे.

- योजनेत विमा कंपनी एका वर्षांमध्ये जिल्हा समूहामध्ये एकूण जमा विमा हप्ता रकमेच्या ११० टक्क्यांपर्यंतचे दायित्व स्वीकारतील. तथापि एका वर्षातील देय पीकविमा नुकसान भरपाईची रक्कम जमा विमा हप्ता रकमेच्या ११० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास ११० टक्क्यांपेक्षा जास्तीचा भार राज्य शासन स्वीकारेल. जर देय पीकविमा नुकसानभरपाईची रक्कम जिल्हा समूहामध्ये एकूण जमा विमा हप्ता रकमेपेक्षा कमी असेल तर विमा हप्ता रकमेच्या जास्तीत जास्त २० टक्के रक्कम स्वतःकडे ठेवेल व उर्वरित विमा हप्ता राज्य शासनाला परत करेल.

Crop Insurance
Crop Insurance : पीकविमा योजनेत कंपन्यांचचं चांगभलं

या योजनेअंतर्गत पुढील कारणांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीस विमा संरक्षण मिळणार :

- हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान.

- पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे होणारे नुकसान

- पीक पेरणीपासून काढणीपर्यंत कालावधीत नैसगिक आग, वीज कोसळणे, गारपीट वादळ चक्रीवादळ, पूर क्षेत्र जलमय होणे. (भात, ऊस व

ताग पीक वगळून) भूसख्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट.

- स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान.

- नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान.

योजनेच्या अधिक माहितीसाठी संपर्क :

- विमा कंपनी - आयसीआयसीआय जनरल लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, पुणे टोल फ्री क्रमांक- १८००१०३७७१२.

- ई-मेल आयडी - customersupportba@icicilombard.com

- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा राष्ट्रीयकृत बँकेची शाखा,

नजीकचे विविध कार्यकारी सोसायट्या, कृषी खात्याचे कृषी सहायक व कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

योजनेमध्ये समाविष्ट पिके, विमा संरक्षित रक्कम (प्रति हेक्टरी)व विमा हप्ता दर :

पीक --- विमा संरक्षित रक्कम, -- विमा हप्ता रुपये

भात -- ५१,७६० -- ६२११.२० -- १०३५

भुईमूग -- ४०,००० -- १०,००० --- ८००

सोयाबीन -- ४९,००० -- ९८०० --- ९८०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com